Tuesday, November 05, 2013

बापदे्व व पिकॉक बे

बापदेव - एक मस्त घाट.
पुण्याच्या अगदी म्हणजे अगदी जवळ.
मस्त पावसाळी माहोल. आल्हाददायक, चित्तवृत्ती प्रफुल्लीत करुन सोडणार्रे वातावरण. हवेमधे भरुन राहिलेला गारवा आणि जेथे पहावे तेथे फक्त हिरव्या रंगाचे गालीचे.

रस्ताचे नुतनीकरण नुकतेच झालेले. गुळगुळीत मस्कासारखा रस्ता.
खाली पसरलेले पुणे वरती घाटावर आपण. मजा आली लॉंग ड्रायव्हींगला.
सोबत ती. पण म्यान केलेला कॅमेरा. उगीच भिजुन हा तरी खराब व्हायला नको करत.

आपल्या घराजवळ एवढा मस्त रस्ता आहे पिकॉक बे व त्या पुढचा आणि राजाभाऊ तुम्हाला तो ठावुक नसावा ?
परतण्याची घाई नसती तर आणखीन पुढे जाण्याचा बेत होता.
आता जरा चांगला पाऊस होवु द्या, गाडी ह्या दिशेने वळवलीच समजायचे.

गिरगाव रंगावली ग्रुप

संपुर्ण वर्ष ज्याची आतुरतेने वाट पाहिली आणि हे संपुर्ण वर्षे ज्याच्या आठवणीत रमायचे आहे ते गिरगाव रंगावली ग्रुपनी आयोजीत केलेले अप्रतिम रंगावली प्रदर्शन आज पाहण्याचा योग जुळुन आला.

ह्या सर्व कलावंताचे कौतुक करावे तेवढे थोडेच. ह्या रांगोळ्या कश्या आहेत हे शब्दात सांगणे कठीण आहे. त्याची अनुभुतीच घेतली पाहिजे.

अश्याच स्पर्धा

राजाभाऊंच्यावर पण कधीतरी मान खाली घालुन गुपचुप तेथुन निघुन जाण्याची वेळ येते.

अश्याच स्पर्धा चालल्या होत्या.

"ज्यांचे पोट सर्वात मोठे आहे त्यांनी पुढे यावे "

राजाभाऊ समोर जवळजवळ धावतच गेले. त्यांना खात्री होतीच, हे बक्षिस केवळ आपल्यासाठीच आहे. मग इतरजण हळुहळु येवुन बाजुला उभी राहिली. 

शेवटला त्यांचा एक सहकारी येवुन उभा राहिला. 
त्यांना बघुन राजाभाऊ गुपचु स्टेजवरुन खाली उतरले. 
आधीच माघार घेतलेली बरी.

पण दुसऱ्या एका स्पर्धेत राजाभाऊंना बक्षिस मिळाले.

" कमरेला लावलेला पट्टा सर्वात लांब कोणाचा आहे ? "

सत्ता

सत्ता मिळवण्यासाठी काही ना काही बांधायलाच लागते, काही तरी उभारावेच लागते.

अपवाद. ज्याची समाजाला आत्यंतीक गरज आहे, ज्याच्यातुन गोरगरिबांचा फायदा आहे, तेवढे सोडुन.

दिवाळीच्या पोस्ट

अचानक तुम्हाला सलाम झडु लागले की समजायचे दिवाळी आली.

कष्टकरी माणसांनी दिवाळीच्या पोस्ट साठी एवढे लाचार होवु नये.

रात्र काळी,घागर काळी,यमुना जळे ती काळी हो माय !.

रात्र काळी,घागर काळी,यमुना जळे ती काळी हो माय !.

अलिकडे केव्हा तरी कोणत्यातरी पुस्तकात या गौळणीचा ओझरती उल्लेख वाचला होतो, मग ते गाणे तुटक तुटक डोक्यात नुसते भिरभिरत राहिले. याचा अर्थ काय उमजत नव्हता. 

रात्र काळी, हो ती काळी असते, काळीकुट्ट असते, जंगलात, पर्वतमाथावर, दरीत, गुहेत, गुंफात, लेण्यातल्या मुक्कामात अनुभवली होती. पण यमुना काळी ? घागर काळी ? गोऱ्यागोमट्या कृष्णसखीची घागर काळी ? काळे विषारी पाणी , कालीयामर्दनाने ?

ज्या यमुनेच्या तीरी कृष्णाच्या मुरलीच्या नादाने भुलुन जावुन त्या साऱ्या गोपी, गोपीकृष्णासंगे रासाचे नृत्य करायचे त्या यमुनेचे रुप कसे हे असे काळॆ ? मग या अश्या ह्या नदीकाठी कश्या काय या लीला घडत असतील ? विरहणी कश्या बहाणे काढुन कृष्णसख्याला भेटायला येत असतील ? या यमुनेचे रुप तर कसे साजरे, लाजरे, गोजीरवाणे, देखणे हवे . यमुना काळी ? रात्र काळी ? घागर काळी ? जेथे कृष्ण तेथे तर सर्व कसे आनंदमय असायला हवे.

मग ही यमुना अशी यमुना-कालिंदी का ? का ? का ?

मग त्याचे उत्तर दुर्गाबाई भागवतांच्या "पैस" मधे सापडले.

"यमुना नि दु:ख याची सांगड परंपरेने घातली आहे. मरण, विरह, निराशा यांचे कल्लोळ तिच्यात सतत परंपरेने उठवत ठेवलेले आहेत . भयाणाची जाण तिला पाहूनच होते.

पुढे त्या लिहितात,

" यमुना नि मृत्यू यांची सांगड वैदिक यमयमीच्या भग्न प्रेमकथेत आहे. लहानबहिण वडील भावावर प्रेम करते. त्या काळी हे प्रेम अनोखे नव्हते. पण यम हा नितिधर्माचा नवा पुरस्कर्ता. तो हे प्रेम सफल होवु देत नाही. बहिणीशी लग्न करणे पाप ठरवून तिला निराश करतो. यमी विकल होते.

यम हा प्रथम मरण पावणारा माणुस सुद्धा होता. तो सूर्यपुत्र तसाच मानवही आहे आणि म्हणूनच यमी नदीरूपाने मानवलोकी आली, पण यमीची खरी शोकात्मिका यमाच्या मरणात आहे.

विरहात ती त्याच्यावर प्रेम करत जगत होती. तो मेल्यावर ती शोकाकुल झाली, वेडी झाली. तिला दु:खाचा विसर पडावा म्हणून देवांनी रात्र केली. यमी झोपली. दु:ख विसरली. काळ्या यमुनेला काळ्या रात्रीचा आसरा प्रथम इथेच मिळाला. ही काळी कालिंदी शोकाने विकल झाल्यानंतर काळ्या रात्रीमुळे स्थिरावली. यमीला साधले नाही ते यमुना नदीने साधले. यमाला भाऊ म्हणून जेवायला बोलावले. बिजेचा काळा रंग उजाळला. "

चंद्रगुप्त

सेनाभवनाच्या समोरच्या कोपऱ्यावरचा इराणी. बंद पडला. त्याची जागा "चंद्रगुप्त" नी घेतली. राजाभाऊ येथे कधीच गेले नसल्यामुळे ते या सेनाभवनाच्या समोरच्या कोपऱ्यावरचा इराणी. बंद पडला. त्याची जागा "चंद्रगुप्त" नी घेतली. राजाभाऊ येथे कधीच गेले नसल्यामुळे ते या रेस्टॉंरंत बद्द्ल काहीच बोलु शकत नाही. 
पण आजुबाजुची सर्व ठिकाणे तुफान चालत असतांना हे बंद झाले. याची जागा " इंदुज किचन " नी घेतली. बार आणि फॅमेली रेस्टॉंरंट हे नाव मिरवणाऱ्यांच्या राजाभाऊ अजिबात वाऱ्यालापण उभे रहात नाहीत. पण त्या रात्री ते गेले. कदाचित पुण्याच्या त्यांना आवडलेल्या " इंदुज किचन " पैकी हे असेल करुन ते गेले. आत जावुन बसले व तसेच न जेवता बाहेर उठुन आले.

काही ठिकाणी नाही जेवावसं वाटतं.

मग ते बंद झाले, त्याची जागा परत "चंद्रगुप्त" नी घेतली. आता परत ते ही बंद झालेले दिसले. आत काहीतरी काम सुरु आहे.
त बद्द्ल काहीच बोलु शकत नाही.
पण आजुबाजुची सर्व ठिकाणे तुफान चालत असतांना हे बंद झाले. याची जागा " इंदुज किचन " नी घेतली. बार आणि फॅमेली रेस्टॉंरंट हे नाव मिरवणाऱ्यांच्या राजाभाऊ अजिबात वाऱ्यालापण उभे रहात नाहीत. पण त्या रात्री ते गेले. कदाचित पुण्याच्या त्यांना आवडलेल्या " इंदुज किचन " पैकी हे असेल करुन ते गेले. आत जावुन बसले व तसेच न जेवता बाहेर उठुन आले.

काही ठिकाणी नाही जेवावसं वाटत.

मग ते बंद झाले, त्याची जागा परत "चंद्रगुप्त" नी घेतली. आता परत ते ही बंद झालेले दिसले. आत काहीतरी काम सुरु आहे.

बार आणि फॅमिली रेस्टॉंरंट

बार आणि फॅमिली रेस्टॉंरंट हे नाव मिरवणाऱ्यांच्या राजाभाऊ अजिबात वाऱ्यालापण उभे रहात नाहीत. पण त्या रात्री ते गेले. गेले ते गेले सोबत आपल्या फॅमिलीला घेवुन गेले. 

कारण एकच. एका वार्ताहरानी यावर त्यांच्या खाण्याबद्द्ल स्तुती केलेला वर्तमानपत्रातील लेख. काय तारीफ केली होती, काय तारीफ केली होती की कधी न भुलणारे राजाभाऊ भुलले. 

आता आयुष्यभर आठवत बसले आहेत आपण कसे फसलो हे. 

ज्यांना या विषयात गती नाही त्यांनी खाण्याबद्दल लिहु नये,

प्रयोजनच काय

रस्त्यातुन आपल्या आजुबाजुने भरधाव वेगात जाणाऱ्या गाड्‍यांपेक्षा समोरुन संथ गतीने जाणारी गाडी जास्त धोकादायक. तिच्या मुळे अपघात होणाची शक्यता जास्त असते.

हळुच जायचे असेल तर डावीकडच्या रांगेतुन जायचे.. सर्वात उजवीकडच्या रांगेत यांचे येण्याचे प्रयोजनच काय ?

डय़ूटी फर्स्ट " दिवाळी.

"लोकसत्ता चतुरंग " मधला लेख. - 02/11/2013
"त्यांची " डय़ूटी फर्स्ट " दिवाळी. " 

आणखी काही जणांसाठी डय़ूटी फर्स्ट असते. आणि ती डय़ूटी फारसी सुखदायक नसते. 

लक्ष्मी ज्या वास्तुत स्वच्छता आहे त्या ठिकाणी वास करायला येते. आपली वास्तु स्वच्छ होत असते व त्यातली सारी अस्वच्छता, घाण बाहेर रस्तावर येत असते. 

दिवाळी पहाटे आपले अभ्यंग स्नान चालते, नविन कपडे, अत्ताराचे फवारे. 

मात्र ही माणसं पहाटे पासून आपण केलेल्या घाणीत , कचऱ्यात , त्याच सांडपाण्यानी भरलेल्या घरगल्ल्यांमधे कामं करीत असतात. ते साफ करण्यासाठी, आपली घाण वाहुन नेण्यासाठी.

मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांना हॅट्स ऑफ.

ह्यांच्याच मुळॆ केवळ ह्यांच्याच मुळे आपले शहर स्वच्छ रहात आहे.

दत्तात्रय.

एका मराठीमोळ्या उपहारगृहाची सकाळी आठवण झाली. 

अलीकडेच ते बंद पडले. ते बंद पडण्याच्या काही महिने आधी राजाभाऊ तेथे जेवायला गेले होते. तेव्हाच त्यांना ह्याची अनिष्ट चाहुल लागली होती. 

पदार्थांचा दर्जा थोडाफार घसरला होता.

कैक वेळा तिथे जेवण व्हायचे. आता होणे नाही,

दत्तात्रय. 
दादर.

मा. आमदार

जसे प्रो. म्हणजे प्रोफेसरच असतील असे नव्हे , ते प्रोपरायटर पण असु शकतात.

अगदी तसचं.

मा. आमदार म्हणजे माजी आमदार असु शकतात. माननीय नव्हेत.

खुर्ची गेली तरी बिरुदे मिरवण्याची हौस नाही फिटली.

सिक्स्थ सेन्स

असच एकदा वैतागुन लिहिलेले.

’सिक्स्थ सेन्स ’ या वातानुकूलीत आणि अत्याधुनिक मॉलच्या तळमजल्यावर "व्हेज ऑलवेज" नावच रेस्टॉरण्टही सुरू केलं आहे. येथे कॉन्टीनेण्ट्ल, इंडीयन, चायनीज असं तिन्ही प्रकारच हेल्दी, चविष्ट फूड मिळेल. एखादं रेस्टॉरण्ट समोरुन कितीही स्वच्छ दिसतं असलं तरी त्यांच किचन मात्र अस्वच्छच असणार हे आपण गॄहीतच धरलेलं असतं. पण "व्हेज ऑलवेज"चं किचन अतिशय स्वच्छ व प्रशस्त आहे. विशेष म्हणजे इथे आलेला प्रत्येक खवय्या किचनमध्ये जेवण कसं तयार केलंजातं हे समोर लावलेल्या स्क्रिनद्वारे प्रत्यक्ष पाहूही शकतो आणि दुसरीकडे मॉकटॆल काऊण्टरवरुन आपल्या आवडत्या मॉकटेलचा आस्वादही लुटु शकतो.

वर्षारंभ विशेष, महाराष्ट्र टाइम्स मधे उपहारगृहाचे वर लिहीलेले वर्णन वाचले. मुंबईत एखादे मस्त उपहारगृह सुरु झाले आहे आणि आपण अजुन त्याला भेट दिली नाही काय हे राजाभाऊ ?

प्रभादेवी एवढाच उल्लेख वर्तमानपत्रात आला होता, तो धागा पकडुन राजाभाऊ सहकुटुंब सहपरीवार भोजन करायला निघाले. शोधत शोधत असे वाट पुसत पुसत , अरे मराठी माणसानी एवढे मॉल उभारले पण या परीसरातील कोणालाच काहीच ठावुक कसे नाही याचा विस्मय करीत दरमजल करीत अखेरीस परळ एस्टी डॆपो मागे, झेंडु फार्मसुटीकल समोर पोचले. आणि

न जेवता ही तृप्त होवुन ते परतले.

धन्य त्या वार्ताहराची. अजुन कशाचा कशाला पत्ता नाही. बांधकाम सुरु आहे, अर्धवट अवस्थेत सर्व काही आहे आणि त्या आधी तो पठ्ठाने आम्हाला चक्क जेवायला तेथे धाडले.

टॅक्सीचे बिल, झालेल्या मनस्तापाची भरपाईची रक्कम त्या वार्ताहराकडुन वसुल करायला हवी.

ता.क.

पण एकदा का राजाभाऊंनी खाण्याच्या बाबतीत ठरवले की ठरवले. ते सतत हे सुरु झाले का याचा सुगावा काढत राहिले आणि जसे सुरु झाले तसे ताबडतोब तेथे जेवायला पोचले. जेवण, आतले वातावरण आवडले होते.

हे उपहारगृह बंद झाले आहे..

रेडीयो पंजाब.

रेडीयो पंजाब.

जेव्हा खिशात पैसे नसायचे, अंधेरी भागात जेवणाच्या वेळी जाणे व्हायचे तेव्हा ह्या सिंधी माणसाच्या "रेडीयो पंजाब " चा सहारा असायचा. 

स्वामी विवेकानंद रस्तावर अंधेरी स्थानकाबाहेरचे हे पंजाबी जेवण मिळण्याचे ठिकाण. स्वस्त आणि मस्त. अगदी साधेच. भाज्याही आपल्या तशाच साध्यासुद्या. 

हे नक्की कुठे होते ते येथुन जातांना प्रत्येक वेळी आठवण्याचा राजाभाऊ प्रयत्न करत असतात, पण नाही आठवत.

राजधानी

"राजधानी " 

जेथे गुजराती जेवणाची पर्वणी असते, जे गुजराती माणसांचे प्राबल्य असलेल्या विभागात असते ते पण बंद पडावे ?

राजधानी. चर्नी रोड रेल्वे स्थानकाजवळ.

उणीव

आयुष्यात दोन ठिकाणांची उणीव फार जाणवते. 

उपहारगृह येतील आणि जातील ही, पण मरीन ड्राइव्ह वरच्या नटराज हॉटेलमधे तळमजल्यावर बाहेरच्या बाजुस असलेल्या "यांकी डुड्ल्स " सारखे दुसरे आईसक्रीम पार्लर परत येणे नाही. 

रात्र चांगली चढत गेली की गाडी काढायची , नटराजच्या कोपऱ्यावर असलेल्या ह्या उघड्यावरच्या ठिकाणी मोकळ्या हवेत, समुद्रावरुन येणाऱ्या वारा अंगावर घेत, तिच्याबरोबर "चिक चॉक " , "कसाटा " खाणे ते ही फक्त दोघांसाठीच असलेल्या झोपाळ्यावर बसुन. गप्पा गोष्टी करत. लग्न नुकतेच झालेले.

कधी झोपाळा रिकामा नसायचा मग आपला झालेला विरस आईसक्रीम खात खात विसरुन जाणॆ. 

खुप मस्त दिवस ते होते.

आणि दुसरी जागा म्हणजे वॉर्डन रोडवरचे " स्नोमॅन्स "

"सॉफ्टी " आईसक्रीम म्हणजे काय असते हे ह्या मुळॆ समजले. चांगले ग्लास भरुन यायचे. त्या काळी जरा नवलाई वाटायची. असचं रात्री कधीतरी गाडी काढायची येथे खायला जायचे. येथल्या माहोलची मजा घेत घेत मस्त पैकी " सॉफ्टी " चाटुन पुसुन खायची. 

कधीतरी हे बंद झाले आणि त्याची जागा "Gelato " आणि "MOD" नी घेतली. आता त्या जागी कधीच्या काळी जाणॆ होते, खास दरात मिळत असल्यामुळे. पण आता बाजारात आलेली नविन नविन कितीही आईसक्रीम खाल्ली तरी "स्नोमॅन" ची चव विसरणे नाही.

सध्या ह्या जागी नविन काहीतरी येत आहे.

तळोजा

कोणे एके काळी तळोजाला मिळणारी बिर्याणीची शान अलग होती. रात्री मुंबईमधुन मुद्दामुन खास बिर्याणी खाण्यासाठी गाड्‍या भरभरुन खवय्ये मंडळी वाट वाकडी करुन जायची. मग वाशी पुल बांधला गेला, तळोजा मार्गे होणारी मुंबई-पुणे वहातुक मंदावली आणि मग याची क्रेझ ओसरत गेली.

जेव्हा हे बिर्याणी प्रकरण ऐन भरात होते तेव्हा राजाभाऊंकडे गाडी नसल्यामुळे जाणे झाले नाही. 
काही वर्षापुर्वी तळोजाला जावुन ही बिर्याणी खायला ते गेले, पण तो पर्यंत खुप उशीर झाला होता.

आता बिर्याणी मिळते का नाही ठावुक नाही.

ओके. नो प्रॉब्लेम

काही छोटीसी समस्या निर्माण झालेली असते.
समोरच्याला ती सांगता. समोरुन जबाब येतो " ओके. नो प्रॉब्लेम "

मग दुसऱ्याला ती सांगता.
मग त्यालाच त्याचे म्हणणे कसे बरोबर आहे हे अर्धा अर्धा तास तुम्ही समजवत रहातात. 

पुढच्या वेळी संपुर्ण व्यवहार हा पहिल्याकडे वळवला गेलेला असतो.

अंकातील कथा नकोत

अंकातील कथा नकोत पण जाहिराती आवरा

राजाभाऊ तुम्ही समजुन जा

जेव्हा एखादी तरुणी जेष्ठ नागरीकांसाठी राखीव जागेवर बसलेली उठुन तुम्हाला बसायला जागा देते तेव्हा राजाभाऊ तुम्ही समजुन जा.

सोपा उपाय

एका कथेतला प्रसंग राहुन राहुन आठवतो. खास करुन त्या वेळी.

शेतामधले शेतकऱ्याचे घर. घराबाहेरची उंच पायरी. खाली उतरायला सोईस्कर पडावे म्हणुन ठेवलेला एक मोठा चपटा दगड. 

सततच्या वापराने तो जेथे नेहमी पाय ठेवले जातात त्या भागात घासुन घासुन खुप झिजतो. चांगले भोक पडायला लागते. मग तो शेतकरी एक सोपा मार्ग शोधतो. तो उचलुन उलटा करतो.

मग त्याच्या लक्षात येते हा सोपा उपाय त्याच्या आजोबांनाही सुचला होता.

बाटलीतला शांपु संपलेला असतो. सोपा उपाय म्हणजे त्यात पाणी टाकुन बाटली चांगली उलटीसुलटी करायची, दोनपाच स्नानं त्यात निघुन जातात.

राजाभाऊंनी पण आज तसेच केले.

मग त्यांच्या लक्षात आले, हा सोपा उपाय त्यांच्या आधी बायकोला पण सुचला होता.

Monday, November 04, 2013

कॉपर चिमणी

लिंकीग रोड व स्वामी विवेकानंद रस्त्यावरुन जो रस्ता वांद्रे रेल्वेस्थानकाकडे जातो तेथे कोपऱ्यावर "कॉपर चिमणी " सुरु झाले होते.

आता वरळीच्या लोटस कोर्ट मधल्या कॉपर चिमणीची सर दुसऱ्या कोणत्याच कॉपर चिमणीला येणारी नसली तरी पण केवळ या नावावर हे रेस्टॉरंट चालायला हरकत नव्हती.
किती तरी दिवस झाले राजाभाऊंच्या डोक्यात R.T.I नुसतं घुसुन राहिले आहे. 

R.T.I मधे कधी मागवायचे, मागवायचे करता करता दिवस पुढे भराभरा सरकत चालले आहेत. पण हे R.T.I प्रकरण काही हाती लागत नाहीयं. 

किती वेळा त्याच्या जवळ जाणॆ झाले पण तरीही लांब रहाणे झाले..

आता उद्याला नक्कीच मधे R.T.I डाल नी पोरी, भाकरा, चॉकलेट टार्ट, लेमन टार्ट , केक , बटाटा वडा आणायला जातोच. येथे पारसी पध्दतीचे जेवण पण चांगले मिळते असे ऐकुन आहे. पण शाकाहारी असल्यामुळॆ त्यापासुन दुर रहावे लागते.

हे R.T.I म्हणजे Right To Information Act नव्हे तर Ratanbai Tata Institute. ह्युजीस रोड वरचे.

यांनी मध्यंतरी त्यांच्या जागेत एका हॉलमधे रेस्टॉंरंट सुरु केले होते . मला वाटतं ते फक्त रविवारीच सुरु असायचे , बुफे लंच साठी. सध्याला बुफे मिळतो का नाही ते ठावुक नाही.

वाचायला बसण्याची एखादी जागा

प्रत्येक माणसाची पुस्तक घेवुन वाचायला बसण्याची एखादी जागा आवडीची असते काय?
राजाभाऊंची पण घरात एक जागा आवडीची आहे. तेथे मन कसे वाचनात एकाग्र होते.
पण.
समस्या एकच.
जास्त वेळ तेथे बसता येत नाही.

बाय द वे

गावदेवीला असलेल्या "बाय द वे " बद्द्ल पुर्वी ब्लॉगवर पुर्वी दोन लेख लिहिलेले . 
 
अलीकडच्या काळात तेथे जाणॆ झालेले नाही , त्यामुळे जेवण कसे असेल ते सांगता येत नाही. पण एक मात्र नक्कीच , येथले वातावरण खुप मस्त आहे. कोणालातरी बरोबर घेवुन शांतपणे गप्पा मारत, एकामेकाच्या सहवासाचे सुख घेत जेवायचे असेल तर ह्या सारखी दुसरी जागा मुंबईमधे नसावी. गर्दी अजिबात नसते आणि जेवतांना मॅनर्स न पाळणारे , मोठमोठ्याने आरडाओरडा करत मजा करणारी माणसं येथे कधीच येत नाहीत.

ह्यांच्या मेन्युमधे तसा निवडीला फारसा वाव नाही. पदार्थ अगदी मोजकेच मिळतात , त्यामुळे खाण्याबाबतीत कधीकधी निराशा होवु शकते.

रमण विलास

भर रस्त्यात समोरुन येणाऱ्या एका गृहस्थाची वाट अडवुन राजाभाऊ मधेच उभे राहिले आणि त्यांना जाब विचारला. 

तुम्ही असे का केलेत ? तुम्ही असे का वागलात ?

ते गृहस्थ काहीच बोलले नाहीत. शांत मुद्रेने त्यांनी राजाभाऊंकडे पाहिले व प्रसन्न होवुन खुप गोड हसले. त्यांना झालेली खुषी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसुन येत होती. त्यांना हा प्रश्नाचा आनंद झाला होता.

"तुम्ही तुमचे "रमण विलास " का बंद केलेत ? "

शाळेसमोरचे , दोन देवळासमोरचे ते दाक्षिण्यात पदार्थ मिळण्याचे उपहारगृह होते. अस्सल अगदी अस्सल डोसे तेथे मिळत. राजाभाऊंना रवा डोश्याची चव आणि चटक लागली ती ह्यांच्याच मुळे.छोटेसेच हे उपहारगृह होते

आजच्या रात्री गिरगावात जातांना ह्या शाळेतल्या सुखद आठवणी जाग्या झाल्या आणि ती जागा, ती चव आठवु लागली.

मग कधीतरी त्यांनी हा व्यवसाय बंद करुन स्पेयर पार्ट्सचे दुकान टाकले. हे या वस्तुंचे मार्केट .

गार्डन व्हु

चिंचोली बंदर , लिंक रोड , मालाड . 

हा विभाग जंगल होण्याआधीचे दिवस. 

पण एवढा जुना काळ नव्हता ज्या काळी की तेथे खाडीवर, बंदरावर आपल्या लहान मुलींना फिरायला त्यांचे सासरे घेवुन जायचे . 

बऱ्यापैकी नव्हे तर चांगल्याच मोकळ्या जागा या ठिकाणी होत्या. खाडी बुजवुन तेथे टोलेजंगी इमारती, मॉल बांधण्यापुर्वीचे हे दिवस. 

आपल्या शाहजाद्याच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी राजाभाऊंनी येथले "गार्डन व्हु " नामक रेस्टॉरंट निवडले. रात्री गार्डन मधे बसुन जेवायला मस्त मजा आली होती. (संध्याकाळी बारसं झाल्या झाल्या तडक ते ह्याजागी जेवायला गेले. आपल्या दमलेल्या बायकोचा पण त्यांनी विचार केला नाही ).

नंतर तेथे दोनचार वेळा शांतपणे जाणॆ झाले.

मग ती जागा आकसत गेली, गार्डन गायब होत गेले, आतल्या खोलीत बसण्याची व्यवस्था होत गेली.

शेवटच्या तेथे चांगल्या नसलेल्या अनुभवानंतर परत येथे जेवायला यायचे नाही हे ठरवुन मग कधीच जाणे केले नाही.

मग कधीतरी हे गायब झाले.

वार्षिक भविष्य

ज्या दिवाळी अंकातील वार्षिक भविष्यात वृश्चिक राशीचे भविष्य छान छान लिहिलेले असेल , ज्यात "तुम्हाला समिश्र फळ देणारे असेल " असे लिहीलेले नसेल , तो अंक सर्वात उत्तम

संदिग्धता असेल.

"नोकरी मधे परदेशी जाण्याची संधी निर्माण होईल , पण त्या मधे संदिग्धता असेल. "

- विजयपंत हा मधे "पण नसता तर खुप आनंद झाला असता आणि ही संदिग्धता म्हणजे काय हो. जसा सविस्तर सांगितले असतेत तर बर झाले असते.

फेब्रुवारीपर्यंत शुक्राचे भ्रमण तृतीयात

"वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने मानलं तर समाधान अशी तुमची परिस्थिती असली तरी फेब्रुवारीपर्यंत शुक्राचे भ्रमण तृतीयात राहिल्यामुळे घरामधे चिमुकल्याच्या आगमनाची कुणकुण लागेल. "

- पंत , विजयपंत का हे हे भलतेच. 

आता या वयात कुणकुण ? 

पंत ,पंत , नको , नको हो अशी भविष्य वर्तवुत.

छल कपट

छल कपट केली देवांनी आणि तरीही असुर बदनाम.

शुक्राचे भ्रमण तृतीयात

" तरी फेब्रुवारीपर्यंत शुक्राचे भ्रमण तृतीयात राहिल्यामुळे घरामधे चिमुकल्याच्या आगमनाची कुणकुण लागेल. "

विजयपंतांना बहुतेक जुने दिवस आठवले असतील. त्या काळी म्हणे सास्वा आणि सुना एकत्र जायच्या सुतिकागृहात. 

बाळतं व्हायला.

" काय रे तुझा मुलगा वाटतं. गोड आहे. "

"माझा नाही. माझ्या बापुंचां."

आज पाडवा.

आज पाडवा. 

पतीपत्नी ह्यांच्या नात्यातील गोडवा जपायचा सण. 

सकाळपासुन एक विचार करतोय की एकाची बायको त्याला परत मिळावी ह्यासाठी लाखों बायकांनी विधवा झाल्या , एखादीची अपमानाचा बदला घेण्यासाठी अब्जावधी बायकांनी का आपले पती गमावले.

हे योग्य का अयोग्य ?

भेट

एकाची मातोश्रीला पाडव्याच्या पहाटे भेट 
तर
दुसऱ्याला हवी मातोश्रीकडुन दिवाळीची भेट.

इतना फेकते है

" इतना फेकते है की लपेटना मुश्कील हो जाता है "

मटा मधल्या एका लेखातील वाक्य.

फटाके नको

पर्यावरणावर परिणाम होतो , आपल्याला आवाजाचा, धुराचा त्रास होतो म्हणुन जसे फटाके नको तसेच हे फटाके बनवतांना ह्यात वापरली जाणारी दारु हाताळुन अनेक विकार जडल्यामुळे ज्यांच्या आयुष्याचा नरक झाला आहे अश्या शिवकाशीतल्या बालकामगारांसाठी, कामगारांसाठी ही ते वापरु नयेत.

नथ्थुलाल महाराज का भोजनगृह, भोजनालय

एकंदरीतच काल बायकोच्या माहेरी दिवाळी सणाला जावुन आल्यानंतर मालाड बद्द्ल प्रेम राजाभाऊंच्या मनात भलतचं उतु जावु लागलयं.

मालाडला कुठे कुठे जेवलो होतो ह्याच्या आठवणी ताज्या होवु लागल्या आहेत.

जेव्हा राजाभाऊ एके ठिकाणी त्यांच्या मेहुणीला, साडुंना , भाच्याला घेवुन जेवायला गेले तेव्हा त्यांनी राजाभाऊंच्या मागुन आत शिरतांना नक्कीच त्यांच्याकडे विचीत्र नजरेने पाहिले असणार. हा माणुस चक्रम आहे, विक्षिप्त आहे, चमत्कारीक आहे ह्याचा अनुभव काही कमी नाही, पण म्हणुन का ह्या असल्या ठिकाणी ? 

मालाड रेल्वेस्थानका समोर एक नथ्थुलाल महाराज का भोजनगृह, भोजनालय असे काहीसे नाव असलेले टपरीवजा भोजनालय. त्यांनी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल की हा माणुस अश्या ठिकाणी स्वःत जेवेल व आपल्यालाही जेवायला लावेल. परत नको, नाही म्हणण्याची सोय नाही. आलीया भोगाशी असावे सादर म्हणुन सर्वजण आत जेवायला गेले.

गरमागरम छान फुललेले फुलके जेव्हा ताटात पडायला लागले तेव्हा विचार काहीसा बदलत गेला, हा माणुस युसलेस आहे खरा पण वाटतो तेवढा नाही हो. गरमागरम चविष्ट भाज्या, साध्याच, शुद्ध, डामडौल नसलेल्या, सजवलेल्या नसलेल्या. वैष्णव धाब्याच्या सारखी ही जागा.

जवळजवळ वीसेक वर्षापुर्वी या ठिकाणी जेवण झाले होते. आता हे भोजनालय अजुन सुरु आहे का बंद पडले हे एकदा जावुन पहायला हवे.