Wednesday, February 18, 2009

"दुस्तर हा घाट" आणि "थांग" आणि "मुक्काम" गौरी देशपांडे.

गौरी देशपांडे जाणुन घेण्याचा अल्पसा प्रयत्न करतोय. जेव्हा आपण एकादा लेखक परत परत वाचायला लागतो तेव्हा कुठे त्याची सौदर्यस्थळे हळुहळू उमजायला लागतात.

- " दिमित्री, तु कुठल्या भाषेत विचार करतोस ? "

भाषा बदलल्या म्हणून भावना, विचार बदलतात का ? ज्या गोष्टींचा विचार होतो त्या बदलतात का ? त्या गोष्टी कशानेही बदलत नसणार. माणसाचं माणूसपण त्याच्या देशा-वेशावर ,रंगरुपावर, पैशा-पैशावर अबलंबून असेल का ? मी माझ्या भाषेत जो विचार करत तो तू तुझ्या भाषेत केलेल्या विचारापेक्षा किंवा आत्ता खाली गेलेल्यांनी त्यांच्या भाषेत केलेल्या विचारांपेक्षा, वेगळा असेल का ?

मी तर म्हणीन जेव्हा एखाद्याला गौरी देशपांडे झपाटुन टाकतात तेव्हा ती व्यक्ती नकळतपणॆ अगदी अगदी गौरी देशपांडे सारखा विचार करायला लागतात।
हे "दुस्तर हा घाट" आणि "थांग" नामक पुस्तक मागे वाचून झाले होते , आता त्याचा पुढचा भाग हाती लागला आहे।
"मुक्काम "

4 comments:

Ruminations and Musings said...

गौरी देशपांडेच्या प्रेमात पडले ते निरगाठी वाचून.. लिहिण्याचा फ़ार वेगळा बाज आहे तो.. तिच्या अनेक व्यक्तिरेखांमध्ये आपल्याला कळत-नकळत आपण तसे कधीतरी वागलो / तसा विचार केला हे आठवत राहाते. दुस्तर हा घाट ही तिच्या सर्व कादंब-यांमधील माझी आवडती कादंबरी.. परत परत काढून मी ती वाचत असते. वनमाळी, हरितात्या सर्वच जण आपापल्या जागी खरे आणि त्याचवेळी दुस-यावर अन्याय करतात.. गुलजारच्या नात्यांच्या चित्रणाबद्दल मी जे लिहिले आहे ते येथेही लागू होते..

गौरी झपाटून टाकतेच.. का ? चा शोध आपला आपल्याशी घेण्यात एक आत्ममग्न आनंद आहे..

HAREKRISHNAJI said...

म्हटले विजय पाडळकरांनी गुलझार वर लिहिलेले पुस्तक वाचावे, तेव्हढ्यात माझ्या समोरुन दुसऱ्या वाचकाने उचलले. परत केव्हातरी

Tulip said...

सुंदर लिहिले आहेत हरेकृष्णजी.अनाकलनीय असे नात्यांचे गुंते गौरी ज्यापद्धतीने सोडवित नेते ते वाचणे आपल्याला शहाणं करुन सोडते. तिच्या पुस्तकांना परत परत कधीही कोणतही पान उघडून वाचताना मग समजत जातं कितीतरी यातलं याआधी आपल्याला उलगडलंच नव्हतं.कारण आपली उमज कमी पडत होती. वय वाढतं, नात्यांची वीण घट्ट होत जाते तसतसे त्यातले गुंते कळायला लागतात आणि गौरी अजून अजून समजायला लागते.
एकेक पान गळावया काय किंवा तेरुओ काय, निरगाठी असो किंवा चंद्रिके ग सारिके ग. गौरीला वाचणं आणि त्यातून स्वत:ला समजून घेत रहाणं हा एक नितांतसुंदर अनुभव असतो. थांग आणि दुस्तर हा घाट ही पुस्तकं तर मी माझ्या हातांच्या टप्प्याबाहेरही कधी जाऊ देत नाही.

पुस्तकांबद्दल लिहा अजून. छानच लिहिताय.

HAREKRISHNAJI said...

Ruminations and Musings
गुलजार उमजण्याच्या प्रयत्न करतोय

Tulip,

अजुनही माझी उमज कमी पडते आहे.