Friday, February 06, 2009

नाही चीरा नाही पणती.

नक्षलवाद्यांनी १५ पोलीसांची अमानुषपणॆ, निर्घुणपणे हत्या केल्याचे अलीकडे वर्तमानपत्रात वाचनात आले. 
 
केवळ एक बातमी. बस्स. वाचुन नजरेआड करायची.  त्या पलीकडॆ काहीच नाही. या नक्षलवाद्यांनी आतापर्यंत किती पोलीसांच्या हत्या केल्या असतील, पण या त्यांच्या कौर्याला बळी पडलेल्या पोलिसांच्या नशिबी,  नाही चीरा नाही पणती.
 
का बरे आपला देश पेटुन उठत नाही हे वाचुन ? का बरे सर्व पक्षाचे राजकीय नेते या विरुद्ध ब्र काढत नाहीत ? का मेणबत्या घेवुन या वीरगती पावलेल्या पोलीसांसाठी जनता रस्त्यावर उतरत नाही ? का या शहीद झालेल्या पोलीसांना त्वरीत मरणोत्तर पुरस्कार दिले जात नाहीत ? 
 
हे नक्षलवादी आणि अतिरेकी  यांच्यात फरक काय ? असलाच तर तो एकच . हे सीमेच्या आतले व ते दहशतवादी सीमे पलिकडले.   
 
मग हा दुजाभाव का ?     

2 comments:

Asha Joglekar said...

हा दुजाभाव नकोच, पण प्रत्येक ठिकाणी तो दिसतोच . किती तरी लोक आज पर्यंत आतंक वाद्यांचे बळी ठरले पण जितका विरोध ह्या वेळी झाला तसा पूर्वी कुठे झाला कारण ते सर्व गरीब किंवा मध्यम वर्गीय होते .
पण आपण वाहूया ह्या वीरांना श्रध्दांजली. करूया नमन आणि प्रार्थना .

HAREKRISHNAJI said...

आशाताई,

आपण म्हणता ते खर आहे.