आपण काढलेल्या एखाद्या फोटोवर Ugich Konitari
यांनी रुचकर प्रतिक्रिया द्यावी, केवळ या साठीच फोटो काढले जावेत.
आयुष्याच्या चुलीचे तीन दगड,
आईवडील,
सासूसासरे ,
आणि नवरा ;
कधी चटके, कधी धूर ,
कधी फोडणीची तडतड ,
कधी आनंदाने उकळणारी आमटी,
एखादं भाजणार बोट ,
शिजणाऱ्या आंबेमोहोर चा सुवास,
चुलीत शिजणारे छोटे छोटे बटाटे ,
कधीतरी एखादं जळक लाकूड ढकलावं लागत ,
कधी कधी मोठा ज्वाळ होतो ,
कधी तर फुंकणीने
कुणाच्यातरी हातावर फुंकर घालावी लागते,
अगदी डोळे पाणावतात ,
आणि जेव्हा ती
कौतुकाने आपल्या मुलांना
गरम भाकऱ्या करून वाढते
तेव्हा
चुलीचे तिन्ही दगड
दीर्घ श्वास घेउन,
ज्वालांना गप्प करून
हळू हळू सुखावून
शांत होतात ......
3 comments:
'चुलीचे तीन दगड' - पहिलेच कडवे किती छान !
TUMHI TAR KAVI PAN AHAT.......need to update someone that u already write poetry.......very enlightning
चुलीवरच्या जेवणाची मजाच वेगळी. मी वेंगुर्ल्याला असताना लहानपणी आजीकडे चुलीवरच जेवण जेवलोय. त्याची चव आयुष्यभर लक्षात राहील. आणि तुम्ही चुलीचे फोटो पोस्ट केल्यामुळे जुन्या आठवणी ताज्या झाल्या .
धन्यवाद
Post a Comment