Sunday, May 08, 2011

खडपोलीचे श्री. धनंजय बापट.

जे काही सांगायचे होते ते राजाभाऊंनी श्री.बापटांना आवर्जुन कळवले.

"आज माझ्या डोक्यावरचे ओझे उतरले. मी तुम्हाला बोललो होतो त्या प्रमाणे मी केले असते " 
श्री. बापटांनी उत्तर दिले.

आयुष्यात काहींशी परीचय आपला अगदी अल्पावधी काळासाठी झालेला असतो, पण तो कायमचा स्मरणात रहातो. पुन्हा त्यांची आपली गाठभेट झालेली नसते, त्यांचा आणि आपला साधा संपर्कही तुटलेला असतो.

पेडांब्याला एका स्नेह्यांची घरी राजाभाऊ गेलेले.
कोकणात शेकडा दराने आंबे मिळतात असे ऐकलेले.
श्री. बापटांकडे ते अनुभवले.

एकेक आंबा एकदम चोख. बावन्नकशी सोने. 
चव अजुन रेंगाळालेली. मनात आणि तोंडात. किती वर्षे लोटली असतील त्याला ?
दरवर्षी निदान आंब्यांसाठी का होईना पण या परिसरात जाण्याचा विचार अंमलात कधीच न आलेला.

"एकही आंबा जरी लासा निघाला तर मी तुमचे संपुर्ण पैसे परत करीन "

प्रत्येक आंबा जणु अमृत.

दरवर्षी श्री. बापट व त्यांच्याकडच्या आंब्याची हटकुन आठवण होतेच होते.

No comments: