Monday, November 04, 2013

नथ्थुलाल महाराज का भोजनगृह, भोजनालय

एकंदरीतच काल बायकोच्या माहेरी दिवाळी सणाला जावुन आल्यानंतर मालाड बद्द्ल प्रेम राजाभाऊंच्या मनात भलतचं उतु जावु लागलयं.

मालाडला कुठे कुठे जेवलो होतो ह्याच्या आठवणी ताज्या होवु लागल्या आहेत.

जेव्हा राजाभाऊ एके ठिकाणी त्यांच्या मेहुणीला, साडुंना , भाच्याला घेवुन जेवायला गेले तेव्हा त्यांनी राजाभाऊंच्या मागुन आत शिरतांना नक्कीच त्यांच्याकडे विचीत्र नजरेने पाहिले असणार. हा माणुस चक्रम आहे, विक्षिप्त आहे, चमत्कारीक आहे ह्याचा अनुभव काही कमी नाही, पण म्हणुन का ह्या असल्या ठिकाणी ? 

मालाड रेल्वेस्थानका समोर एक नथ्थुलाल महाराज का भोजनगृह, भोजनालय असे काहीसे नाव असलेले टपरीवजा भोजनालय. त्यांनी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल की हा माणुस अश्या ठिकाणी स्वःत जेवेल व आपल्यालाही जेवायला लावेल. परत नको, नाही म्हणण्याची सोय नाही. आलीया भोगाशी असावे सादर म्हणुन सर्वजण आत जेवायला गेले.

गरमागरम छान फुललेले फुलके जेव्हा ताटात पडायला लागले तेव्हा विचार काहीसा बदलत गेला, हा माणुस युसलेस आहे खरा पण वाटतो तेवढा नाही हो. गरमागरम चविष्ट भाज्या, साध्याच, शुद्ध, डामडौल नसलेल्या, सजवलेल्या नसलेल्या. वैष्णव धाब्याच्या सारखी ही जागा.

जवळजवळ वीसेक वर्षापुर्वी या ठिकाणी जेवण झाले होते. आता हे भोजनालय अजुन सुरु आहे का बंद पडले हे एकदा जावुन पहायला हवे.

No comments: