Tuesday, May 17, 2011

आक्रोश.

आक्रोश राजाभाऊंनी कितीही केला तरी तो काही प्रियदर्शनच्या कानी पडणार आहे का ? 

आता आपल्यावर "मिसीसीपी बर्नींग " ची उघड उघड सेम टु सेम सीन चोरत त्याची भ्रष्ट हिंदी आवृती काढुन चौर्यकर्म केल्याचे आरोप कोणी करु नये केवळ ह्याच साठी , ह्याच साठी केवळ मग इतर चित्रपटातील दोन चार दृष्य कॉपी करावी लागली असली तर त्यात प्रियदर्शनचा काय दोष ? आणि मग दोषारोप टाळण्यासाठी हिंदी खिचडी पकवावी लागली  त्यात काय मोठेसे ? 

ह्या अश्या चित्रपटांच्या वाऱ्यालाही न फिरकणारे का कोण जाणे , प्रियदर्शनचे नाव वाचल्यानंतर किंवा आपल्या "त्या" तिला बघुन प्रियदर्शन चित्रपट पहायला बसले. बसले तर बसले सबंध, आख्खा चित्रपट पहाण्याचे धाडसही आयुष्यात पहिल्यांदा दाखवत राहीले. 

आपणच आपल्यावर अत्याचार करत मग आक्रोश करण्याची त्यांना फार मोठी हौस आलेली. भोगताहेत आता आपल्या कर्माची फळॆ.

तो गाडीच्या टपावर बसुन जंगलात झाडांवर उड्‍या मारत मारत , कोणत्या चित्रपटात का सीन होता हे काही केल्या लक्षात येत नाहीत.  

हा सीन नक्कीच मिर्चमसाल्यात होता काय ? ह्या घटना नक्की कुठेशी , कोणत्या प्रांतात घडताहेत ? मधेच हा दुसरा प्रांत कुठुन येतो ? 

हा चित्रपट आपल्या बापाला बघायला लावल्याचे प्रायचित्त त्यांच्या चिरंजीवालाही भोगावे लागले. आता पुढे काय होणार ? आता हा कसा वागणार , तो काय करणार हे प्रसंग सुरु होण्याच्या आधीच आपल्या पिताश्रींनी त्याला ऐकवल्यामुळे कंटाळा आला तरी तो सांगायचा कुणाला ?

No comments: