Saturday, February 21, 2009

इन रेशमी रांहो मे, इक राह तो वो होगी तुम तक जो पहुंचाती है

माणसा माणसातील नाती का टुटतात या प्रश्नांकडे गुलजारांचे मन सतत वळत राहीले आहे। माणसा माणसांतील नात्यांचा शोध घेणे हा गुलजारांचा ध्यास आहे। मानवी नात्यांची गुंफण हा त्यांचा आवडीचा विषय.

"गंगा आये कहांसे , गुलजार : एका दिग्दर्शकाचा प्रवास" - श्री। विजय पाडळकर लिखित पुस्तकातून

माणसा माणसातील जशी तुटली जातात , मोडतात तशी ती परत सांधली देखील जातात की. कारण "माणुस नियती समोर जेवढा हतबल असतो तेवढाच तो प्रेमासमोरही हतबल असतो"

आणि हीच प्रेमाची हतबलता त्यांना परत नाती जोडायला लावत असेल का ?

हे माणसांचे दुर जाणे हे केवळ प्रियकर-प्रेयसी, नातेवाईक मंडळी, नवरा बायको आदी नाते संबंधातातच असते काय ?

एकेकाळचे आपले जीवश्यकंठश्य, खास मित्र , त्यांच्या पासुन आपण कधीतरी कळत नकळत दुर वाहत जात असतो, येवढे दुर की आपला असा कोणी सहोदर होता हे याद ही रहु नये ?

राजेंद्र.. केवढी त्याची आणि माझी दोस्ती होती, माझा जणु काय तो ग़ॉडफादरच. कॉलेजच्या जीवनातील ती मैत्री, दिवसरात्र एकाद्या विषयावर केलेल्या चर्चा, ते वादविवाद, ते हमरातुमरी वर येणे, आपलेच म्हणणे खरे कसे हे पटवुन देणे , त्याचा मुकेश ,माझा तलत. , त्याचा पाशी गिरवलेले ते राजकारणाचे धडे !

नाती टुटायला त्यांच्यात बेबनाब व्हायलाच लागतो काय ? केव्हातरी ते आपसुक होत असते की.

No comments: