सबकुछ मिलिंद बोकील. त्यांनी झपाटुन टाकलय. एक नवं पुस्तक हाती लागलय, "उदकाचिया आर्ती ". कथासंग्रह.
तेव्हा सध्याची अवस्था बोकिलमयी. बरेच वर्षे मंदावलेले वाचन आता वेग घेवु लागलय तर. एका बैठकीत पुस्तकाचा फडशा पाडला पाहिजे, वाचुन संपेपर्यंत खाली ठेवायचे नाही. रात्रीचे १२ वाजले, राजाभाऊ चला झोपा आता.
सामाजीक कार्य, समाजसेवा , त्यात सर्वस्व झोकुन देणारी माणसं, नवराबायकोतील नाजुक भावबंध, विस्कटत चाललेला संसार, प्रतारणा, नात्यातील चोरटॆपणा, त्यांचे तुटत चाललेले, तुटलेले, किंवा पुन्हा जुळलेले नाते, विवाहबाह्य संबंध, बाहेरख्याली वर्तन, विभक्त होणॆ, एकतर्फी प्रेम, त्यातुन येणारी विफलता, या साऱ्या कड्यांभोवती कथा फुलत रहातात.
तुमचा या धरणांना विरोध का ? तर " काही जणांच्या सुखासाठी बाकीच्यांनी मरायचं हा अधर्म आहे " असं जेव्हा रोहीणीची आई एका वाक्यात सांगते तेव्हा ते पटकन पटण्यासारखे असते. "उदयाचिया आर्ती " या कथे भेटते ती रोहीणी , दूर डोंगराळ प्रदेशात, नदीकाठच्या प्रदेशात जावुन राहीलेली, होणाऱ्या धरणाला विरोध करायला, बुडणारी गावं वाचवण्यासाठी , देशोधडीस लागणाऱ्या लोकांसाठी लढा उभारणारी व तिला चार दिवसासाठी भेटायला येणारी आई.
सावित्रीचा नवरा, बायकोच्या ओढीने आसुसलेला, वेडावला, खुळावलेला, तर ती सहकारी सोसायटी, पार्टीचे काम यात गुंतलेली आणि तेही त्या दाढीवाल्या, पिंजारलेल्या केसांचा, पांढऱ्या झब्यालेंग्यातल्या माणसासोबत, यात त्यांचा विस्कटत गेलेला संसार, त्याने आपली सोय बाहेर बघणॆ मग घटस्फोट आणि अचानक काही काळानंतर अवचीत सावित्रीने त्याल येवुन भेटणॆ.
समाजाचे प्रश्न केवळ शाळॆने सुटणार नाहीत, मुलांना शाळा शिकवुन आणि प्रार्थना म्हणुन काही होणार नाही आधी इथली गरीबी गेली पाहीजे. मागसलेपणा दुर केला पाहिजे, ज्यांच्या कडं पाणी नाही त्यांना पाणी दिले पाहिजे, ज्यांच्या कडॆ अन्न नाही त्यांना अन्न दिले पाहिजे असे मानणारे फादर, एक परदेशी मिशनरी, गावागावामधे विहिरी खणु लागतो, पाण्याचं साधन झाल्यामुळॆ शेती सुधारु लगतो तेव्हा त्याचे हे धंदे , नसते उद्योग पुढाऱ्यांना आवडणारे नक्कीच नसतात. वीस वर्षाच्या भारतातील प्रदीर्घ वास्तव्यानंतर भारतसरकार जेव्हा जर्मन फादरला त्याच्या या गुन्हाबद्द्ल हा देश सोडुन जायला सांगते तेव्हा .
लग्नाआधीची साधी सरळामार्गी शिला वाईफ बनुन चंद्रशेखर जोशीं बरोबर अमेरीकेत जाते, आणि "तुला कोणी अडवलंय ! जा ना तू ! युला वाटेल ते कर. तेच तर म्हणत आहे मी. बिहेव्ह लाईक ऍन अमेरीकन. यू लिव्ह युव्हर लाईफ, लेट मी लिव्ह माईन, असे सांगते तेव्हा या एका वाक्याने त्याला कळत शेवटी असं आहे तर. मग शिलाच्या या वागण्यामुळॆ घटस्फोट घेण्यावाचुन दुसरा कोणता पर्याय शिल्लक रहात नाही.
बायको बाळंत होण्याची वेळ जवळ आली तरी सामाजीक कार्यांतच रमलेला, समाजासाठी संसाराकडॆ संपुर्णपणॆ आयुष्यभर दुर्लक्ष केलेला, ऐन घटेकेच्या वेळीस तिला एकटीला टाकुन मोर्च्या काढण्यात मग्न असलेल्या समाजवादी शशिकांत. मुलाला उचलुन घेतो तेव्हा त्याला जाणवतं आता तो बाप आहे, त्याच्या मुलाचा बाप, केवड सुख आहे यात, आता दुसरे काही नको, हे बाहेरचे जग तर मुळीच नको, ते रखरखीत, कर्कश्श, भगभगीत जग, ते कलकलाट करणारे माणसांचे समूह. ते बोचकारणारे सामाजीक संबंद. आता ह्या कशाकशाचीही त्याला जरुरी नसते. त्याला जाग येतो, काहीतरी त्याला गवसतं. आणि तो बदलतो त्याचे डोळे पाण्यानी भरुन येतात. त्या पारदर्शक पाण्याच्या पडद्याआड भूतकाळ वाहून जातो.
अश्या अनेक कथा.
3 comments:
धन्यवाद हरेक्रिश्नजी! आणि मिलिंद बोकीलांच्या ह्या अजून एका सुंदर कथेबद्दल लिहील्याबद्द्ल धन्यवाद!! पण ह्या कथेचं नाव ’उदकाचिया आर्ती’ आहे बहुतेक कारण...माझ्याकडच्या संग्रहात तरी तसेच लिहिले आहे.
फ़ार सुंदर कथानक आहे.
उदकाचिया आर्ती व झेन गार्डन हे दोन्ही कथासंग्रह मी वाचले आहेत. मला झेन गार्डन जास्त आवडला.. त्यातील काही विषय उदकाचिया.. मध्ये repeat झालेत. पण नवीन पिढीत मिलिंद बोकील नि:संशय पणे चांगले कथाकार आहेत.
सखी,
आपण घेतलेले हे नाव खुप आवडले. व.पु. आठवले. मुद्राराक्षसाच्या विनोदाबद्द्ल क्षमस्व. दुरुस्ती ्केलेली आहे.
Ruminations and Musings,
मलाही झेन गार्डन खुप आवडले. आता परवा पासुन गौरी देशपांडे. शशी भागवत हे गौरी देशपांडेंचे वडील का ?
Post a Comment