Saturday, February 07, 2009

भलत्या वेळी

"अत्यंत सामान्य आणि गर्दीच्या ठिकाणी चुकीच्या वेळी एखादि अभिरुचीपूर्ण सुंदर गोष्ट समोर आली, तर आपण त्याच्या आस्वाद घेवु शकतो का ? थांबून दाद देऊ शकतो का ? वेळेचे गणित काय सांगतं ? "
 
"भलत्या वेळी ". - संध्या टाकसाळे. साप्ताहिक सकाळ. 
 
"निसर्गसौंदर्य टिपयला लागतं तरल मन, निसर्गाशी मैत्रीचा अतूट बंध. अश्या वेळी चिकित्सा न करता त्या सौंदर्याचं आकंठ पान करणं सर्वात महत्वाचं. निसर्गसौदर्याचं दर्शन क्षणाभराचंही असू शकरं आणि त्यामुळॆच हे सौदर्य अनुभवायं तर योग्य जागी आपणहुन्निसर्गाच्या कुशीत जायला हवं. निसर्गसौदर्याचा मनमुराद आनंद घ्यायला हवा." 
 
"निसर्गसौदर्य कसं अनुभवावं ? "- प्र.के.घाणेकर. साप्ताहिक सकाळ.
 
दोन्ही लेख फार भावले.
 
एक अशीच संध्याकाळ. पावसाळलेली. घाण्याला जुंपलेला बैल कावुन संध्याकाळी बाहेर पडला, समोरील ओव्हल मैदानात शिरला. राजाभाई टॉवर, हायकोर्टाची इमारत, मुंबई विद्यापिठ, त्या बाजुच्या इमारती नेहमीच भुरळ घालत असतात. अचानक लक्ष आकाशाकडे गेले. राजाभाई टॉवर वरती चक्क मस्तपैकी इंद्रधनुष्याने कमान धरली होती, राजाभाऊ थबकले आणि ते मनमोहक दृश्य पहातच बसले, त्या इंद्रधनुष्याच्यावरती आणखी एक इंद्रधनुष्य लुभावत होते. एकावर एक अशी दोन इंद्रधनुष्य पहातांना राजाभाऊ वेडेपिसे झाले. जाणाऱ्यायेणाऱ्यांना सांगु लागले , वर पहा आकाशात पहा, निसर्गाचा अविष्कार पहा. 
 
लोकांना वेळ कुठे होता. ६.४८ ची ट्रेन चुकेली असती ना.
 
अशीच एक संध्याकाळ. सिध्दगडाच्या कुशीत असलेल्या वीर कोतवाल स्मारक व छानश्या धबधब्याला भेट दिल्या नंतर एका पायवाटेने खाली उतरतांना. मधेच पायवाटॆची घसरवाट झालेली. गायकऱ्यांनी त्यावरुन लाकडंचे ओंडके खाली घसरत नेल्याने पुरती वाट लागलेली. घसरत घरंगळात, पड्धडपडत उतरल्यानंतर आलेले पठार, जीवाला हायस वाटलेले. 

अचानक समोर येतो तो परतणाऱ्या गायीगुरांचा कळप, कानी येतो तो घंटेचा मधुर ध्वनी आणि डोळ्यात भरते ती गोधुली. आता पर्यंत गोधुलीचे वर्णन वाचलेले. 

मग अचानक अकस्मात आकाशात झेप घेते पलीकडे असलेला पांढऱ्याशुभ्र बगळ्यांची माळ.         
 
           
  

2 comments:

Ruminations and Musings said...

अशा अनेक आठवणी तुमच्या लेखाने जाग्या केल्या.. खूप तरल लिहिले आहे.. आवडले.

HAREKRISHNAJI said...

आपण मला हरभऱ्याच्या झाडावर चढवत आहात.