Thursday, February 19, 2009

"मेड इन चायना" ते शुद्ध भारतीय

काल चित्रपट महोत्सवात "मेड इन चायना" पहायला गेलो, कामाचा डोंगर उपसायचा सोडुन. उगीचच गेलो असे वाटायला लागले, नाही आवडला. काहीच खास बात नाही. मेड इन चायना बनावटीच्यां वस्तुंसारखाच वाटायला लागला, तीच घराणेशाही, तेच नेते, तेच बिल्डर, तेच नाडले जाणारे शेतकरी, तीच , शौकबाजी , तेच अत्याचार । अन्याय। नेहमीच्याच पठडीतला।

आदल्या दिवशी "जोगवा" चित्रपटाने येवढ्या उंचीवर नेवुन ठेवले होते तेव्हा आता कोणतीही तडजोड करणे कठीण होत गेले

माणुस चित्रपटामध्यल्या "कशाला उद्याची बात बघ ढळुन चालली रात " या अप्रतिम गाण्याच्या भ्रष्ट रिमिक्स वर नाचणाऱ्या बारबाला बघवेनाश्या झाल्या आणि उठलो, वीसच मिनीटात।

तेवढ्यात आठवले सर ज.जी. कलामहाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन भरले आहे व आत्ता तेथे पं.प्रभाकर कारेकरांचे गाणे आहे.
मग काय पोहोचलो तडक तेथे।


त्यांचे कलाप्रदर्शन कालही पहाता आले नाही. परवा सकाळी ९ वाजता गेलो होतो आणि काल संध्याकाळी ७ वा।

सं १० ते सां. ६ या वेळेत ते उघडे असते. या वेळेत कार्यालयातुन जाणे कठीणॅच. पाहु उद्याला जायला जमते का ?

No comments: