दुसरीकडे बेहिशोबी राजाभाऊ हिशोब करुन राहीले "अरे मिडनाईट बुफे म्हणे स्वस्त असतो की मग तो खावाच"
कधी नाही ते त्या रात्री राजाभाऊ विचार करुन राहिले " मिडनाईट बुफे माणसी रु. २९९ व इतर वेळीचा दर रु.५९९. पण या ५९९ रुपयात एकावर एक फुकट , मग हा स्वस्त कसा ? हिशोब काही पचनी पडेना, त्यात "आता वाजले की बारा " ला अर्धा तास बाकी. भुकेने पोटात आणि भेज्यात थैमान मांडलेले. "व्हिट्स " मधे मध्यरात्री जेवायचे करुन मुंबईवरुन गाडी हाणलेली.
ह्या सुमारास तेथे फक्त बर्गर व सॅंडवीझस मिळणे ते आत्ताच्याला खाणॆ नको, काही खरं नाही राजाभाऊ. चला निघा येथुन.
जे खाल्ले गेले नाही ते
हं, आता पुढे काय ? परत मागे फिरुन सयाजीत जायला आलेला कंटाळा, बायकोला बोलायला काय जाते ?
आता मध्यरात्री कुठे बरं जेवण मिळु शकेल, कुठे मिळेल ? कुठे मिळेल ? " मॅरीयटस" मधे नक्कीच मिळु शकेल.
राजाभाऊ तेथे पोचेपोचेस्तो बुफे बंद झालेला.
मग त्यांनी सब्जी बिर्याणी व एक सब्जीकी हांडी ही भाजी मागवली.
पण नाही तितकीशी मजा आली. एक तर भुकेल्यापोटी अन्नाच्या प्रतिक्षेचा काळ फार दिर्घ होवुन जातो त्यात परत चव काही जमली नाही.
जेवल्यावर आपण हजार रुपये केवळ दोन पदार्थांसाठी वाया घालवल्याची चुटपुट घेवुन रात्री दिड वाजता ते घरी पोचुन राहिले.
आता घरी आल्याआल्या तुलाच जेवण बरोबर घेवुन निघायला नको असे बायकोच्या अंगावर डाफरायची खरं तर काहीच गरज नव्हती. चटक लावायला कारणीभुत तेच.
पण आलेला राग कोणावर तरी काढायला लागतो , दुसरे सॉफ्ट टार्गेट कोण सापडते काय ?
No comments:
Post a Comment