Sunday, February 08, 2009

नाविन्याचा , नवतेचा ध्यास घेणारे हवेत

जागतीक आर्थिक मंदीच्या विळख्यात जग सध्या सापडलय. अर्थव्यवस्था डोलायमान, डळमळीत होत चालल्या आहेत. जग दहशदवादांच्या हल्लाने बेजार झालय. औद्योगीक क्षेत्र कठीन परिस्थितीतुन मार्गक्रमण करते आहे,  उद्योगधंदे बंद पडत चालले आहेत, अनेक ठिकाणी कामगारांवर कपातीची संक्रांत कोसळते आहे. ( तीन लाख कामगारांची चुल थंडावली - दै .सकाळ, ०८/०२/०९ ) 

काळ कठीण येत चालला आहे.

अश्यावेळी हवे आहेत ते व्हीजन देणारे, बळ देणारे, नाविन्याचा , नवतेचा ध्यास घेणारे, भवितव्याबाबत आपले विचार मांडणारे आणि भविष्याचा वेध घेणारे,  आलेल्या, येणाऱ्या परिस्थितीतुन भारताला तारुन नेवु शकणारे सबळ, सशक्‍त, तरुण, आणि नवविचाराचे नेते. रम्य भुतकाळ सांगत त्यात रमणीय झालेले, मंदिर एके मंदिर करत बसणारे, पुराणात रमणारे, सत्तेसाठी , सत्ता हासील करण्यासाठी केवळ जात आणि धर्म हीच शिडी आहे हे मानणारे नव्हेत.  

डॉ. रघुनाथ माशेलकरांचा आज दै. सकाळ मधे एक चांगला लेख आहे. " तंत्रराष्ट्रीयत्वाकडून  तंत्रवैश्विकतेकडॆ ". 

त्यात ते लिहीतात. "जग आज नानाविध समस्यांना सामोरे जात आहे. वैश्विक तापमानवाढीची आणि त्यचा परिणाम असलेल्या हवामानबदलाची समस्या आहे. ऊर्जास्त्रोत्र आटत आह्ते, अन्नधान्याचि कमतरता भासतेय, पाण्याचे दुर्भिक्ष जाणावतेय, दहशदवाद वाढतोय आणि आता आर्थिक अरिष्टही ठळक होतेय. यापैकी आर्थिक संकट दूर होईल, परंतु अन्य समस्या सहजासहजी सुटणार नाहित. त्यासाठी तंत्रवैश्विकतेचाच आधार घ्यावा लागेल, शिवाय त्याला एक नवे परिणाम द्यावे लागेल " 

तेव्हा आमचे मायबाप असलेल्या नेत्यांनो आपल्याला बदला, आम्हाला बदलवा. 

2 comments:

Abhi said...

आपण बदलून नेत्यांना आपणच बदलले पाहिजे.
तो माशेलकरांचा लेख जर आपण मला पाठवला तर मी आपला खूप आभारी राहीन.

-अभी

HAREKRISHNAJI said...

How do I send it ? I have hard copy.

It's in "सप्तरंग " सकाळ, ०८/०२/०९. I cannot find it on esakal.