Sunday, May 08, 2011

आस्वाद मधे चवीचवीने

तर अश्या रितीने राजाभाऊ "आस्वाद " मधे पोचले.

दुपारचे तीन वाजलेले. सणसणीत ऊन.
अंगाची काहीली काहीली झालेली.
बाहेर आग ओकणाऱ्या सुर्यानी पेटवलेला वणवा आणि पोटातील वडवानल.
जालीम उपाय.

आंबाडाळ आणि कैरीचे पन्हे.


पन्हं अजुन एक.


राजाभाऊंच्या बायकोनी मागवली " आमरस व पुरी "
आमरस व पुरी.
जी राजाभाऊंनीच फस्त केली.


आकंठ आणि तुडुंब भरण्यासाठी मग पोळा उसळ. चटकदार मटकदार.

आणि हो , त्या आधी त्यांच्या दुकानात खाल्लेले दोन उकडीचे मोदक, चारपाच आंबावड्या व आलेपाक.


पंचवीस वर्षापुर्वी लहान जागेत सुरु झालेले आस्वाद आता आस्वाद म्हणे.

1 comment:

रोहन चौधरी ... said...

खरंय मस्त आहे आस्वाद... पार्काच्या आजूबाजूला येणे झाले की जिप्सी नाहीतर आस्वाद ठरलेली असतात... :)