तुम्ही भेटलात म्हणुनच आयुष्यात गुलजार मोसम आला। ( विजय पाडळकरांच्याच शब्दात)
केवळ हा लेख वाचला आणि जाणवले आता पर्यंत आपल्याला गुलजार विषयी काहीच माहिती नव्हती, तुकड्या तुकड्यात आपण गुलजारला पाहात होतो आता सविस्तर पहाणाचा प्रयत्न करुया, सुरवात तर करुया " गंगा आये कहांसे , गुलजार : एका दिग्दर्शकाचा प्रवास " या श्री. विजय पाडळकर लिखीत पुस्तकापासुन. )
1 comment:
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात मनातली कविता जागी असणारा माणूस म्हणून गुलजार मला प्रिय आहे.. अगदी.. कजरा रे.. या गाण्यातही तेरी बातोंमें किमाम की खुशबू हॆ
तेरा आना भी गर्मियोंकी लू हॆ.. असे तो सहज लिहितो.. चांदसे होके सडक जाती हे, वहींपे जाके कही अपना निशा होगा.. असे वाटण्याचे एक वय असते.. ते उलटून गेल्यावर उन्हे दग्ध होती इतकेच जाणवते. पण त्या उन्हातही
परंतु तुझे हात हातात आले, व्यथांचे तळे गा निळेशार झाले.. असे जे संदीप खरे म्हणतो. तसे मला गुलजारबद्दल वाटते.. त्याच्या शब्दांमुळे सगळ्या व्यथांचा विसर पडू शकतो. मात्र ते अनुभवायला एक मनाचा तरलपणा लागतो. तो तुमच्यात आहे. मी एक निमित्त आहे.
तुम्ही तुमच्या ब्लॉगवर माझ्या लेखाचा संदर्भ देऊन गुलजार आयुष्यात आल्याचे लिहिल्याबद्दल धन्यवाद..
घेता घेता एक दिवस देणा-याचे हात घ्यावेत.. याचा हा खरा अर्थ आहे.
Post a Comment