भयापासुन मुक्ती मिळावी या साठी मनुष्याने परमेश्वराला जन्माला घातले आणि याच परमेश्वराने "आई यल्लम्मा " बनुन त्याचे आयुष्य उध्वस्थ केले.
आज "जोगवा" पाहिला, नुसताच चित्रपट पाहिला नाही, तर माणसे , माणसांना कश्या प्रकारचे नरकासमान जिणे जगायला लावतात ते पाहिले, निव्वळ अंधश्रद्धेपोटी सख्खे आईबाप आपल्या पोटच्या पोरांच्या आयुष्याचे कसे धिंडवडे काढतात ते पाहीले ,आपल्या स्वार्थासाटी आपल्या कळपात दुसऱ्यांना ओढणारी माणसे पाहिली आणि हे ही पाहिले की वाट चुकलेल्यांना मार्ग दाखवणारेही कोणी तरी असते, गरज असते ती मनाला बळ देण्याची, बंड करण्याची, आपला मार्ग आपण शोधण्याची, नरकातुन बाहेर पडण्यासाठी.
जी जी गावे, जी, जी माणसे या आई यलाम्माने पछाडलेली आहेत, त्या त्या गावात, त्या त्या माणसांना हा चित्रपट अवश्य दाखवला जावा, कळुद्या त्यांना आपण काय करुन बसलो आहोत, मिळुन द्या त्या नाडलेल्या, पिडलेल्या जोगती आणि जोगतीणींना त्यांचे हिरावुन घेतलेले स्वातंत्र, जगु द्यात त्यांना माणुस म्हणुन परत येकदा।

अप्रतिम चित्रपट, अप्रतिम कलाकारांची कामे, अप्रतिम दिर्दशन, अप्रतिम छायाचित्रण, अप्रतीम प्रकाशाचा, सावल्याच खेळ, अप्रतीम लोकेशन , अप्रतीम मुक्ता बर्वे । जबरदस्त उपेंद्र लिमये, किशोर कदमांनी तर कमालच केली आहे.
मी मराठी चित्रपट पहाणे का बरे सोडले होते ? बर्डे, सराफ आणि जाधव यांच्यातुन मराठी चित्रपट केव्हाच बाहेर पडला आहे की.
3 comments:
या विषयावर स्मिता पाटीलने काम केलेला एक सिनेमा बघितला होता. तोही विचार करायला लावणारा होता. नाव आठवत नाहीये.. :(
तुम्ही चांगले लिहिले आहे. मनमोकळे आणि प्रामाणिक असे तुमचे लिखाण नेहमी आवडते मला..
Mala baghayacha aahe ha picture, pan ase picture pharase gajatch nahit. BAYO, MAATIMAAY,ase pictures milavamyasathich khoop mehanat karavi lagate.
aani mala ajoonhi naahi vaatate ki marathi chitrapat poorn pane berde , kothare, jadhav yaanchya toon baaher padale aahet. karan theatorvar, CDs madhye tyaanchach varchasva asate. patatay na?
Ruminations and Musings / Maithili
Please watch this movie if you get an oppurtunity.
Post a Comment