Sunday, February 15, 2009

बचा ले मोरी मां. - मधुसुरजा


बचा ले मोरी मां. 
 
माध्यांनीचा सुर्य डोक्यावर तळपतोय, बेभान, बेफाम झालेले माणसे मिरवणुकीने देवळाकडे चालली आहेत, वधस्थंभाकडे , बळी द्यायला बकऱ्यांना घेवुन. त्यांना सजवुन, गुलाल उधळत, वाजतगाजत, ढोल बडवत.
 
बकरी टाहो फोडतेय, आक्रोश करतोय , बैबैबैबैबेबेबेह  
 
बचाले मोरी मां. 

ये मोरी मां, मां, मोरी मां, मां, बचाले मोरी मां,  ये , ये, ये मोरी मां, मोरी मां, ये मोरी, ये मोरी, बचाले मोरी मां. मां, मां, मां, मां, मां, 
 
अरज यही तोरे  
घरमे ललुआ अकेला. 
 
विनवणी करते , घरी माझे तान्हे कोकरु, लेकरु आहे, भुकेले असेल , वाट पहात असेल, आपली आई केव्हा येईल, आपल्याला दुध केव्हा पाजेल, मला जावु दे ना, मां, बचा ले मोरी मा. 
 
पण ती मां तर बडी निर्दयी, आणि ती बेहोश झालेली माणसे, त्यांच्या कानी कुठली ही विनवणी जायची ? त्यांच्या मनी दयेचा पाझर कुठला फुटायचा ?
 
ढोलीया बजाले , बजाले, ढोलिया बजाले. बजाले, ढोलीया बजाले, बजाले, बजाले. ढोलीया, ढोलीया, ढोलीया 
 
 
करम करो तेरो , माई की जो साध है जो है  
 
पण त्या मरणाला सामोरे जाण्याऱ्या बकरीला ठावुक आहे आपले मरण अटळ आहे. 
 
क्षणभर त्या ढोलीयाचे वाईट वाटुन हात थबकतात, ती बकरी त्याला आपल्या कर्तव्याची जाणीव करुन देते. 
 
ढोलीया, ढोल बजावणे हे तुझे काम आहे, तुझे कर्तव्य तु कर. मी मरावे ही तर त्या माईची इच्छा आहे.  
 
हा कुमार गंधर्व रचीत "मधुसुरजा ’ हा एकच राग असा आहे की जो माझ्या मनाला ऐकवत नाही.        
 
 
 

6 comments:

Anonymous said...

चित्र डॊळ्यापुढे उभं केलंस... सुंदर लिहिलंय..

Vivek S Patwardhan said...

Your post hit me hard. What you have written came straight from heart.

Just as we must decide what to eat, we should also decide what not to eat.

Your post will stay on my mind for a long time.
Vivek

Dharmaraj Mutke said...

ase

Anonymous said...

Still people will continue to eat Chicken, goats etc. etc. They will never think that what we are eating is not unethical.

HAREKRISHNAJI said...

जेव्हा जेव्हा मी हा राग ऐकतो किंवा तो आठवतो तेव्हा मन सुन्न होते. अजुनही त्याचा परीणाम जाणवतोय. आपल्याला जर मासांहार करायचा असेल तर माणसाने जरुन करावा पण निदान त्या प्राणाल्या मरणतरी सुखचे द्यावे. पायथ्यापासुन वर देवीच्या देवळापर्यंत मुक्या प्राण्यांची वरात काढायची नाटके कशासाठी ? त्या मुक्या जीवाला आपले मरण नक्कीच डोळ्यासमोर दिसत असणार

Anonymous said...

हरेकृष्णजी,
तुमच्याकडे हा राग असेल तर तुम्हाला मला देणं शक्य होईल का? मी खूप दिवसांपासून याच्या शोधात आहे.
शक्य असेल तर कळवा rutugandh@gmail.com हा माझा ID आहे.