Sunday, May 29, 2011

पुणे डेक्कन सदाशिव लढवय्ये.

आमच्या येथे चेंडुफळीचे सामने खेळण्यासाठी संघ भाड्‍याने किंवा विकत दिला जाईल.

आमची कुठेही  शाखा नाही.

कृपया लक्षात ठेवा.

 • एकावेळी एकच संघ सामना खेळण्यासाठी मिळेल. तसेच संपुर्ण संघ एकसंघी मिळेल. एखादाच , किरकोळ, फुटकळ खेळाडु हवा असला तरी मागु नये. दिला जाणार नाही.
 • दुपारी बारा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत आमची वामकुक्षीची वेळ असल्यामुळे त्यावेळेत आम्ही सामने खेळायला येणार नाही.
 • आमचा फलंदाजांकडुन एका षटकात फक्‍त सहा चेंडु खेळले जातील. त्याला अधिकचे चेंडु खेळण्यास लागले तर जास्तीचा आकार घेतला जाईल.
 • आमच्या खेळाडुने षटकार मारल्यानंतर जर का चेंडु सापडला नाही किंवा हरवला तर त्यास आम्ही जबाबदार नाही. कोणत्याही परिस्थितीत नुकसानभरपाई द्यायला आम्ही बांधील नाही. तसेच जर का चेंडु टोलावल्यानंतर त्याचा आकार बदलला, तो वेडावाकडा झाला तर त्याची दाद आमच्याकडे मागितली जावु नये.
 • प्रत्येक षटकात आमच्या फलंदाजाच्या अंगावर केवळ दोनच उसळणारे चेंडु टाकले जावेत. जास्तीचे चेंडु टाकले गेल्यास सामना खेळायला आम्ही बांधील नाही.
 • प्रतिस्पर्धी संघाने  प्रत्येक षटकात केवळ दोनदाच चेंडु सीमेपार धाडण्याचा प्रयत्न करावा. तिसऱ्यांदा आमचा खेळाडु सीमेच्या दिशेने धावला जाणार नाही, आणि जर का आमच्या खेळाडुला चेंडु पाठोपाठ धावाने लागलेच  तर त्याचा आकार अलग घेतला जाईल.
 • प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला जर का वाटत असेल की आम्ही त्याला झेलबाद करावे तर त्याने चेंडु पकडण्यासाठी चेंडु आमचा खेळाडु जेथे क्षेत्ररक्षण करण्यास उभा असेल त्याच जागी टोलवावा व सरळ जावुन त्याच्या हातात पडेल अश्या रितीनेच मारायला हवा. त्याला झेल पकडण्यासाठी धावायला लावले जावु नये. तसे झाल्यास वेगळा आकार पडॆल. 
 • आमचा संघ केवळ टी शर्ट व अर्धी चड्डी घालुनच खेळ खेळायला ये‍ईल. त्यानी चित्रविचीत्र गणवेष घालावा असे वाटत असेल तर तो गणवेष तुम्ही त्यास शिवुन द्यावा, आम्ही आणणार नाही.
 • आमच्या फलंदाजाला शुन्यावर बाद केले जावु नये, जर चुकुन तो शुन्यावर बाद झाला तर त्याला परत खेळण्याची संधी दिली जावी.
 • सामन्यामधे आम्ही प्रथम फलंदाजी केल्यास जास्तीतजास्त १७५ धावा काढल्या जातील.  प्रतिस्पर्धी संघाने प्रथम फलंदाजी केल्यास त्यांनी आपली धावसंख्या फक्‍त दिडशे पुरती मर्यादित ठेवावी. आम्हाला दिडशेपेक्षा अधिक धावा काढण्यास लावले गेले तर त्याच्यासाठी प्रत्येक धावांमागे अधिकचे पैसे आकारण्यात येतील.
 • सामना जिंकण्यासाठी आमच्याने शक्य होतील तेवढेच प्रयत्न केले जातील. सामना हरल्यास तसेच प्रेक्षकांना त्यांचे पैसे वसुल न झाल्याचे समाधान मिळाले नाही तर त्यास आमचा संघ जबाबदार मानला जावु नये.
 • प्रेक्षकांनी आपले वर्तन सभ्य ठेवावे. वेडेवाकडॆ वागु नये अशी आमची अपेक्षा आहे. आमच्या खेळाडुच्या भावना दुखावल्या जातील असे वागु नये. आमच्या खेळाडुचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.
 • या सामन्याच्या प्रक्षेपणदरम्यान दाखवल्या गेलेल्या जाहिरातीवरील उत्पनावर दहा टक्के आमचे कमीशन आकारले जाईल.  


वरील नियम व अटी मान्य असल्यासच आमचा संघ भाड्‍याने / विकत घेण्यासाठी आत शिरावे.

लक्षात असु दे आमची गरज तुम्हाला आहे, तुमची गरज आम्हाला नाही.

सर्वात महत्वाचे म्हणजे जरी आपण आमचा संघ लिलावात विकत घेतला असला तरी प्रत्येक  गोष्टीत आमचा निर्णय अंतिम राहील.

प्रतिक्षा ....................प्रतिक्षा ............................ आता आलच म्हणायचं ......प्रतिक्षा
मिडनाईट बुफे - नको रे बाप्पा

निशाचर राजाभाऊ विचार करुन राहिले "आपण निशाचर असुन देखील अजुन पर्यंत मिडनाईट बुफेच्या वाटेला गेलेलो नाही हे काही खरे नाही"

दुसरीकडे बेहिशोबी राजाभाऊ हिशोब करुन राहीले "अरे मिडनाईट बुफे म्हणे स्वस्त असतो की मग तो खावाच"

कधी नाही ते त्या रात्री राजाभाऊ विचार करुन राहिले " मिडनाईट बुफे माणसी रु. २९९ व इतर वेळीचा दर रु.५९९. पण या ५९९ रुपयात एकावर एक फुकट , मग हा स्वस्त कसा ? हिशोब काही पचनी पडेना, त्यात "आता वाजले की बारा " ला अर्धा तास बाकी. भुकेने पोटात आणि भेज्यात थैमान मांडलेले. "व्हिट्स " मधे मध्यरात्री जेवायचे करुन मुंबईवरुन गाडी हाणलेली.

ह्या सुमारास तेथे फक्‍त बर्गर व सॅंडवीझस मिळणे ते आत्ताच्याला खाणॆ नको, काही खरं नाही राजाभाऊ. चला निघा येथुन.

जे खाल्ले गेले नाही ते

हं, आता पुढे काय ? परत मागे फिरुन सयाजीत जायला आलेला कंटाळा, बायकोला बोलायला काय जाते ?

आता मध्यरात्री कुठे बरं जेवण मिळु शकेल, कुठे मिळेल ? कुठे मिळेल ? " मॅरीयटस" मधे नक्कीच मिळु शकेल.

राजाभाऊ तेथे पोचेपोचेस्तो बुफे बंद झालेला.

मग त्यांनी सब्जी बिर्याणी व एक सब्जीकी हांडी ही भाजी मागवली.
पण नाही तितकीशी मजा आली. एक तर भुकेल्यापोटी अन्नाच्या प्रतिक्षेचा काळ फार दिर्घ होवुन जातो त्यात परत चव काही जमली नाही.
जेवल्यावर आपण हजार रुपये केवळ दोन पदार्थांसाठी वाया घालवल्याची चुटपुट घेवुन रात्री दिड वाजता ते घरी पोचुन राहिले.

आता घरी आल्याआल्या तुलाच जेवण बरोबर घेवुन निघायला नको असे बायकोच्या अंगावर डाफरायची खरं तर काहीच गरज नव्हती. चटक लावायला कारणीभुत तेच.

पण आलेला राग कोणावर तरी काढायला लागतो , दुसरे सॉफ्ट टार्गेट कोण सापडते काय ?

Wednesday, May 25, 2011

पण असं का ?

तिखट ,झणझणीत भाजी, नाव मात्र " गोडी बटाटी "

एक अडगळीची खोली, एक बया आणि एशियन पेंट्स

अजुन कशाचा कशाला पत्ता नाही, आणि राजाभाऊंना वेध लागले आहेत. न जाणो कधी कोणाला .....................


Sunday, May 22, 2011

सावधान, सावधान, सावधान, सावधान.

पण हा सावधानाचा इशारा कधी कोणी गंभीरतेने घेतला आहे का ? अब पछताने से क्या फायदा राजेशभाई ! आता भाचेसुना आल्या, सुन येईल. तेव्हाच आपल्या सासरेबुवांनी सोडलेला सुटकेचा निश्वास कानी पडला असता तर ?

जाऊं दे, आपण जसे जाळ्यात गुरफटत गेलो तसचं दुसऱ्यांना त्या मार्गाने जातांना मजा बघु,

श्री. शंकरराव पापळकर
आजच्या "लोकरंग , लोकसत्ता " मधे श्री. शंकरराव पापळकरांवर, त्यांच्या कार्यावर एक सुरेख लेख श्री. अरविंद सुरवडे यांनी लिहीला आहे.  
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=305&Itemid=307श्री. शंकरराव पापळकरांबरोबर एकदा दुरध्वनीवर बात केल्यांनतर जर राजाभाऊ एवढे भारावुन गेले होतो तर प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर काम केलेल्या माणसांची काय स्थिती होत असेल ?

========================================================================

श्री शंकर पापळकरआज मी बेहद्द खुश आहे म्हणण्यापेक्षा जास्तच उत्तेजीत झालो आहे. आज मी श्री. शंकर पापळकरांशी दुरध्वनीवर संभाषण केले. श्री शंकर पापळकर यांची ओळख तशी संगीताच्या बॉगवर झालीच होती.

आजच्या फादर्स डे चे औचीत्य साधुन सुधीर जोगलॆकरांनी चतुरंग, लोकसत्ता मधे "सव्वाशे मुलांचे बाप" हा त्यांच्या महान कार्याची माहीती देणारा अप्रतिम लेख लिहिला आहे.


आपल्या समाजपुरुषाचा गाडा केवळ या अश्या थोर विभुतीच्या जोरावर चालला आहे असे म्हटले तर ते वावगे ठरु नये.जन्मदात्यांनी ज्यांना लाथाडले, अव्हेरले अशा दुर्दैवी मुलांना जवळ करीत त्यांना मातेची ममता आणि पित्याचा पितृवत आधार देणारे दोन समाजपिता .. त्यांनी जपलेल्या आगळ्यावेगळ्या माणुसकीची ही कहाणी.ही कहाणी वाचल्यावर मला असा प्रश्न पडला की या मुलांना दुर्दैवी का बरे म्हणावे, ज्यांच्या नशिबी श्री शंकर पापळकर यांच्या छत्रछायेखाली नुसतेच वाढणॆ नव्ह्ते तर त्यांचे योग्य ते पुनर्वसनही लिहीले होते ती मुले तर नशिबवानच म्हणायला पाहीजेत. जे सख्खे आईवडील त्यांना देवु शकत नाहीत, ज्या योग्य प्रकारे त्यांची काळजी घेवु शकत नव्हते ते त्यांचा केवळ श्री शंकर पापळकर यांच्या मुळे लाभले.आईवडीलांनी टाकुन दिलेली भिन्नमती, मूकबधीर बहूविकलांग अशी ७३ मुले पापळकरांच्या संस्थेत रहात आहेत. या मुलांना श्री शंकर पापळकर नुसतेच घर देवुन थांबत नाहीत तर त्यांची लग्नं लावुन, त्यांना नोकरीढंदा देऊन आयुष्यात उभं करण्याचा प्रयत्न करतात.


श्री शंकर पापळकर यांना लाख लाख सलाम.


श्री शंकर पापळकर यांचे मागणे एकच आहे.


आज भारतात अनेक नामवंत संस्था आहेत ज्या नियमाच्या चौकडीत बांधल्या गेल्यामुळॆ १८ वर्षावरील

भिन्नमती, मूकबधीर बहूविकलांग मुलांसाठी काही करु शकत नाहीत. त्यांना १६ वर्षे पुर्ण झाली की बाहेर काढले जाते.


आज गरज आहे ती सरकारनं विधानसभेत पुढाकार घेवुन १८ वर्षावरील भिन्नमती, मूकबधीर बहूविकलांग मुलांसाठी त्यांचा पुनर्वसनासाठीचा कायदा करावा.


हे "लोककल्याणकारी" दावा मिरवणाऱ्या सरकारला सहज शक्य आहे. गरज आहे ती केवळ इच्छाशक्तीची. ज्यातुन राजकीय लाभ मिळवता येतील अश्या गोष्टींच्या पलीकडला विचार करायला शिकण्याची.

Saturday, May 21, 2011

टाटा स्काय आणि मनी व मिनी

टाटा स्काय काय सर्वांनाच आवडते.
कोणाला पहायला आवडते नी कोणाला कशाला ?चुलीवरचे स्वादिष्ट जेवण व त्याला दिलेली खमंग फोडणी.

आपण काढलेल्या एखाद्या फोटोवर    Ugich Konitari                        


यांनी रुचकर प्रतिक्रिया द्यावी, केवळ या साठीच फोटो काढले जावेत. 
आयुष्याच्या चुलीचे तीन दगड,
आईवडील,
सासूसासरे ,
आणि नवरा ;


कधी चटके, कधी धूर ,
कधी फोडणीची तडतड ,
कधी आनंदाने उकळणारी आमटी,
एखादं भाजणार बोट ,
शिजणाऱ्या आंबेमोहोर चा सुवास,
चुलीत शिजणारे छोटे छोटे बटाटे ,

कधीतरी एखादं जळक लाकूड ढकलावं लागत ,
कधी कधी मोठा ज्वाळ होतो ,
कधी तर फुंकणीने
कुणाच्यातरी हातावर फुंकर घालावी लागते,
अगदी डोळे पाणावतात ,


आणि जेव्हा ती
कौतुकाने आपल्या मुलांना
गरम भाकऱ्या करून वाढते
तेव्हा

चुलीचे तिन्ही दगड
दीर्घ श्वास घेउन,
ज्वालांना गप्प करून
हळू हळू सुखावून
शांत होतात ......
अशी दुपार अशी दुपार


 पुतळ्याला सुद्धा घनदाट सावलीत जावुन उभे रहावेसे वाटावे

येथे पशुपक्षी खुल्या वातावरणात बहरतात

ऑल सेंट्स चर्च.

मुंबईमधे एवढ्या सुंदर वास्तु दडल्या आहेत, त्यांचाकडॆ लक्ष जाईल तेव्हा नं

आकार देण्याचे काम काय फक्‍त शिल्पकाराने आणि कुंभारानेच करावे ?दर्यामहाल आणि राजभवन
ह्या टोपली खाली दडलयं काय ?

मस्त , मस्त आणि एकदम टॉप.

एका वेळी अर्धा किलो फस्त.


Friday, May 20, 2011

बेसनाचा थाळा आणि बेसनाचे लाडु

कालपासुन राजाभाऊ जबरदस्तीने बेसनाचे लाडुच खात आहेत.बेसन उरले त्याचे लाडु झाले. आपल्या नवऱ्यापेक्षा दुसरा कोण मिळेल जो मुकाटयाने सकाळसंध्याकाळ लाडु गिळत राहील ?

Thursday, May 19, 2011

एक बहरलेला सुंदर गुलमोहर, एक छानसा फोटो आणि एक अप्रतिम प्रतिक्रिया

दुसरा फोटो....(एक जीवन बहरलेले दुसरे वठलेले.)Ugich Konitari has left a new comment on your post "गुलमोहर": 

"मावळातील एक पाखरांची पहाट,
पुण्याबाहेरच्या माळरानावर
आसमंतात नजर लाउन बसलेल्या
एक काटक आजीबाई ;
ते बहरलेले दिवस ,
केशरी बुट्टे , हिरवी पैठणी ,
दोन्ही खांद्यावर पदर घेउन
खालच्या पायवाटेवर पडलेली सावली ,
सगळं सगळं आठवून ,
गेलेल्या हिरव्या दिवसांची वाट पहात ,
आपली दुखणारी पाठ सांभाळत
थोडा वाकतात ....

आणि एकदम 
एक छोट्या मुलीचा
लाल बांगड्यांनी नटलेला हात
पुढे येतो.....
"आजी ! आमच्या हिरव्या शाळेत किनई ,
एक वसंत ऋतू च नृत्य बसवलंय ,
हि हाताची मुद्रा कशी वाटली ग ?


आणि आजी
आपल्या मागील आयुष्याच्या
वसंतात बुडून हरखून जातात ....... "वा.  


केवळ एवढी नितांतसुंदर प्रतिक्रिया "उगीच कोणीतरी " नीं आपल्या पोस्ट वर करावी , केवळ केवळ या साठीच ब्लॉग लिहला जावा.

Tuesday, May 17, 2011

वाटलं होतं

आपल्याला फार चुकीचे वाटल्याबद्द्ल राजाभाऊ खुष होवुन गेले. चला कधी तरी आपले चुकले (?) 

वाटलं होतं अभिरुचीत झालेल्या प्रचंड उलटापालटीत हा अंमलताश हरवुन गेला की काय ? हा बहावा आपण कधी काळी बहरत होतो हे विसरुन गेलायं की काय ?

पण नाही, त्याचे सौदर्य आता अधिकच खुलुन उठलयं. अभिरुची आता कात टाकतेयं आणि हा पाठीमागचा नटलेला परीसर त्याच्या मोहवुन टाकण्याच्या गुणात आणखीन आणखीन भर टाकतोयं.