Saturday, February 28, 2009

मै चंदा की चांदनी हुं , मै तारोंकी रानी.


आज मनवेधक चवथीचा चंद्र आणि तेजस्वी शुक्र बऱ्यापैकी जवळ आले आहेत. 

आज भारतात आत्ता जर कोण हे वाचत असेल तर त्याने त्वरीत खिडकीतुन,गच्चीतुन , घराबाहेर जावुन , पश्चिमेकडॆ आकाशात डोळे भरभरुन हे दॄश्य न्याहाळावे 

मेहंदी रंग लायी

मनालीला नाही तर नाही , निदान मनालीत तरी


काही माणसं असी असतात की त्यांना आपण कधी भेटलेले नसतो, ओळखत देखील नसतो पण का कोण जाणॆ त्यांच्या बद्दल आपल्या मनात कोठेतरी आदर असतो, आपुलकी असते, ममत्व असते 

हिमाचल प्रदेशातील मनाली येथे हॉटॆल व्यवसाय करणारे श्री. मकरंद कुलकर्णी. त्यांच्या बद्दल ऐकुन होते , कधी तरी वाचनात ही ते येत होते, एक मराठी माणुस आपल्या मुलखापासुन दुर वर हा व्यवसाय करतो म्हटल्यावर कौतुकही होते. दोन तीन वेळा मनालीला जाण्यापुर्वी त्यांच्याशी दुरध्वनी वरुन बोलणॆहे झालेले होते , पण जाणॆ रहित झाल्याने गाठभेट पडली नव्हती.

पुण्यामधे त्यांनी मेहंदळे गॅरेज जवळ रेस्टॉरंट सुरु केल्याचे वर्तमानपत्रात वाचल्यापासुन राजाभाऊची चुळबुळ सुरु झाली होती. तेथे जावुन जेवल्याशिवाय त्यांची जिव्हा व पोट शांत होणार नव्हते  

आज संध्याकाळचा बेत ठरवला होता, सौ. सानीया पाटणकरांचे गाणॆ व मनालीत जेवण. 

पण धीर धरवेना, राजाभाऊ सपत्नीक दुपारीच मनालीला पोचले , दम आलु काश्मीरी, पनीर रसभरे, पुलाव खाण्यासाठी.

चांगली प्रशस्त जागा, चवदार, रुचकर अन्न, जसे हवे होते तसेच.

चोखंदळ पुणेकरांनी मनालीला भर भरुन दाद दिली आहे. भर दुपारी देखील मनाली नुसते तुडुंब भरले होते. दाक्षिण्यात  पदार्थ, पंजाबी, चायनीस खाण्यासाठी येथे खवय्ये गर्दी करुन जमले होते. 

अगदी ऐसपैस जाग असलेल्या मनालीने सुरु झाल्यापासुन अगदी मोजक्या दिवसात रसिकांचे मन आणि पोट काबीज केलेले दिसतेय. 


मजा आली. फार आवडले. 

तर आता बार बार लगातार. मनालीत.      

जागो इंडिया जागो

मीने, मीने, मीने,

आजची वर्तमानपत्रे वाचली की नाहीस. आणि काय ग ? काय हा खमंग वास सुटल्याय म्हणायचे.

छे हो टेकाडॆ भावोजी , सक्काळी सक्काळी कुठला आलाय वेळ , दुनीयेच्या उठाठेव्या करायला , थालीपीठे लावायला घेतल्यात माझ्या नवऱ्यासाठी ,

मीने मीने , अग अस कस करुन चालेल ? याच मुळॆ तर आपण मार खातो. आपलं सरकार बघ की आपल्यासाठी कित्ती कित्ती कामं करतयं, बघ बघ , जरा पेपर उघडुन. आणि आपल्याला हे ठावुकच नव्हत बघ.  

म्हणजे टेकाडॆ भावजी " जागो इंडिया जागो " ची जाहिरात सरकारनी गंभीरपणॆ घेतलेले दिसतेय की काय. सगळ्यांना खडबडुन जाग करताय की काय ?

अग मीने , वाच जरा वाच, उत्तर तेथेच मिळेल.  




अहो टॆकाडॆभावोजी, वाटलच होत मला असच काही तरी असणार.  झाली का पाच वर्षे ?  अंमळ बसा ह , थालीपीठ लावते तुमच्या साठी. 





Thursday, February 26, 2009

स्लम डॉग मिलीनीयर आणि वेश्याव्यवसाय

या चित्रपटात नायिकेची कहाणी काहीशी साईडट्रक झाली आहे असे मला वाटते. झोपडपट्टीतील मुलांवर जास्त लक्ष केंद्रीत झालय की काय ? त्या मानाने मुलींच्या समस्या तेवढ्या प्रखरतेने पुढे आलेल्या नाहीत.


तिचे "पिला हाऊस " मधल्या कुंटणखाण्यात वेश्याव्यवसायासाठी विक्री होणे, तेथुन नाट्यमय सुटका ( जी केवळ चित्रपटातच शक्य आहे अन्यथा तिरडी वरुनच, गुप्तरोग,ते एड्स पर्यंत कशानेही मरण पावल्यानंतरच ) मग तीचे रखेल म्हणुन रहाणे, सुटकेची निष्फळ धडपड, मनाची मुस्कटदाबी , घुसमट या कडे बरेचसे दुर्लक्ष झाले आहे।


पिला हाऊस , एक मुंबई मधली कुप्रसिद्ध वस्ती, खरे नाव तीचे "प्ले हाऊस" , या विभागात १० / १५ सिनेमा थियेटर आहेत / होती त्या वरुन पडलेले, जेथे जबरदस्त्तीने मुलींना धंद्याला बसवले जाते, ग्रांन्ट्ऱोड ते गोलदेऊळ या मधे असणारी हि देहविक्रीकरण्याची जागा.


कोणत्याही चित्रपटाचे यश कशाने मोजावे, त्याला किती पुरस्कार मिळाले आहेत, त्यानी केवढा धंदा केला आहे ? तो केवढा लोकप्रिय झाला आहे त्या वरुन की त्यात ज्या काही समस्या मांडल्या आहेत, समाजाचे जे दारुण चित्र दाखवले गेले आहे त्या बद्दल समाज पुरुषाला आपली लाज वाटुन , काही प्रमाणात का होईना पण समाजजाग़ृती होवुन , त्यांचे निवारण करण्याचा सर्व स्थरावरुन प्रामाणीक प्रयत्न केला जातो तेव्हा ?


जसे हे माध्यम समस्या जगासमोर मांडण्याचे काम करते तेव्हा समाजाचे हे कर्त्यव्य आहे की त्याने या समस्यांचे निवारण करावे.

Wednesday, February 25, 2009

टेसुल बन फुले - रस बरसायो रे




टेसुल बन फुले रंग छाये
भंवर रस लेत फिरत मदभरे
अरे रसलोभीया , हमें ना तरसावो
पीया जो परदेसा , जरत मन मेरो - राग बागेश्री - कुमार गंधर्व।
बहरलेला पळस पाहिला की हे गाणे आठवते।
परवा मी जो बहार पाहिला त्याचे दृश्य आयुष्यभर आठवणीत राहील।
जेवढा हा वृक्षराज फुलांनी डवरला होता किंबहुना त्याहून जास्त पाखरे रसग्रहण करण्यासाठी त्या भोवती जमली होती , झुबंड उडवीत । अशी चित्र क्षणभंगुर असतात ते किती बरे असते ।
रस बरसायो रे
उमंग भर आयो मन रिझावन सो
मध् सुगंध ले रितुराज रंगालो
बन-बन चहुँ दिस सजवान सो - राग बहार

Tuesday, February 24, 2009

है सबसे मधुर गीत वही जो हम दर्द के सुर मे गाते है !

परमेश्वराने धरतीवर मनुष्याला जन्माला घातले, त्याला एक दिल दिले, दिलाचा दर्द दिला आणि तो दर्द सुसह्य करण्या़साठी, त्यावर हळुवारपणॆ फुंकर घालण्यासाठी हळुच एक मुलायम, मखमली आवाज पाठवुन दिला।

आणि हो, तलतचा आवाज होता केवळ दर्दचा एहसास करुन देण्यासाठीच , नाहीतर आपली बीमारी दिलाला कशी कळली असती ?

आज तलतचा जन्मदिवस । असा आवाज दुनियेत एकदाच पैदा होतो ।

लिहीणार - एक तलतचा परमभक्त

तलत

Monday, February 23, 2009

युत्या आणि आघाड्या

निवडणुक जवळ आल्यानंतर सध्याला ज्या नव्या मोडतोड , जोडतोडीच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत त्यात कोंग्रेस आणि भाजपा यांच्या नव्या सोयरिकीच्या बातमी ऐकायला आली तर नवल वाटु नये।

काय सांगावे हेच दोघे एकत्र आले तर ?

जय हो , अभिनंदन

ऐ आर रहमान आणि गुलजार यांचे । ओँस्कर पुरस्कार मिळाल्याबद्दल ।

जय हो ।

(पण त्याची इतर चित्रपटातील गाणी कितीतरी पटीने सुंदर आहेत )

Sunday, February 22, 2009

Saturday, February 21, 2009

कायदा कड़क आहे

६.६ मिनीटांने सिंहगड रस्तावरील अभिरुचीत पोचलो पुतणीला घेवुन .

आता १५० रुपये घेवुन फक्त जेवणासाठीच आत सोडतो । अहो पणे संध्याकाळी तुमची दूसरी काहीतरी स्कीम आहे ना ७५ रुपयात , ज्यात फक्त स्नाकस मिलातात ।

५ रे ६ वाजेपर्यंत , आता बंद झाले।

आम्ही परत ।

रातभर मोहे सोने ना दे

या Lu Lin ने फार परेशान करून ठेवलय. काल रात्रभर झोपुन दिले नाहीबदमाश कुठे दडलाय कळायला मागत नाहीतसा त्याचा पत्ता कळलाय, शनी आणि चित्रेच्या मधे कुठेतरी तो आहे आणि द्विनेत्रीने दिसतोयअस्पष्ट्सा

रात्री वाजेपर्यंत शोधत होतो, परत पहाटे वाजता उठून ,

बघुया आज तरी दिसतोय काय ? २४ तारखेस तो शनीच्या अगदी जवळ असणार आहे तेव्हातरी तो शोधायला अवघड जावु नये

काल रात्री माझ्या गुरुवर्यानी त्याचे वसई पासून जरा लांब जावुन दर्शन घेतले , पण येथे पुण्यामधे आकाशात फारच उजेड असतो, त्यामुळे पण त्याला शोधायला अडचण येत आहे ।

इन रेशमी रांहो मे, इक राह तो वो होगी तुम तक जो पहुंचाती है

माणसा माणसातील नाती का टुटतात या प्रश्नांकडे गुलजारांचे मन सतत वळत राहीले आहे। माणसा माणसांतील नात्यांचा शोध घेणे हा गुलजारांचा ध्यास आहे। मानवी नात्यांची गुंफण हा त्यांचा आवडीचा विषय.

"गंगा आये कहांसे , गुलजार : एका दिग्दर्शकाचा प्रवास" - श्री। विजय पाडळकर लिखित पुस्तकातून

माणसा माणसातील जशी तुटली जातात , मोडतात तशी ती परत सांधली देखील जातात की. कारण "माणुस नियती समोर जेवढा हतबल असतो तेवढाच तो प्रेमासमोरही हतबल असतो"

आणि हीच प्रेमाची हतबलता त्यांना परत नाती जोडायला लावत असेल का ?

हे माणसांचे दुर जाणे हे केवळ प्रियकर-प्रेयसी, नातेवाईक मंडळी, नवरा बायको आदी नाते संबंधातातच असते काय ?

एकेकाळचे आपले जीवश्यकंठश्य, खास मित्र , त्यांच्या पासुन आपण कधीतरी कळत नकळत दुर वाहत जात असतो, येवढे दुर की आपला असा कोणी सहोदर होता हे याद ही रहु नये ?

राजेंद्र.. केवढी त्याची आणि माझी दोस्ती होती, माझा जणु काय तो ग़ॉडफादरच. कॉलेजच्या जीवनातील ती मैत्री, दिवसरात्र एकाद्या विषयावर केलेल्या चर्चा, ते वादविवाद, ते हमरातुमरी वर येणे, आपलेच म्हणणे खरे कसे हे पटवुन देणे , त्याचा मुकेश ,माझा तलत. , त्याचा पाशी गिरवलेले ते राजकारणाचे धडे !

नाती टुटायला त्यांच्यात बेबनाब व्हायलाच लागतो काय ? केव्हातरी ते आपसुक होत असते की.

Friday, February 20, 2009

मुक्काम - गौरी देशपांडे


स्पर्शाला भिऊ नकोस, आणि प्रेमळ विचारांना. पण सहजसोप्या भावनांना आणि कृतीला वेढुन बसलेल्या मोठ्या घायपाती शब्दांना भी. कारण शब्द जितकं सांगतात तितकंच दडवतात, स्वत:ला आणि दुसऱ्याला फसवतात.

या कालिंदीच्या मनाचा "थांग" लागणे कठीण होत चालले आहे। "मुक्काम" परत तीचा आपल्या घरी ? तळेगावला ? डॉ.विश्वनाथ पहात असलेल्या अपंग आणि मतिमंद मुलांसाठी असलेल्या रुग्णालयात ? जेथे ती नोकरी करते तेथे ? आणि ते ही दिमीत्री ला सोडुन ?

दिमीत्री , पुन्हा एकदा भेटतो आणि काहीच घडुन नये ? की एखादी गोष्ट मिळेपर्यंतच तिचे आकर्षण आणि मिळाल्यावर मन तृप्त होवुन तिच्यापासुन दुर जाणे , मन शांत होवुन, उर्मी निवल्यानंतर ?

ओ , कालिंदी, नाही उमजतच नाहीस तु।



येवढा प्रवास करुन ही परत मुक्कम आपल्याचपाशी ? का ? का स्वत:चे वेगळे आयुष्य उभे करायचे " इयान पासुन , दिमीत्री पासुन दुर ? का ?



दुस्तर हा घाट आणि थांग" मधल्या "थांग" ची कालिंदी नंदन ला सोडुन दिमीत्रीची आठवण मनाशी ठेवुन परतलीय भारतात.
ग्रीसला जाते काय दिमीत्रीला भेटायला आणि परत येते काय ?

कोडे नाही उलगडत.

Blue Crescent: परिचय..

तुम्ही भेटलात म्हणुनच आयुष्यात गुलजार मोसम आला। ( विजय पाडळकरांच्याच शब्दात)

केवळ हा लेख वाचला आणि जाणवले आता पर्यंत आपल्याला गुलजार विषयी काहीच माहिती नव्हती, तुकड्या तुकड्यात आपण गुलजारला पाहात होतो आता सविस्तर पहाणाचा प्रयत्न करुया, सुरवात तर करुया " गंगा आये कहांसे , गुलजार : एका दिग्दर्शकाचा प्रवास " या श्री. विजय पाडळकर लिखीत पुस्तकापासुन. )

Thursday, February 19, 2009

"मेड इन चायना" ते शुद्ध भारतीय

काल चित्रपट महोत्सवात "मेड इन चायना" पहायला गेलो, कामाचा डोंगर उपसायचा सोडुन. उगीचच गेलो असे वाटायला लागले, नाही आवडला. काहीच खास बात नाही. मेड इन चायना बनावटीच्यां वस्तुंसारखाच वाटायला लागला, तीच घराणेशाही, तेच नेते, तेच बिल्डर, तेच नाडले जाणारे शेतकरी, तीच , शौकबाजी , तेच अत्याचार । अन्याय। नेहमीच्याच पठडीतला।

आदल्या दिवशी "जोगवा" चित्रपटाने येवढ्या उंचीवर नेवुन ठेवले होते तेव्हा आता कोणतीही तडजोड करणे कठीण होत गेले

माणुस चित्रपटामध्यल्या "कशाला उद्याची बात बघ ढळुन चालली रात " या अप्रतिम गाण्याच्या भ्रष्ट रिमिक्स वर नाचणाऱ्या बारबाला बघवेनाश्या झाल्या आणि उठलो, वीसच मिनीटात।

तेवढ्यात आठवले सर ज.जी. कलामहाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन भरले आहे व आत्ता तेथे पं.प्रभाकर कारेकरांचे गाणे आहे.
मग काय पोहोचलो तडक तेथे।


त्यांचे कलाप्रदर्शन कालही पहाता आले नाही. परवा सकाळी ९ वाजता गेलो होतो आणि काल संध्याकाळी ७ वा।

सं १० ते सां. ६ या वेळेत ते उघडे असते. या वेळेत कार्यालयातुन जाणे कठीणॅच. पाहु उद्याला जायला जमते का ?

Wednesday, February 18, 2009

"दुस्तर हा घाट" आणि "थांग" आणि "मुक्काम" गौरी देशपांडे.

गौरी देशपांडे जाणुन घेण्याचा अल्पसा प्रयत्न करतोय. जेव्हा आपण एकादा लेखक परत परत वाचायला लागतो तेव्हा कुठे त्याची सौदर्यस्थळे हळुहळू उमजायला लागतात.

- " दिमित्री, तु कुठल्या भाषेत विचार करतोस ? "

भाषा बदलल्या म्हणून भावना, विचार बदलतात का ? ज्या गोष्टींचा विचार होतो त्या बदलतात का ? त्या गोष्टी कशानेही बदलत नसणार. माणसाचं माणूसपण त्याच्या देशा-वेशावर ,रंगरुपावर, पैशा-पैशावर अबलंबून असेल का ? मी माझ्या भाषेत जो विचार करत तो तू तुझ्या भाषेत केलेल्या विचारापेक्षा किंवा आत्ता खाली गेलेल्यांनी त्यांच्या भाषेत केलेल्या विचारांपेक्षा, वेगळा असेल का ?

मी तर म्हणीन जेव्हा एखाद्याला गौरी देशपांडे झपाटुन टाकतात तेव्हा ती व्यक्ती नकळतपणॆ अगदी अगदी गौरी देशपांडे सारखा विचार करायला लागतात।
हे "दुस्तर हा घाट" आणि "थांग" नामक पुस्तक मागे वाचून झाले होते , आता त्याचा पुढचा भाग हाती लागला आहे।
"मुक्काम "

Tuesday, February 17, 2009

मुक्काम - गौरी देशपांडे

जोगवा

भयापासुन मुक्ती मिळावी या साठी मनुष्याने परमेश्वराला जन्माला घातले आणि याच परमेश्वराने "आई यल्लम्मा " बनुन त्याचे आयुष्य उध्वस्थ केले.

आज "जोगवा" पाहिला, नुसताच चित्रपट पाहिला नाही, तर माणसे , माणसांना कश्या प्रकारचे नरकासमान जिणे जगायला लावतात ते पाहिले, निव्वळ अंधश्रद्धेपोटी सख्खे आईबाप आपल्या पोटच्या पोरांच्या आयुष्याचे कसे धिंडवडे काढतात ते पाहीले ,आपल्या स्वार्थासाटी आपल्या कळपात दुसऱ्यांना ओढणारी माणसे पाहिली आणि हे ही पाहिले की वाट चुकलेल्यांना मार्ग दाखवणारेही कोणी तरी असते, गरज असते ती मनाला बळ देण्याची, बंड करण्याची, आपला मार्ग आपण शोधण्याची, नरकातुन बाहेर पडण्यासाठी.

जी जी गावे, जी, जी माणसे या आई यलाम्माने पछाडलेली आहेत, त्या त्या गावात, त्या त्या माणसांना हा चित्रपट अवश्य दाखवला जावा, कळुद्या त्यांना आपण काय करुन बसलो आहोत, मिळुन द्या त्या नाडलेल्या, पिडलेल्या जोगती आणि जोगतीणींना त्यांचे हिरावुन घेतलेले स्वातंत्र, जगु द्यात त्यांना माणुस म्हणुन परत येकदा।
अप्रतिम चित्रपट, अप्रतिम कलाकारांची कामे, अप्रतिम दिर्दशन, अप्रतिम छायाचित्रण, अप्रतीम प्रकाशाचा, सावल्याच खेळ, अप्रतीम लोकेशन , अप्रतीम मुक्ता बर्वे । जबरदस्त उपेंद्र लिमये, किशोर कदमांनी तर कमालच केली आहे.
मी मराठी चित्रपट पहाणे का बरे सोडले होते ? बर्डे, सराफ आणि जाधव यांच्यातुन मराठी चित्रपट केव्हाच बाहेर पडला आहे की.

Monday, February 16, 2009

माझ्यासारखा मुर्ख मीच

जर्मन चित्रपट पहायला जायचय, जायचय करत कार्यालयात काम करत बसलो आणि शेवटची १५-२० मिनिटे राहिली असता चव्हाण सेंटर , मुंबई मधे पोचलो।

And you know what I missed today ?

आणि एक आघातच झाला. येथे चक्क मराठी चित्रपट महोत्सव सुरु आहे.
शेवटची १०-१५ मिनिटे " असलाच घो मला हवा " या चित्रपटाची मजा लुटता आली.
मंगळवार - जोगवा - ६.३० वा.
बुधवार - मेड इन चायना ६.३० वा.
गुरुवार - जोशी की कांबळे - ४.०० वा
महासत्ता - ६.३० वा.

आणि गंमत म्हणजे हे सारे रसिकांसाठी चक्कटफु आहे.

तेव्हा पुढील तीन दिवस यशवंतराव चव्हाण सेंटर. मुंबई.

Enjoy.




Uttappa Sandwich


FEd up of eating just Uttappa or just a sandwich ? Try Uttappa Sandwich

Sunday, February 15, 2009

बचा ले मोरी मां. - मधुसुरजा


बचा ले मोरी मां. 
 
माध्यांनीचा सुर्य डोक्यावर तळपतोय, बेभान, बेफाम झालेले माणसे मिरवणुकीने देवळाकडे चालली आहेत, वधस्थंभाकडे , बळी द्यायला बकऱ्यांना घेवुन. त्यांना सजवुन, गुलाल उधळत, वाजतगाजत, ढोल बडवत.
 
बकरी टाहो फोडतेय, आक्रोश करतोय , बैबैबैबैबेबेबेह  
 
बचाले मोरी मां. 

ये मोरी मां, मां, मोरी मां, मां, बचाले मोरी मां,  ये , ये, ये मोरी मां, मोरी मां, ये मोरी, ये मोरी, बचाले मोरी मां. मां, मां, मां, मां, मां, 
 
अरज यही तोरे  
घरमे ललुआ अकेला. 
 
विनवणी करते , घरी माझे तान्हे कोकरु, लेकरु आहे, भुकेले असेल , वाट पहात असेल, आपली आई केव्हा येईल, आपल्याला दुध केव्हा पाजेल, मला जावु दे ना, मां, बचा ले मोरी मा. 
 
पण ती मां तर बडी निर्दयी, आणि ती बेहोश झालेली माणसे, त्यांच्या कानी कुठली ही विनवणी जायची ? त्यांच्या मनी दयेचा पाझर कुठला फुटायचा ?
 
ढोलीया बजाले , बजाले, ढोलिया बजाले. बजाले, ढोलीया बजाले, बजाले, बजाले. ढोलीया, ढोलीया, ढोलीया 
 
 
करम करो तेरो , माई की जो साध है जो है  
 
पण त्या मरणाला सामोरे जाण्याऱ्या बकरीला ठावुक आहे आपले मरण अटळ आहे. 
 
क्षणभर त्या ढोलीयाचे वाईट वाटुन हात थबकतात, ती बकरी त्याला आपल्या कर्तव्याची जाणीव करुन देते. 
 
ढोलीया, ढोल बजावणे हे तुझे काम आहे, तुझे कर्तव्य तु कर. मी मरावे ही तर त्या माईची इच्छा आहे.  
 
हा कुमार गंधर्व रचीत "मधुसुरजा ’ हा एकच राग असा आहे की जो माझ्या मनाला ऐकवत नाही.        
 
 
 

जावळ


खुश्शाल खावे


माणासाला वाटतंना मांसाहार करावा, त्याने खुश्शाल करावा, पण स्वःताला हवा म्हणुन , उगीचच देवाच्या नावाखाली कशाला आणि मरतांना तरी त्या मुक्या जिवाला त्रास देवु नये

खुश्शाल खावे

माणासाला वाटतंना मांसाहार करावा, त्याने खुश्शाल करावा, पण स्वःताला हवा म्हणुन , उगीचच देवाच्या नावाखाली कशाला आणि मरतांना तरी त्या मुक्या जिवाला त्रास देवु नये

बादशा्ही आणि मसालेभात

ही ब्लॉगर मंडळी जीवाला फार त्रास देतात, काहीतरी ब्लॉगवर लिहुन ठेवतात आणि मग ते वाचुन लालच निर्माण होते मनात , मग ती शमवण्यावाचुन दुसरा पर्याय नसतो. 

मसालेभाताबद्द्ल वाचले http://rohinivinayak.blogspot.com/2009/02/blog-post_2344.html यांच्या ब्लॉगवर , मग काय आज राजाभाऊ सपत्निक पोहोचले टिळाकरोडवर , बादशाही लॉजिंग आणि बो्र्डींग मधे , सकाळी जेवायला, मसालेभात खायला. 

आजचा नास्ता, मनशक्ती प्रयो्गकेंद्रात, लोणावळा



गेले काही महिने आठवण येत होती मनशक्ती प्रयो्गकेंद्रात खालेल्या मि्सळीची व बटाटेवड्याची. मग काय सकाळी पोचले राजाभाऊ.
पण आज काही तेवढी मजा आली नाही.

Saturday, February 14, 2009

का पण ?

आज रात्री चा काय मारे बेत ठरवला होता , आणि करत काय बसलोय तर घरात "उत्ख्ननन" वाचत, माणासांच्या कोलाहा्लात , एक बेट बनुन

बरयाच वेळा असं घडत असते , ठरवले काय जाते आणि होते काय ?

"उत्खनन" - गौरी देशपांडे

"जी गोष्ट मिळणं न मिळणं हे इतकं सर्वस्वी दुसऱ्या कुणावर अवलंबुन आहे तिची आसक्ती का धरावी ?

काही पुस्तकांचे ते वाचुन झाल्यानंतर आपल्या पुरते त्याचे अस्तित्व संपते,तर काही पुस्तके वाचतांना त्याच्याशी आपण समरुप होत जातो, त्यातल्या पात्रांत, ते पुस्तक लिहिणाऱ्यात. मग कधीतरी अचानक जाणॅवते की अरेच्या आपणही नकळतपणे त्यांत गुंतत चाललो आहे, तिच्यासारखाच विचार करायला लागलो आहे, बोलायला लागलो आहे, वागायला लागलो आहे, मग समजावे त्या पुस्तकाचा किंबहुना त्या लेखिकेचा आपल्यावर पगडा बसत चालला आहे, हे सामर्थ असते त्या लेखिकेचे, गौरी देशपांडेचे.

"उत्खनन" वाचायला घेतलयं. हे मी अजुन पर्यंत वाचले कसे नव्हते, मला वाटत होते की संपुर्ण गौरी देशपांडे वाचुन झालीय.
गौरी का आवडतात ? त्या आपल्या लिखाणातुन सतत संवाद साधत असतात म्हणुन के आणखी कशामुळे ?

Friday, February 13, 2009

प्रेम

पण प्रेम यात समजुतदारपणा असतो की आततायी पणा ?
प्रेम म्हणजे स्वीकार ! आपण कधी थोडी कुरबुर करू, ज़रा हातटून धोपटुन आपल्या चौकटीत कुणाला बसवायला बघू , पण अमुक व्यक्तिच्या आपण प्रेमात पडतो , ते त्या असतात तशा आपल्याला आवडतात म्हणूनच ना ? हे विसरून कसं चालेल ?
- गौरी देशापांडें - उत्खनन

प्रिये !!

प्रिये ,

जान तेरे लिए
तेरे बिना जीना नाकाबिले जीनेका तसव्वुर है !

तबियत ठीक थी और दिल भी बेकरार न था

ये तब की बात है जब तुम्हीसे प्यार न था !

तुम्हे याद होके ना याद हो

कभी हमभी तुमभी थे आशना

तुम्हे याद होके ना याद हो !

किंवा

जब भी तकमीले मुहब्बतका ख़याल आता है

अश्या गजला आजतरी कोणालाही आठवु नयेत।

स्लानडौग मिलेनियर आणि भटक्या

स्लानडौग मिलेनियर मधले मुंबईचे दाखवलेले रूप पहातांना प्रकर्ष्याने आठवण झाली असेल तर ती "भटक्याची " ।
या रात्रीच्या मुंबईला "भटक्या" पेक्षा कोणी अधिक जाणले असेल ?
वर्तमानापत्रातुन आपल्या स्थंभामधे सतत हे विपरीत रूप "भटक्या" दुनियेला दाखवत आले होते आणि म्हणुनच जेव्हा जनाब अंतुले मुख्यमंत्री झाले , त्यांना रात्रीची मुंबईचे अवलोकन करावेसे वाटले तेव्हा त्यांनी श्री, प्रमोद नवलकरांना गाठले , वेष पालटुन आपल्या राज्याची खबरबात घ्यायला।

लुलीन येतोय




लुलीन धूमकेतु येत आहे । येत्या २३-२४ तारखेला त्याचे मनोहर दर्शन होणार आहे। त्यावेळी बहुधा तो शनि जवळ, मघेजवळ सिंह राशीत असावा , म्हणजे रात्री ९ च्या सुमारास उगवेल।


Thursday, February 12, 2009

धुम्रपान करतच रहा, करतच रहा, करतच रहा.




धुम्रपान करतच रहा, करतच रहा, करतच रहा.
लवकरच पाठीमागे सायलेन्सर लावावे लागेल

वसुंधरेचे भवित्तव्य


मनुष्य पृथ्वीशी असाच जर का खेळत राहिला तर , वसुंधरेचे भवित्तव्य काही खर नाही

Wednesday, February 11, 2009

Pin xx , Royal Orchids , Kalyani Nagar, Pune





धर्म संकट उभे ठाकले. तिला घेवुन जेवायला कुठे जायचे ? या आजच्या स्पेशल दिवशी !

शबरी, कॄष्णा डायनींग हॉल ? नको. अतिपरीचित झाले आहेत. सुकांता , पहिल्यांदाच जाणार, कसे असेल देव जाणॆ ! शिगरी , तेथे तर केव्हातरी रात्री  जायचय. मेनलॅंड चायना , तेथे तर व्हेलॅंनटाईन डॆ ला जायचय.  

गोधंळ काही संपत नाही. 

अचानक मार्ग समोर दिसुन आला. Pin xx , Royal Orchids , ने़ खास या व्हेलॅंनटाईन वीक साठी एक मस्त योजना आखली आहे. तुमच्या साथीदाराला घेवुन या. तिला ब्युफे जेवण फ्री, पुणे टाईम्स मधली जाहीरात कापुन दिल्या नंतर. 

मग काय तत्काळ निर्णय.   

येथे पाय न वळले तर नवलच.



जिलब्या, हाण गणाप्या हाण.

Kala Ghoda Arts Festival 2009

बहुत ही खुबसुरत है तेरी दु्निया ,मेरे मा्लीक

काळाघोडा आर्टस फेस्टिवल










Post Cards to Pakistan - Handle with Care