बालगंधर्व.
बालगंधर्वांविषयी वाचले होते, त्याचे ध्वनीमुद्रीत गाणे ऐकलेही आहे.
आज त्यांना पाहिले.
गिरगाव, मुंबई, मराठी माणसांचे उरलेसुरलेले संस्थान.
सेंट्रल सिनेमा.
राजाभाऊंना वाटलंच कसं , आयत्या वेळी आपण जावु, तिकीट हवी तेवढी मिळतील ?
पुढच्या रांगेतले का होईना पण मिळाले.
सेंट्रल सिनेमा.
"बालगंधर्व" चा तीन वाजताचा खेळ.
आधीचा चित्रपट तीन वाजुन गेले तरी सुरुच. प्रतिक्षेनंतर आत प्रवेश. ते ही फक्त एक दार उघडुन,
२० - २५ % बालगंधर्वांचे चहाते आत शिरतात न शिरतात तो चित्रपट सुरु केलेला.
मग पहिले गाणे परत, सुरवात परत.
अडाण्याचा कारभार सारा.
ता.क.
राजाभाऊंचा मुलाला कळले आपले आईवडील बालगंधर्वला गेले आहेत. विचार करतोय हे पुण्याला गेले कधी आणि बालगंधर्वात चित्रपट दाखवतात का ?
No comments:
Post a Comment