Friday, February 20, 2009

मुक्काम - गौरी देशपांडे


स्पर्शाला भिऊ नकोस, आणि प्रेमळ विचारांना. पण सहजसोप्या भावनांना आणि कृतीला वेढुन बसलेल्या मोठ्या घायपाती शब्दांना भी. कारण शब्द जितकं सांगतात तितकंच दडवतात, स्वत:ला आणि दुसऱ्याला फसवतात.

या कालिंदीच्या मनाचा "थांग" लागणे कठीण होत चालले आहे। "मुक्काम" परत तीचा आपल्या घरी ? तळेगावला ? डॉ.विश्वनाथ पहात असलेल्या अपंग आणि मतिमंद मुलांसाठी असलेल्या रुग्णालयात ? जेथे ती नोकरी करते तेथे ? आणि ते ही दिमीत्री ला सोडुन ?

दिमीत्री , पुन्हा एकदा भेटतो आणि काहीच घडुन नये ? की एखादी गोष्ट मिळेपर्यंतच तिचे आकर्षण आणि मिळाल्यावर मन तृप्त होवुन तिच्यापासुन दुर जाणे , मन शांत होवुन, उर्मी निवल्यानंतर ?

ओ , कालिंदी, नाही उमजतच नाहीस तु।



येवढा प्रवास करुन ही परत मुक्कम आपल्याचपाशी ? का ? का स्वत:चे वेगळे आयुष्य उभे करायचे " इयान पासुन , दिमीत्री पासुन दुर ? का ?



दुस्तर हा घाट आणि थांग" मधल्या "थांग" ची कालिंदी नंदन ला सोडुन दिमीत्रीची आठवण मनाशी ठेवुन परतलीय भारतात.
ग्रीसला जाते काय दिमीत्रीला भेटायला आणि परत येते काय ?

कोडे नाही उलगडत.

3 comments:

मन कस्तुरी रे.. said...

हा...अगदी मलाही असंच कंफ़्युजन असतं गौरी च्या नायीकां बद्दल....
अतिशय सुस्पष्ट विचार, रेशमाच्या लडी घरंगळत जाव्या तशी उलगडत जाणारी, फुलपाखरासारखी सौंदर्यवेधी भाषा, आपल्याच विचारांचं प्रतिबिंब वाटणारी अनेक वाक्ये...गौरी देशपांडेंच्या लेखनाच्या प्रेमात तर मी कधीच पडले.....इंजिनिअरींग च्या शेवटच्या वर्षीच बहुदा....पण तरिही तिच्या नायीका या थोड्या ’फ़्लर्ट- चालू’ असतात असे माझे ठाम मत आहे.
कितीही स्वतंत्र विचार, आधुनिकता वगैरे मान्य केली तरी शारीर पातळीवरचे तिचे मैत्रीचे, प्रेमाचे संदर्भ अनाकलनीय आहेत हे मात्र खरे!

HAREKRISHNAJI said...

Ashwini

Could be possible

मन कस्तुरी रे.. said...

What could be possible?
Tichya nayikancha vagana ....ki ajun kahi?