Thursday, February 26, 2009

स्लम डॉग मिलीनीयर आणि वेश्याव्यवसाय

या चित्रपटात नायिकेची कहाणी काहीशी साईडट्रक झाली आहे असे मला वाटते. झोपडपट्टीतील मुलांवर जास्त लक्ष केंद्रीत झालय की काय ? त्या मानाने मुलींच्या समस्या तेवढ्या प्रखरतेने पुढे आलेल्या नाहीत.


तिचे "पिला हाऊस " मधल्या कुंटणखाण्यात वेश्याव्यवसायासाठी विक्री होणे, तेथुन नाट्यमय सुटका ( जी केवळ चित्रपटातच शक्य आहे अन्यथा तिरडी वरुनच, गुप्तरोग,ते एड्स पर्यंत कशानेही मरण पावल्यानंतरच ) मग तीचे रखेल म्हणुन रहाणे, सुटकेची निष्फळ धडपड, मनाची मुस्कटदाबी , घुसमट या कडे बरेचसे दुर्लक्ष झाले आहे।


पिला हाऊस , एक मुंबई मधली कुप्रसिद्ध वस्ती, खरे नाव तीचे "प्ले हाऊस" , या विभागात १० / १५ सिनेमा थियेटर आहेत / होती त्या वरुन पडलेले, जेथे जबरदस्त्तीने मुलींना धंद्याला बसवले जाते, ग्रांन्ट्ऱोड ते गोलदेऊळ या मधे असणारी हि देहविक्रीकरण्याची जागा.


कोणत्याही चित्रपटाचे यश कशाने मोजावे, त्याला किती पुरस्कार मिळाले आहेत, त्यानी केवढा धंदा केला आहे ? तो केवढा लोकप्रिय झाला आहे त्या वरुन की त्यात ज्या काही समस्या मांडल्या आहेत, समाजाचे जे दारुण चित्र दाखवले गेले आहे त्या बद्दल समाज पुरुषाला आपली लाज वाटुन , काही प्रमाणात का होईना पण समाजजाग़ृती होवुन , त्यांचे निवारण करण्याचा सर्व स्थरावरुन प्रामाणीक प्रयत्न केला जातो तेव्हा ?


जसे हे माध्यम समस्या जगासमोर मांडण्याचे काम करते तेव्हा समाजाचे हे कर्त्यव्य आहे की त्याने या समस्यांचे निवारण करावे.

1 comment:

Anonymous said...

good. I am glad you are looking at this movie in the positive light - not just taking issues with them showing reality (as I have heard some other bloggers India do)