Monday, July 30, 2007

पंडित विभव नागेशकर

JUHI CHAWLA




जुही चावला व मेघ मल्हार




सिनेअभिनेत्री जुही चावला आज राग मेघ मल्हार गायली. निमित्त गुरु पौर्णिमा. पं. पंढरीनाथ कोल्हापुरेंकडे ती शास्त्रीय संगीत शिकत आहे. मुंबई विद्यापिठाने आज गुरु पौर्णिमे निमित्त शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आयोजीला होता.
प्रत्येकाच्या आयुष्यात प्रथमवेला असते. जुही चावला आज पहिल्यांदाच रंगमंचावर शास्त्रीय संगीत गायली. अर्थात यात कौतुकाचाच भाग जास्त होता.

मिडीयावाल्यांनी उबग येईपर्यंत उच्छाद मांडला होता, ५०-१०० वार्ताहार व चॅनल वाले होते. आता उद्याला भरभरुन वर्तमानपत्र, सिनेमासिकातुन याचे वॄतांत वाचायला मिळेल.
जुही चावलाचे गाणे संपले व सभागॄह बरेचसे रिकामे झाले.

Sunday, July 29, 2007

कुर्ग, बांदीपुर, मधुमलाई, मसीनागुडी, कुन्नुर

कुर्ग हे लहानसेच हिल स्टेशन आहे, या परीसरात "होम स्टे" या पर्यटन खात्याच्या योजनेप्रमाणे रहायला उत्तम बंगले मिळतात.

खुद्द मडीकेरीत फारसे पहाण्यासारखे जास्त काही नाही, येथे गरम मसाल्याचे पदार्थ, कॉफी, मध मस्त मिळतात. वाटेत जातायेताना लागणारी अमाप निसर्गसंपदा पहाण्याजोगी, येथुन जवळच तलकावेरी येथे कावेरी नदीचा उगम आहे, पण वेळे अभावी तेथे जाण्याचे टाळाले. आडवाटकरुन नागरहोळे या अभयारण्यात ही जाणे जमले नाही. काबीनी नदी काठी असलेले हे अभयारण्य मस्त आहे. पण आमचे ते पहायचे राहुनच गेले. परत केव्हातरी.


आजचा पल्ला लांबचा होतो. मडीकेरी ते कुन्नुर - या साठी परत म्हैसुरला यावे लागले, आमचा प्रवासाचा मार्ग चांगलाच चुकला, आम्ही उलट्या मार्गे सुरु केला, मडीकेरीला शेवटी येवुन मंगळुर मार्गे परतायला हवे होते. पैश्याअभावी धडक नियोजन केलेले नव्हते. परत म्हैसुरला परतलो, चामुंडादेवीचे दर्शन घ्यायचे राहीले होते , ते गर्दी, रेटारेटीत, घेवुन झाले. आपल्या सर्वच देवस्थानात हीच परीस्थीती का असते ?


आता वेध लागले होते ते बांदीपुर अभयारण्यावे, कसले भरगच्च जंगल या परीसरात आहे, आम्ही या परीसरच्या प्रेमात पडलो आहोत. येथे पर्यटन खात्याचे निवास ही मस्तच आहे, भर जंगलात, अशी ठिकाणे आयुष्यात एकदा जावुन पुरत नाहीत, परत तेथे जावेसे वाटते. या भर जंगलात आम्ही रहायला हवे होते. पर्यटन निवासाजवळ गाडी थांबवली, आता अभयारण्यात पर्यटनखात्याच्या बसने, गाडीने, किंवा हत्तीवरुन फेरफटका मारायचा होतो. सहज आजुबाजुला पाहिले एका हरीणाने दर्शन दिले, हळुहळु नजर विस्तारत गेली तशी हरीणांचे कळपच्या कळप दॄष्टिस पडु लागले, रात्री हजारो हरणे या निवासात मुक्कामाला येतात म्हणे. मग बस मधुन अभयारण्यात प्रवेश केला, पहील्या गजराजाचे दर्शन झाले, मग दुसऱ्या, मग तिसऱ्या, मग चौथ्या, किती हत्ती पाहु नी किती नाही, सोबतीला वानरे होतीच, रानडुक्करे, हरणे, बहार आली. खर म्हणजे अभयारण्य बस मधुन भटकण्याची ही पद्धत खरी नव्हे, पण शेवटी ! येथे दोन-चार दिवस रहायला हवे, निसर्गाशी समसस होत, चवीचवीने त्याचा आस्वाद घेयला हवा. निघण्याचे मन करीत नव्हते, पण रात्र पडायच्या आत कुन्नुर गाठायचे होते. मधे मधुमलाईच्या अभयारण्यात ही फेरफटका मारायचा होता.


हा संपुर्ण रस्ता मस्तच आहे, कधीही संपु नये, वाटेत येवढे मोर पाहिले की बस्स. परत वाटेतल्या मधुमलाईच्या अभयारण्यात बस नी फेरफटका मारला, जवळच्या हत्तीशाळेत जावुन आलो. किती रम्य संध्याकाळ होती ती. अश्या वेळा खुप थोडयाच वेळा आपल्या नशिबी का येतात ?


आमची गाडी आता मुख्य रस्ता सोडुन उजवी कडे वळली, हा एक नवीन रस्ता झाला आहे. वाटते एक छानसे गाव लागले. "मसीनागुडी". अरे. हे नाव परीचीत वाटते ? कस काय बर ? हा ! आपल्या पुण्याचे श्री कॄष्णमेघ कुंटे हे या गावात रानकुत्रांच्या विष्टेतील पॅरासाईटस वर संशोधन करण्यासाठी राहीले होते. त्यांनी यावर "एका रानवेडयाची शोधयात्रा" हे अप्रतीम पुस्तक लिहीले आहे. त्यात त्यांनी केवळ पैश्यासाठी लालची हैवान टस्करच्या (मोठा सुळेवाला हत्ती) होणाऱ्या कत्तली बद्दल जे काही लिहीले आहे ते वाचुन मन सुन्न होते. श्री. कुंटेच्या प्राध्यापकांनीही (बहुधा प्रा. आपटे, नाव बरोबर आठवत नाही ) या परीसराविषयी चांगले पुस्तक लिहीले आहे. या गावात दाट जंगलात अनेक रिसॉट्स आहेत. संध्याकाळी हा रस्ता वाहनांना बंद होते,


रमतगमत केलेल्या या प्रवासामुळे फार उशीर झाला होता, रात्र जंगलातच सुरु झाली होती, मग ऊटीलाच रहायचे ठरवले. अती पर्यटकांमुळे अती लाडावलेले हे गाव आहे. आम्ही बेमौसमी गेल्या मुळे तसे रिकामेच होते. आम्हाला कुन्नुरला जायचे होते, जुन्या स्मॄती उजाळण्यासाठी.


माझे वडिल एका फॉरेन बॅंकेत कामाला होते तेव्हा त्यांना रहाण्यासाठी बंगले मिळत, कुन्नुरला चहाच्या मळातच फार अलिशान बंगल्यात आम्ही पुर्वी राहीलो होतो. मग आम्ही कुन्नुरला गेलो, सिम्स पार्क मधे भटकलो, संध्याकाळी परत उटी ला परतुन मुक्कामाला म्हैसुरला आलो. हे शहर चवीचवीने पहायचे राहीले होते, येथली बाजारपेठ पालती घालायची होती, गुरु मधे म्हैसुरपाक ही खायचा राहीला होता, ते सारे पुरे केले व धरली वाट रहाटगाडग्याची.

Saturday, July 28, 2007

म्हैसुर, मडीकेरी, दुबारे कॅप

दरवर्षी एक लांबची सफर करणे हा आमचा शिरस्ता. आमचे आम्हीच. जेव्हा लोक विचारतात कोणाबरोबर जाणार तेव्हा मला त्यांची कीव येते. आपलेआपण प्रवास करु शकतो हे ते विसरुनच गेले आहेत. ट्रेनची टिकिटे कोण काढत बसणार ? परक्या शहरात रहायला हॉटेल कोठे शोधणार, आपल्यासारखे जेवण मिळणार नाही, एक ना अनेक अडचणी.
टॅव्हल कंपन्यांबरोबर जाणे आम्ही नेहमीच टाळले. एकतर त्याच्या प्रत्येक माणसी असलेल्या दरात आम्हा तीन जणांची भ्रमंती होते म्हणुन व स्वतंत्र गेलो की आपण आपले राजे असतो, कसेही कोठेही मनमुराद भटका, ठिकाण आवडले तर एखादा दिवस जास्त रहा, नाहीच आवडले तर चालु पडा. जे वहान मिळेल ते घेवुन आपल्या मार्गावर पुढे सरकत रहा, लांबची दिशा आधी पकडा मग मागे सरकत या, शक्यतो जेवणाचा जास्त बावु करु नये, स्थानीक खाद्यपदार्थ खाण्यावर आमचा भर असतो. वेळ प्रसंगी काहीच खायला मिळाले नाही तर फळे, केळी खावुन राहीलेलो आहोत.
जाण्याआधी मात्र त्या प्रदेशांची सर्व माहीती आम्ही करुन घेतो, म्हणजे त्याच्याशी मानसीकद्रुष्ट्या समरस व्हायला होते व प्रवासाची रंगत वाढते. आतातर अनेक उत्तम पुस्तके उपलब्ध आहेत, इंटरनेट च्या माध्यमातुन घरबसल्या संपुर्ण माहीती मिळते, पुर्वी फार तुटपुंजी माहीती मिळायची. आपल्या पर्यटक कचेरींवर अवलंबुन रहायला लागायचे, तेथेही काय मिळायचे तर छापील पाने आणि अज्ञान.
बंगळुर व म्हैसुरला मी लग्नाआधी तीनदा जावुन आलेलो, पण जोडीने जाणे जमत नव्हते , अनेक वेळा या शहरांनी आम्हाला हुलकवण्या दिल्या. दोनदा कुन्नुरला आम्ही गेलो असताना पण कोईम्बतुर मार्गे व एकदा चेन्नई मार्गे परतावे लागले होते. छोकरा एसीसी पास झाला तेव्हा त्याला घेवुन या परीसरात भ्रमंती करायचे ठरवले. खरतर खुप फिरायचे होते ,पण दामाजीपंतांनी घोडा अडविला होता. दोन दिवस बंगळुर व दोन दिवस म्हैसुर पाहुन परतायचे बस्स येवढाच बेत होता. पण नियतीच्या मनात ते नव्हते.
एकतर माझे चिरंजीव शहरात यायला व रहायला तयार नव्हते. कसाबसा त्याला तयार केला. माझ्या बंगळुरमधल्या सहकाऱ्यानी जे हॉटेल रहाण्यासाठी सुचवले होते त्यात न रहाता मी कामत यात्री निवास मधे राहीलो. माझी निवड चुकली होती. एकतर ते उगाचच महागडे होते व त्याला आता अवकळा येत चाललेली आहे. प्रथम घासे मक्षीःकाप्रात (?). प्रथमभेटीत त्या दोघांनाही हे शहर फारसे भावले नाही, मलाही पहील्या दिवशी दाक्षिण्यात्य पदार्थांची मनोजोगती चव चाखायला मिळाली नाही, नाराज मनाने पहाटेच आम्ही म्हैसुरला प्रस्थान केले. प्रवासाची सुरवात झकास झाली. काय तो त्यांचा बस अड्डा नाहीतर आपल्या कडची बस स्थानके. लाज वाटते, या दोन शहरा दरम्यान सर्वोत्तम वोल्वो बससेवा आहे. दर फक्त रु. १३५.००
पैसे वाचवायचे करुन आधी पर्यटन खात्याच्या हॉटेलात गेलो. वाडा चिरेबंदी, ढासळत चाललेला. तडक सामान उचलले व हॉटेल सिद्धार्थ वर धडकलो. पुर्वी या मधे मी राहीलो असल्या मुळे हे माझा माहीतीतले होते. मस्त हॉटेल आहे, परीसरही सुंदर आहे. व उपहारगॄह तर सर्वोत्तम आहे. मस्त बागा, उद्याने, हे शहर मला खुप आवडते.
सायंकाळी वॄंदावन गार्डन पहायला निघालो, म्हटले बाहेरुन टॅक्सी करु, हॉटेलच्या ट्रॅवलडेस्क वर महाग मिळेल. पण ते काही जमले नाही, मग हॉटेलच्या ट्रॅवलडेस्क वरुन गाडी केली. आमचा "कांता", गाडीचा सारथी खुप कुशल होता, गाडी चालवण्यात व बोलण्यातही, हळुहळु आम्ही वहावत गेलो, गुंगत गेले, मन चलबिचल होत गेले,
रम्य सायंकाळ, मी, बायको आणि कुलदिपक, वॄंदावन गार्डन, मदहोशी वातावरण, कारंजे, दुसऱ्या दिवशीचे बेत ठरु लागले. त्यांनी मला पटवलेच, उटीला जाण्यास राजी केलेच. अतीपरीचयाने मला परत तेथे जायचे नव्हते, पण शेवटी मान तुकवावी लागली. आता पुढे पैश्याचा विचार करायचा नाही, घरी परत गेलो की कुठुनतरी पैसे उभे करु असे मनाशी योजले. परतल्यावर दोन दिवसासाठी गाडी ठरवली, वाटेत मधुमलई, व बांदीपुर करत उटिला जाण्यासाठी.
खर म्हणजे गेले अनेक वर्षे मी कारवार, शिरशी, दांडेली अभयारण्य, मुरडेश्वर, मंगळुर, उडिपी, गोकर्ण, व मडीकेरी या प्रदेशात जाण्यासाठी तडफडतो आहे. पण जाणे होत नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे अचानक चार वाजता जाग आली मनात विचार आला , अरे आपण मडीकेरीच्या येवढ्या जवळ आहोत तर जावु का नये ? दिवस व पैसे वाढतील खरे पण आता त्याची पर्वा कुणाला ? बायको माझीच, अश्या बेताला तीचा होकार एका पायावर असतो, निघालो, सोबत कांता व इंडिका गाडी. ठरवुन केलेल्या गाडीने फिरण्यासारखे सुख नाही. प्रथमच मला जाणवले, त्यात कांता सारखा सदैव तत्पर असलेला सारथी. त्याला सांगीतले बाबारे आता पुढचे चार दिवस तु आम्हाला नेशीले तेथे आम्ही येणार.
हॉटेल सिद्धार्थ मधे चवदार डोसे रिचवले व निघालो, आधी राजवाडा बघीतला मग लागलो मडिकेरीच्या रस्ताला. किती सुंदर असावे एखाद्या प्रदेशाने. या रस्तावरुन प्रवास करताना बहार आली. मस्तपैकी जंगलच जंगल या साऱ्या परीसरात आहे.
या रस्तावर एक खुप मोठी तिबेटी लोकांची वसाहत आहे, त्यात त्यांच्या मॉनेस्टीज पहायला आम्हाला कांता घेवुन गेला. यात एका प्रशस्त हॉल मधे देखण्या व भव्य मुर्त्या आहेत. सारा परीसरही खुप छान आहे. पुढे गेल्यानंतर वाटेतच मधे आमवी गाडी मधेच आडवळणावर वळली. एका जंगलात आम्ही शिरलो. ती जागा होती दुबारे येथील जंगली हत्तींना माणसाळावयचा कॅप. संध्याकाळची वेळ, वाटेतली नदी ओलांडुन पलीकडे छोट्याशाच लॉंचनी गेलो, हत्तींची जेवणाची वेळ होत होती, हळुहळु एकेक हत्तींना घेवुन त्यांचे माहुत नदीवर येत होते, जवळपास हत्ती फिरताहेत, नदीत हत्ती पोहत आहेत, जवळपास, अगदी नजदिक, जंगलात हत्तीच हत्ती, आमची उत्तेजकता फारच वाढली होती. हे सारे पहाण्याची संधी आम्हाला कांतामुळे मिळाली. हे खुप रम्य ठिकाण आहे, नदी किनारी रहाण्यासाठी खुप चांगले हॉटेलही आहे. जवळपासच्या गावात रहाण्यासाठी घरेही मिळतात, येथे आम्ही रहायला हवे होते. पाय निघवत नव्हता. पण मुक्कामाला जायचे होते ते कुर्ग ला.
लहानसेच हे हिल स्टेशन आहे, या बद्द्ल मी खुप वाचले होते, येथील लढवय्ये कुर्गी लोक, मेजरजनरल करीअप्पा, येथील कॉफीचे मळे, निसर्गसौन्दर्य. कांतानी आमच्या मुक्कामासाठी एक मस्त बंगला शोधुन काढला, राजाज सीट या पॉइंट जवळ, माफक भाडे,
सकाळी नाष्ट्याला समोर आली ति कोरी रोटी व चटणी.

अपुर्ण.

रावण

शेवटी चांगलं कोण वाईट कोण, सुष्ट कोण दृष्ट कोण हे तो इतिहासकारच ठरवणार ना? वाल्मिकीनं म्ह्टलं म्हणून राम राम ठरला आणि रावण रावण!

मीना प्रभुंचे "तुर्कनामा" या पुस्तकातील हे वाक्य किती खर आहे.

रावण काय किंवा दुर्योधन काय, आम्ही त्यांना कायमच खलनायक म्हणुनच स्विकारलय. ते आम्हाला कधी उमगलेच नाही, कळलेच नाही, कदाचीत आम्हीही आहे त्या पलीकडे जाणुन घेण्याचा प्रयत्न केलाच नाही. स्वतंत्रपणे पणे विचार करायला कधी कोणी सांगीतलेच नाही. वास्तवीक पहाता यांना रणांगणात आपले कर्म करतांनाच मॄत्यु आला, व त्यामुळे गीतेत सांगीतल्या प्रमाणे फक्त तेच मरणा नंतर स्वर्गात गेले असावेत.

उषा पाणंदीकर यांनी आपल्या "देखणी दक्षिण " या पुस्तकात रावणाचे फार सुरेख वर्णन केले आहे. त्या लिहितात.

रावणाची मातॄभक्ती या महाबळेश्वर मंदिराच्या रुपात पाहावी. रावण ही असामी नगण्य नव्हती. या दक्षिणेच्या सम्राटापुढे मोठेमोठे राजे बिचकुन असत. विंद्य पर्वताखालची द्रविड संकॄती ही या राक्षस राजाच्या पराक्रमाची खुण होती. हा चौदा चौकडीचा राजा नुसता रणांगणावरचा योद्धा नव्हता, तर कवी होता. संगीत, नृत्य जाणकार होता,. सामवेद पचवुन रिचवुन होता. पंचमवेद, कॄष्ण्यजुर्वेदाची रचना याच्या हातुन झाली. त्याच्या नावाची संकॄत हस्तलिखितेसुचित ग्रंथ, कुमार तंत्र, प्राकॄत कामधेनु, अर्कप्रकाश, इंद्रजाल ही अजुन आहेत.

तो राक्षस होता, पण त्यानी राक्षस विवाह केला नाही. त्याच्या अंतःपुरात ब्राम्हण, दैत्य, गंधर्व, राक्षस, नाग, यांच्या सुकन्या होत्या; पण त्या बलात्कारने आल्या नव्हत्या. त्यांच्या वर बळजबरी नव्हती. नल कुबेराची पत्नी त्याच्यावर आशिक होती, पण याने तिला उपदेश करुन परत पाठविली. मंदोदरीशिवाय त्याने दुसऱ्या स्त्रीशी विवाह केला नाही. ( पण मी दुसऱ्या एका पुस्तकात या पेक्षा जरा वेगळी माहीती वाचलेली आहे. ते पुस्तक एका संशोधकाने लिहीलेले आहे. नाव व संदर्भ आठवत नाही. वाचनालयातुन पुस्तक आणल्यावर सविस्तर लिहीन )

रामाप्रमाणे तो एकपत्नी होता. म्हणुनच आर्यांचे भाट वाल्मीकीसुद्धा रावणाचे कौतुक करताना भान विसरतात ...... " तो वैडुर्यमण्यासारखा निळसर पर्वतासारखा प्रचंड, .. ज्याच्या हाताचे व पायाचे तळवे सोनेरी होते, बगळ्याच्या पंक्तीतल्या सुशोभित असलेल्या वसंतातल्या मेघासारखा ..... "असा तो सुंदर भासला. तो आला की सुर्य शीतलता धारण करी, पवन संथ वाहत असे, नद्या वेग सोडुन देत असत, पर्वत कठोरता विसरत असत. "

हाउस ऑन फायर

घरात तुला काय काम असते ? आयुष्यभर बायकोला हेटाळुन झाले. आज स्वताच्यात थोबाडीत मारुन घेतले, परत बोलणार नाही.

दोन-तीन दिवसासाठी ती लग्नाला अहमदाबादला काय जाते आणी दोन दिवसात फक्त दोन दिवसात घराचा उकिरडा होण्यापर्यंत परीस्थीती जात चालली आहे. दोन दिवस घरात केरकचरा नाही, धुणीभांडी नाही , परवाची भांडी घासायची तशीच पडली आहेत, चादरीचे गोळे तशेच पडले आहेत. बिछाने आवरलेले नाहीत, सकाळचे दहा वाजले तरी माझा नास्ताचा प्रबंध झालेला नाही , फ्रिझ मध्यल्या पाण्याच्या बाटल्या भरलेल्याच नाहीत, मुळात घरातील पाण्याच्या टाकीत पाणी आहे का माहितच नाही, दोन्ही दिवस पहाटे लौकर मी पाणी भरण्यासाठी उठलेलोच नाही, पिण्याचे पाणी उकळवायचे राहीलेले आहे, वर्तमानपत्रे अस्तावस्त पडल्यात, घरात येवढी धूळ येतो कोठुन ? तीला जाताना मारे आम्ही शुराचा चेहरा करुन बजावुन सांगीतले होते, आमचे आम्ही पाहुन घेवु पोरग्याला काल कसाबसा मस्कापाव खिलवला, आज पोरगा तसाच उपाशी कॉलेजला गेला आहे, खायेल काहीतरी कॅटीन मधे.

आज वॉशींगमशीन मधे कपडे धुतले नाही तर उद्याचे काही खरे नाही, पण वॉशींगमशीन लावायची कशी ? त्याचे शास्त्र काय आहे ? काय ठावुक? मला फक्त चहा कसा करायचा तेवढेच ठावुक. दोन दिवस दुधही तापवलेले नाही. जी काही गॅस पाशी लुडबुड केली त्याची परीणीती ओटा बरबटुन ठेवण्यात झाली आहे.
आज घराबाहेर पडायची पण पंचाईत. मुलगा क्लास , कॉलेज मधुन घरी केव्हा येतो नीटसे माहीत नाही, घराची दुसरी चावी त्याला घेवुन जायला सांगायला विसरलो.
मीच नाही का, रोज सकाळी मी नास्ताला उशीर झाला की तिच्या अंगावर ओरडायचो, किती उशीर करतेस म्हणुन. मला कार्यालयात जायचय, कळत नाही का ?
माणुस समोर असला की त्याची किंमत केली जात नाही, आणी ती कळतही नाही. घरात केवढी कामे असतात ते आता कळतय. माझी गुणाची बाय ग तु !!
जाण्यापुर्वी तीने शेंगदाण्याचे लाडु करुन ठेवले आहेत आता त्याचाच सहारा. कस व्हायच ?

"तुर्कनामा " - मीना प्रभु

आज मी हे मु.पोष्ट. "इस्तिकलाल कादेसी ", इस्तंबूल, तुर्कस्तान मधुन लिहीत आहे. नुकताच केप्ते (कोप्तें) व पिलाफ (पुलाव) चा स्वाद घेवुन झालेला आहे, अक्रोड, बदाम पिस्ते, बेदाणे, हेझनट्स, खारका आदींवर मुठमुठ भरुन ताव मारुन झालेला आहे, आईस्क्रिम, बक्लावा हादडुन होत आहे.
हल्ली माझा मुक्काम तुर्कस्तानमधे आहे. सुप्रसिद्ध लेखिका डॉ. मीना प्रभु यांच्या बरोबर मी आज या देशात आलेलो आहे, आता पुढचे दिवस मी तुर्कस्तानात मनमुराद भटकणार आहे. मी मीना प्रभुंनी लिहिलेले "तुर्कनामा " हे तुर्कस्तान चे प्रवास वर्णन वाचायला घेतलेले आहे. नुकतेच "ग्रीकांजली " वाचुन संपवले, सबंध ग्रीस त्यांच्या बरोबर फिरुन झाले, आता पुढला मुक्काम तुर्कस्तानात.
मीना प्रभुं नी लिहिलेल्या प्रवासवर्णानांची हिच तर खासीयत आहे, त्यांचे प्रत्येक पुस्तक वाचतांना त्यांचा वाचक त्यांच्या बरोबर हे सारे प्रदेश अनुभवत असतो, तो शरीराने आपल्या घरी जरी असला, तरी मनाने तो केव्हाच त्या जागी, परदेशी पोचलेला असतो.
"माझ लंडन", दक्षिणरंग", मेक्सिकोपर्व", "चीनी माती " "इजीप्तायान" "ग्रीकांजली " व आता "तुर्कनामा". ही त्यांनी लिहीलेली प्रवासवर्णने.
जर आपण त्या देशाचा इतिहास, संस्कॄती, भौगोलीक रचना, रीतीरिवाज, माणसे यांची काहीही माहीती न करुन घेता, परदेशात गेलो तर परत येताना आपण कोरडेठाक असतो. कोणताही प्रदेश पहाताना त्याच्याशी मानसीकरीत्या सहभागी होण्याची गरज असते, तसच आपण त्यात डुंबुन जावु शकतो. अगदी हेच मीना प्रभु आपल्याला जाणवुन देतात.
गालीबचा "क्या वो नमरुद की खुदाई थी । बन्दगी मे मेरा भला न हुआ ॥" हा शेर माझ्या आवडीचा. या नमुद केलेला नमसुद हा राजा इथलाच. स्वतःला प्रतीपरमेश्वर मानणारा, व त्या मुळे त्याचा सर्वनाश झाला. (मी तर तसे स्वतःला समजत नाही तरी माझा का नाश व्हावा ? असे मी नेहमीच मला विचारत असतो). हा राजा इथलाच, हे मला आज कळले. सोन्याचा हव्यास असलेला मिडास राजा ही इथलाच. आणि हो आपला नाताळबाबा, सेंट निकोलस उर्फ सांताक्लाज सुद्धा इथलाच.
आपल्याच शहरात, आपल्याच देशात प्रवास करताना लोक इतके बिचकतात, प्रवाशी कंपन्यांवाचुन त्यांचे पानही हलत नसते. साधे रेल्वेचे आरक्षण, हॉटॆल निवडणे या सारख्या बाबी देखील त्यांच्या साठी कठीण असतात. परक्या देशात या मीना प्रभुंनी एकटीने , तर कधी आपल्या मुलीबरोबर कसा काय प्रवास केला असेल ? हे सारे जाणुन घ्यायचे असेल, व ते देश सुद्धा समजवुन घ्यायचे असतील तर मीना प्रभुंनी लिहिलेली प्रवासवर्णन वाचण्यावाचुन दुसरा योग्य पर्याय उपलब्ध नाही.
"येथे बसा येथे उतरा", "कोणतीही तोशीस नाही", "निश्चींत मनाने चला", "घरचेच जेवण", "सर्व सुखसोयी", पुरवणाऱ्या "यात्रा कंपनी" बरोबर नव्हे, तर जसे जमेल तसे, जसे आहे तसे, वाट्टेल त्या परिस्थितीत प्रवास, मुक्काम करत भटकंती करणाऱ्या मीना प्रभुंचे येत्या रविवारी "गुरुपौर्णिमेच्या " दिवशी दर्शन घ्यायलाच हवे.
एकट्याने प्रवास करण्यामागचे सुख एकच असते. आपले आपण राजे असतो. आपली कोणत्याही गटाबरोबर फरफट होत नाही, आपल्याला आपल्या मनाप्रमाणे हिंडताफिरता येते. हवे ते खाता येते. आम्हीही नेहमी असेच स्वतंत्रपणॆ प्रवास करत असतो, व या कारणे डॉ. मीना प्रभु यांच्या बद्द्ल आमच्या मनात नितांत आदर आहे.
आता वाट पहाणे त्यांच्या पुढील प्रवास वर्णनाची.

Thursday, July 26, 2007

कढई पनीर व डाल फ़्राय

परवा रात्री जेवणाचा उत्तम बेत होता, कढई पनीर व डाल फ़्राय.

डाल फ़्राय गोड गोड लागायला लागली तेव्हा कोठे ध्यानात आले, माझ्या बदमाश बायकोने सकाळच्या राहिलेल्या वरणाला तडका वगैरे देवुन त्याचेच रुपांतर चक्क मस्त पैकी डाल फ़्राय मधे केले आहे.

फास्टर फेणे

अरे गडया आपला फा.फे. बरा. आपला फुरसुंगीचा बन्या हो. फास्टर फेणे आठवतो काय ? भा.रा. भागवतांचा फा.फे.

टॉक फेम.

सध्या हरी पाटकरांचा ऐवढा उदो उदो चालला त्या झगमगाटा पुढे कोण कुठला काय फा.फे. माझा मुलाला, नव्या पिढीला तो माहीती असण्याचे कारणच नाही. चुकी माझीच. मीच त्याला पंचतंत्र. ईसापनीती, फास्टर फेणे यांची ओळख सुद्धा करुन दिली नाही.

आता त्यानी माझ्या कडे हॅरी पॉटर चे पुस्तक विकत घ्यायला व चित्रपट पहायला हजार रुपये मागीतले तर ते मी देयलाच हवे.

महाराष्ट्र टाईम्सची गंभीर चुक.

सीता अशोक फोटो


अशोक वॄक्षाच्या औषधी गुणधर्माची खुप चांगली उपयुक्त माहीती सांगणारा एक उत्तम लेख आजच्या म.टा. मधे "आयुर्वेद तुमच्यासाठी या सदरात डॉ. उदय कुलकर्णी यांनी लिहीला आहे.
पण हा लेख सीता अशोक या वॄक्षावर आहे आणि म.टा. ने मात्र लेखात वॄक्षाचा फोटो सर्वसामान्यपणे रस्त्यावर आढळणाऱ्या अशोका चा टाकला आहे. जो सर्वांच्याच परीचयाचा आहे. ही दोन्ही झाडे वेगळी आहेत. लोकांची यामुळे मोठी फसगत होण्याची शक्यता आहे. बहुतेकांना सीता अशोक माहीती नाही, ते या लेखाप्रमाणे फोटोतील अशोकाच औषधासाठी वापर करण्याची शक्यता आहे.

म.टा.ने आपली ही गंभीर चुक तात्काळ खुलासा करुन सुधारावी ही इच्छा.
ता.क. - मी म.टा. शी बोललो. सीता अशोक वृक्षाच्या जागी अशोकाचा फोटो छापणे हि चुक आहे असे त्यांना वाटत नाही. त्यांची मर्जी. उद्याला अशोकाची पाने , बिया, साल, लोकांनी औषध म्हणुन वापरु नये म्हणजे झाले.

Wednesday, July 25, 2007

WHERE ARE YOU ?

WHERE ARE YOU, THE CREATOR OF http://happyburp.blogspot.com/ ?

WE HAVE NOT SEEN ANY POST AFTER 31/03/07 NOR CAME ACROSS ANY COMMENTS / REPLY.

HOPE EVERYTHING IS ALRIGHT.

तीन देविंया


खर म्हणजे आपल हौस होते पण या मुलांचा कोण विचार करते का ? तासनतास असे सोंग सजवुन आहे त्या स्थितीत बसणे ?

Kinner Kailash

Two of my colleagues had gone in this region for a trek








Tuesday, July 24, 2007

विनोदी कवी अशोक नायगावकर

विनोदी कवी अशोक नायगावकर यांचे नाव अशोक नायगराकर असे का बदलू नये ? हा प्रश्न मला आज अचानक पडला.

दोन तीन वर्षापुर्वी ए.सो.टी.सी. नी त्यांच्या संभाव्य ग्राहकांसाठी एक मराठी वाद्यवॄंदाचा कार्यक्रम आयोजीला होता. आम्ही सुद्धा आमंत्रीत पाहुणे होतो. त्यांच्या बरोवर युरोप टुर ला गेलो नाही हा भाग वेगळा. पण त्यांनी आयोजल्या कार्यक्रमाला जरुर गेलो, विनामुल्य होता ना. मधेच अशोक नायगावकर यांचा विनोदी कविता वाचनाचा कार्यक्रम सुरु झाला. आधीच कविता म्हटली की माझ्या पोटात गोळा उठतो, त्यात परत विनोदी मग बघायलाच नको. आल्या प्रसंगाला तोंड देयलाच हवे होते. फुकटच्या कार्यक्रमाला जायचे आहे ना. राजाभाऊ, भोगा मग आपल्या कर्माची फळे.

आपल्या भरघोस मिश्यातल्या मिश्यात मिश्किल पणे अशोक नायगावकर यांनी बोलायला सुरवात केली, त्यांनी बोलायला आणि आम्ही अगदी पहिल्या क्षणापासुन, वाक्यापासुन पोट धरुन , खळखळुन हसायला, हसुन हसुन गडबडा लोळायला. ते विनोदी कविता वाचनाच्या मधे कि आधी, दरम्यान, जे काही बोलतात , आणि ज्या पद्धतीने, प्रकारे बोलतात, बस्स, आपला जीव आपल्या ताब्यात रहात नाही, हसा. हसा आणि लोळा, हसा आणि हसता हसता डोळ्यात पाणी आणुन रडा.
मग बोलणे संपल्यानंतर, आता विनोदी कवी म्हटल्यावर विनोदी कविता वाचणे आलेच, पण ती कविता, त्यांच्या बोलण्यापुढे अगदीच मुळमुळीत जणुकाय शेपुची भाजी, आपली जराशीच तोंडी लावायला बरी.

संबध आयुष्यात कोण एवढे हसले नसेल, व हसणार ही नाही, जेवढे अशोक नायगावकरांचे बोलणे ऐकताना हसायला लागते.

आता सांगा, हास्याचा धबाबा, धबाबा, नायगारा बहावणाऱ्या अशोक नायगावकर यांचे नाव अशोक नायगराकर असे का बदलू नये ?

Monday, July 23, 2007

Pali

Paddy fields on the way to Pali


Ballaleshwar Temple

Saras Gad lost in clouds




Stalls on the way to Ballaleshwar Temple
Everytime we visit Pali, My wife makes it a point to buy Poha Papad.


Sunday, July 22, 2007

1st Birthday

Today my blog has just completed one year.

आम्हनी प्रतिभाताई राष्ट्रपती व्हयनी. अभिनंदन.

अखेर समस्त मराठी माणसाचे स्वप्न पुरे झाले . रायसीना हिलच्या तख्तावर प्रतिभा पाटील यांनी अखेर महाराष्ट्राचा दिग्विजयी झेंडा रोवला.
चला या निमीत्ते तरी आपल्या खेकडा वॄत्तीचा त्याग करुन महाराष्ट्रातील मंडळी एक झाली, गेली कित्येक वर्षे सातत्याने आम्ही हीच भुमिका मांडत होतो. यशवंतरावांच्या वेळी, शरदरावांच्या वेळीच जर सगळे एकत्र झाले असते, तर आज चित्र काही वेगळेच दिसले असते. पण अजुनही वेळ गेलेली नाही. राष्ट्रपती निवडणुकीच्या निमीत्ताने एकत्र आलेले सर्व जण, असचे लोकसभेच्या निवडणुकीमधे एकदिलने, एकमताने राहीले तर पंतप्रधानपदी ही मराठी माणुस बिराजमान झालेला दिसुन येईल. आता एकच लक्ष , दिल्लीचे तख्त, ज्यानी मराठयांना फार हुलकावण्या दिल्या आहेत. मराठा तितुका मिळवावा , अवघा महाराष्ट्र धर्म वाढववा. (अस संपादकीय लेख असायला हरकत नाही )

पण दादा, सदविवेकबुद्धी म्हणजे काय भानगड असते रे ?

अरे बाबा कुठे वाचलस रे हे ? आपल्याला त्याचाशी काय देणघेण आहे काय रे ?

आता याच निवडणुकीत नाही का भाजपाने आवाहन केले होते ?

ऐक तर, आता बघ नेहमी आपण वर्तमानपत्रात वाचतो , एक जण दुसऱ्याला आवाहन करीत असतो की आपण आपल्या सदविवेकबुद्धीला स्मरुन, व पटेल तेच योग्य करा !

अश्या वेळी आवाहन करण्याला अभिप्रित असते तर ते त्या दुसऱ्या माणसाने आवाहन करणाऱ्याचेच ऐकावे, त्याच्याच मतान व मनाप्रमाणे करावे. त्या विरुद्ध कॄती केलीच तर मग ती सदविवेकबुद्धी च्या विरुद्ध असणार असते. विरुद्ध पक्षाच्या लोकांनी, दुसऱ्याच्या उमेदवाराला मत दिले तर ते आपल्या सदविवेकबुद्धीला स्मरुन असते, (त्यात द्रोह, प्रतरणा नसते).

लोच्याच म्हणायचा की. सदविवेकबुद्धी पेक्षा आपला आदेश बरा, जास्त विचार करायला नको.

Saturday, July 21, 2007

"ओमियागे" व "सानिया"

सध्या डोक्यात "सानिया" संचारली आहे. साऱ्या विचारावर पगडा बसत चालला आहे. "सानियाचा". आत कोठेतरी खोलवर झिरपत, भिनत चालली आहे "सानिया" .

"ओमियागे" त मी कसे हळुहळु डुंबत चाललो आहे. नवे विचार गवसताहेत, नवी वाक्ये सापडताहेत, जीवनाचा अर्थ नव्याने जाणवतोय. मग अश्यावेळी इतर कोणाशीच संवाद साधणे नकोसे असते, आपला आपल्याशीच संवाद सुरु असताना बाहेरील व्यत्यय नकोसा होत असतो. हि अस्वस्थता कसली असते ? या कथेमधे कधीतरी कोठेतरी आपल्याला आपणच सापडत असल्याची भावना की अगदी याच अश्याच परिस्थितीत आपण असेच का वागलो नाही याची खंत ?

काही लेखक , लेखिका आपल्याला असेच झपाटुन टाकत असतात, आधी व पु, मग गौरी देशपांडे, सानिया, मिलींद बोकील, मेघना पेठे, आशा बगे.

हेच पहा ना -

"या साऱ्या आकृतीबंधात एक विशिष्ट गोष्ट आहे; प्रत्येक चित्रात मोकळी सोडलेली जागा. मात्सुची विलक्षण सुंदर आकाराच्या फांद्या पसरलेली झाडं, साकुराचा बहर, उमेची बहरलेली एकच फांदी, असं सगळ रेषांतून काढल्यावर प्रत्येक चौकटीत आकाश होतं, मोकळे सोडलेलं, काहीच नसलेलं." "किंवा तिथे काही नसण्यालाच एखादा अर्थ असेल. नुसता मोकळा अवकाश. आवश्यक. महत्वाचा. "

"तेवढंच कधी केलं नाही. सतत आपल्यातच राहिलो, स्वतःचं तेवढ खरं, बरोबर मानून. तिथल्या तिथंच घुटमळल्यासारखा प्रवास झाला. आपण समजलो, नुसता काळाचा प्रवास. त्यात आपणही चालायचं असतं हेच कधी लक्षात नाही आलं."

"पाऊस पडला की असा मातीचा ओलाकच्च वास वेढून येइ"

"कुणास ठावुक. त्या विषयावर मात्र तिच्याशी कधी आतलं नाही बोललो. तिच्याशीच का, स्वतःशीही नाही कदाचीत. वेळच नाही मिळाला. काळ फार भराभर गेला. वाटायचं, आयुष्य पडल आहे समोर. अमुक एक गोष्टी कधीही करता येतील . पण नाही. तस घडल नाही. म्हणजे त्या करायच्याच होत्या असं नव्हे, पण आयुष्य आणि काळ भराभर गेला की तो आता गेल्यावर असं वाटतं आहे ? "

"सानियाची" चढलेली झिंग काही उतरायला मागत नाही. "ओमियागे" तसे बघायला गेले तर एका बैठकीत वाचुन संपवले, मग त्यात ट्रेन मधील प्रवासात, मधेच चालताना, रांगेत उभ असतानाचे वाचन आलेच.

मग त्याच एका विलक्षण धुन्दींत संध्याकाळी परत वाचनालयात जावुन सानियाचे दुसरे पुस्तक आणले. "अवकाश". नामक कादंबरी.

आयुष्य जान्हवीला कोठुन कुठे घेवुन जाते. डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहाणाऱ्या जान्हवीच्या वाट्याला येते ते केवळ एक सामान्य गॄहीणी होवुन जगण्याचे काम.

पण मला कादंबरी पेक्षा कथाच जास्त भावल्या.

अए जुना सामान, रद्दी, पेपर, जुना भंगार. अए लोखंड,

अए जुना सामान, रद्दी, पेपर, जुना भंगार. अए लोखंड, घेणार. आरोळी ऐकु आली.

पोऱ्याला घरी बोलावले.सकाळची ताजी, दुपारी रद्दी झालेली, जुनी वर्तमानपत्रे रद्दीत विकण्यासाठी.

तुमच्याकडे वजनाचा काटा आहे का ? त्यानी विचारले ? क्षणभर मी विचारात. मग जाणवले, अरे हे रद्दीवाले "काट्यात " मारतात म्हणुन काहीजण आपला स्वताचा वजनकाटा बाळागतात. म्हणजे बरे . वजनाला चोख. उगाचाच फसायला नको.

दुबईत असताना येथे ही सिस्टीम नाही, जाडजुड वर्तमानपत्रे फेकुन द्यावी लागतात म्हणुन जीव उगाचच हळहळत राहीला होता. बॅगेत ही ढेर सारी रद्दी भरुन मुंबईला विकायला घेवुन जाण्याचेही एकदा मनात आले होते.

Friday, July 20, 2007

दैवगती

तीस-पस्तीस वर्षाची नोकरी. स्वंयपाक करायची. परत रहाणेही त्याच घरी. जेवणखाण व पगारही चांगला. यजमानीण परमेश्वरसमान. घरात फक्‍त हेच एकमेव काम. बाई घरातल्याच एक सदस्य झालेल्या. संपुर्ण विश्वास संपादन केलेला. कोणे एके दिवशी मती फिरली. घरात चोरी. दागदागीने, पैसाअडका. शेवट पोलीस केस, कोर्ट कचेरी व तुरुंगवास भोगणे.

गोष्ट येथे संपत नाही.

तुरुंगवासाची मुदत संपली. दैवगती फार न्यारी असते. बाईंना नवी नोकरी मिळाली. स्वंयपाक करायचीच. आणि ती सुद्धा एका मल्टी-नॅशनल कंपनीच्या डायरेक्टरच्या घरी. नोकरी सुरळीत चालली होती.

अचानक.

अचानक वर्तमानपत्रात आलेली जाहिरात आयुष्य बदलून गेली. परदेशात असणाऱ्या एका तरुण जोडप्याला त्यांच्या घरी कामासाठी व स्वंयपाकासाठी बाई हवी होती.

मग परदेश गमन. त्यांच्याबरोबर जग फिरणे.

कधीतरी ही नोकरी संपली.

परत भारतात नोकरी एका प्रतिष्ठित कुटुंबा मधे. त्यांची सर्व मुले परदेशी. भारतात घरी म्हाताऱ्या आईवडिलांसाठी त्यांना कोणीतरी बाई हवी होती.

दिमातीला मोटारगाडी, ड्रायव्हर, आया. कालांतराने आईवडीलांवे, दोघांचेही वार्ध्रव्यामुळे निधन. मुलांनी बाईंना नोकरी सोडुन जाण्यास मनाई केली. त्यांना बंगला रहायला दिला. त्यांच्यासाठी मोटारगाडी, ड्रायव्हर, आयांना ठेवले.
शेवटी ही नोकरी सुटली, बाई परत रस्तावर आल्या.

जोर का झटका लगे धिरेसे

Oh my god. आधीच दुष्काळ त्यात तेरावा महिनागेल्या महिन्यात या ब्लॉगच्या व्यसनामुळै फ़ोन चे बिल रुपये १८००.०० आले होते , या महिन्यात्त तर कहार झालारुपये २३००.०० बिल आले.
कस व्हायच ?

सवय फार वाईट असते.

Tuesday, July 17, 2007

हरहर महादेव.

शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भिती ? इतिहासात डोकावुन पाहीले तर अश्या तलवारी उपसल्यावर चक्क हाणामाऱ्या वगैरे व्हायच्या, येथे तर या बायका चक्क मस्त पैकी हसत आहेत! आता या महिला मोर्चाच्या कार्यकरिणीच्या बैठकीत तलवारीचे काय काम ?

खर म्हणजे सत्कार समारंभामधे तलवारी आणि ते पण २१ व्या शतकात भेट देण्याचे प्रयोजन काय असावे ? बर भेट देतात तर देतात , मग प्रत्येक वेळी ती स्वीकारणारा ह्या अश्या तलवारी पराजुन, उंचावुन दाखवत पोझ काहुन घेत असतात ? त्यांना बाजीप्रभुंच्या अविर्भावात कोणावर हल्लाबोल करायचा असतो काय ठावुक ?

Monday, July 16, 2007

Waterfall

Waterfalls in Tamhini Ghat

निसर्ग आणि दारुडे.




धबधब्याखाली, झऱ्यात, जाताना पायात उत्तम पादत्राणे असावीत, अन्यथाहा दारुडयांनी पाण्यात फोडलेल्या दारुच्या बाटलीच्या फुटक्या काचेचे प्रताप आपल्याला भोगावे लागतात.

पाली, रवाळजे, भीरा, ताम्हीणी घाट























ताम्हीणी घाट, पावसाळी मधहोशी धुंद वातावरण, हिरवाईचा अपुर्व सोहळा, हिरवकंच जंगल, निसर्गाचे लोभीवणारे रंग-रुप, ढगाळलेले गगन, अनुभवण्यासाठी येथे जायलाच हवे. अगणित धबधबे, प्रपात, खाली रस्तावर आलेले ढग व त्यात आपण, जिकडे नजर जाइल तेथे फक्त हिरवा रंग, जणु तांबडा काठ असलेला धरतीने परीधान केलेला हिरवा शालु, हे सारे न्याहाळायचा असेल तर या परीसरात भ्रमंती जरुर करावी.

शनिवारी आम्ही पुण्याला जायला निघालो. नेहमी प्रमाणे एक़्स्प्रेस वे न जाता वेगळी वाट धरायची मनी योजले व निघालो. गेल्या बर्षी या पावसाळ्यात मी एकट्याने या मार्गे सफर केलेली होती, यंदाला बायको व मुलाला घेवुन निघालो. सर्वप्रथम विघ्हेश्वराचे , बलाळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी पालीला गेलो, दर्शन झाले. देवळाजवळचा हा रस्ता वरती रवाळजे या गावातुन पुढे "भीरा" ला जातो. हा रस्ता सुरेख आहे, पावसाळ्यात त्याचे सौदर्य आणखीन खुलते, दुतर्फा हिरवीगार भात शेती, दुरवर दिसणारा सुधागड, मस्त जंगल, अधुनमधुन लागणारे पाण्याचे ओढे, १९ कि.मी.अंतरावरील रवाळजे गावात आपण कधी पोहोचतो कळतच नाही. या गावात एक धरण व पॉवर हाउस आहे.

भीरा मधे महाराष्टातील सर्वात जास्त पाऊस पडतो, येथेही एक धरण व टाटाचे पॉवर हाउस आहे. वरुन मुळशी धरणाचे पाणी आणुन येथे विद्युत निर्मीती होते ( हे सारे पहाण्यासाठी परवानगी लागते ).

भीरा मधे एका कडे रहाण्याची व जेवणाची उत्तम सोय होते. त्यांच्या कडे आम्ही जेवलो, बाजुलाच एक सुंदर देवालय आहे तेथे क्षणभर विश्रांती घेतली, आता वेध लागले होते ताम्हीणी घाटाचे. वाटेत दोन मोरांचे दर्शन ही झाले,

भीरा वरुन हा रस्ता, विळे गावापाशी खालुन, मुंबई - गोवा हमरस्तावरील कोलाड गावातुन पुण्याला जाणाऱ्या रस्ताला मिळतो. या रस्ताचे वैशिष्ट म्हणजे येथील आजुबाजुच्या डोंगरमाथ्यावर अमाप धबधबे आहेत.

या रस्ताला लागलो, प्रथमच छानसे, छोटासे दोन धबधबे लागला, आजुबाजुला चिटपाखरुही नव्हते, हे जणु आमच्याच साठी होते, मस्त पैकी गाडी थांबवुन त्याची मजा लुटली, मधेच जरासास पाऊस सुरु झाला. मग तेथुन निघालो, हळुहळु घाटाची मजा लुटत जात असताना, घाटमाथावरचे द्रुश्य न्याहाळत असतना, अचानक नजर गेली ती उंच डोंगरमाथावरुन खाली रस्तावर झेपवण्याऱ्या दोन प्रपातांवर, गिरीचे मस्त्की गंगा, क्या बात है ! तत्काळ ब्रेक लागले, त्याचे रुप डोळ्यात भरुन घेण्यासाठी, त्या खालील झऱ्यात पाय सोडुन बसण्यासाठी, वनभोजन करण्यासाठी, थंडगार, रुचकर, नैसर्गीक पाणी पिण्याची आपल्याला सवय नाही हो, दिवसभर तसा पाऊस नव्हता, एक प्रकारे तसे वाईट, ढगात वावरणे होत नव्हते, पण एक प्रकारे ते बरेच झाले, निसर्ग मस्तपैकी न्हाहळताना आला, येथुन पाय निघत नव्हता, खालचे दरीतुन वर चढणारा नागमोडी, सर्पाकॄती रस्ता कसा मोहवीत होता. पाय उचलवितच नव्हते.

अजुन बराच पल्ला बाकी होता, मग निघालो, वाटेमधल्या सुप्रसिद्ध दऱ्या ढगात डुंबुन गेल्या होत्या, वाटेवर घनदाट धुके, ढग अजुन तरी लागले नव्हते, डोंगरवाडी पार केली, आणि पठारावरचे द्रुश्य अचानक बदलु लागले, वातावरण धुंदफुंद होत गेले, ढग रस्ता अडावु लागले, क्षणार्धात आजुवाजुचे काहीही दिसेनासे झाले, मग गाडी थाबंवणे व धुक्याची मजा लुटने भागच होते.

वाटेत विंझाई देवीचे दर्शन घेतले, निघालो. उजवी कडे मग सुरु झाले , जे पाहण्यासाठी मी वारंवार या परीसरात जातो ते मुळशी धरणातील पाण्याचे नयनरम्य दर्शन. सतत आपल्याला हा पाण्याचा अफाट साठा या प्रवासात सोबत देत असतो. मग परत थांबणे, डोळे भरुन पहाणे आलेच.

अंधारु लागले होते, आता मात्र अधेमधे कोठेही न थांबता तडक घर गाठले,

मुंबई वरुन निघालो सकाळी सहा वाजता, पुण्याला पोहोचलो रात्री सात वाजता. मजा आली.

पण हा प्रवास श्रावणात करणे उत्तम, अजुन भरपुर पाऊस झालेला नाही. पुण्याकडे ताम्हीणीत फार गर्दी असते, त्या मानाने खाली कोकणाच्या दिशेला तेवढी नसते. पायात उत्तम पादत्राणे असावीत, अन्यथाहा दारुडयांनी पाण्यात फोडलेल्या दारुच्या बाटलीच्या फुटक्या काचेचे प्रताप आपल्याला भोगावे लागतात. या मद्यपी लोकांना जहाजात बसवुन शिक्षा फर्मावण्यासाठी व भोगण्यासाठी सौदी अरेबियाला वगैरे देशात पाठवावे. पाठीवर चाबकाचे फटके. वर त्यावर मिठ चोळणे. मिरचीची धुरी उत्तम .

नेमीचे येतो बहिष्कार!

माहीती अधीकार ही माहीती मिळवण्यासाठी वापरता येइल का ? बहिष्कार , मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांचा. मग या बहिष्काराच्या वेळी अन्न वाया जाते, त्याचे पैशे या आमदारांकडुन वसुल करण्यात येते का? का प्रथेप्रमाणे विरोधक बहिष्कार घालणारच असे गृहित धरुन मोजकेच पदार्थ केले जातात ? विरोधकांनी आयत्या वेळी दलबदल केला व चहापानाला हजर झाले तर फजीती व्हायला नको म्हणुन सर्वांचीच चहापानाची व्यवस्था केलेली असते का? व तसे असेल तर मग त्या उरलेल्या अन्नाचे काय करतात ? विरोधकांशीवाय अन्न गोड लागते काय ? जर मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांचा दरवर्षी बहिष्कार असतो तर हे कशासाठी केले जाते ?
संदर्भ-
बहिष्कार , मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांचा आणि विरोधी बैठकीवर भाजपचा ! म . टा . विशेष प्रतिनिधी ,
मुंबई विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येचा रविवार ' बहिष्कारा ' चा ठरला . शिवसेना - भाजप युतीच्या नेत्यांनी ' विरोधकां ' च्या प्रथेला जागत मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार घातलाच ; मात्र त्याचवेळी भाजपने विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी बोलावलेल्या विरोधकांच्या बैठकीवरही बहिष्कार पुकारला

येथे बसंतातील बहार अजुन रेंगाळतोय

भीरा गावातील फुललेला तामण.

जे ना सौख्य लाभे महाली, ते लाभे या झोपडीत माझ्या




Friday, July 13, 2007

कस व्हायच ?

खुश हू कि मेरा हुस्ने तलब काम तो आया
खाली ही सही मेरी तरफ जाम तो आया
लोग उनसे ये कहते है कैसे है "शकील" आज
इस हुस्न के सदक़े मे मेरा नाम तो आया
वयाच्या पंचविशीतील, तिशी मधली असलेली उमेद, जिद्द, आत्मविश्वास, काहीतरी करुन दाखवण्याची ताकत वयाच्या पंचेचाळीशीत कोठे गायब होते कोण जाणे ? की या काळात मुळातच आयुष्याची गती संथ झालेली असल्यामुळे आलेली मरगळ, शैथील्य, झटकुन टाकणे जड जाते ? नविन काही शिकण्याची, करुन दाखवण्याची इच्छा तेवढी तिव्र का राहीली नसते ? काहीतरी करायचे असते, पण त्यासाठी काहीतरी करावे लागते, व ते काहीतरी करण्यावी शक्ती कोठे गायब होते असते काय ठावुक ?
की आपण अजुन या वयाला पोचलो आहे हे स्विकारुन त्या प्रमाणे वागायची मनाची तयारी नसते ?
आता आपल्याला आयुष्यात नक्की काय हवय ? हे ज्याचे त्याला कळायला नको ?

Thursday, July 12, 2007

'संगणक जगत' अर्थात Madhav Shirvalkar's info

'संगणक जगत' अर्थात Madhav Shirvalkar's info

आहार व आरोग्य: चौरस समतोल आहार

आहार व आरोग्य: चौरस समतोल आहार

राष्टपतीच्या निवडणुकीच्या नावान चांगभल

या पाश्वभुमीवर मला दोन नावे राष्टपतीपदा साठी योग्य वाटतात. श्री. सुरेश प्रभु किंवा श्री शशी थेरुर.
आता पर्यंत राष्टपतीच्या निवडणुकीतील एक उमेदवार श्रीमती प्रतिभा पाटील यांचे नावे बोंब मारुन झाली, त्यांच्या बद्द्ल नवी नवी माहीती प्रकाशित केली गेली, त्यांच्या सहकारी बॅकेबद्द्ल, साखर कारखान्याबद्द्ल कारभाराविषयी जनतेच्या माहीती साठी म्हणुन एक वेब साईट उघडुन त्या वर टाकल्या गेल्या. (जणु काय जनताच त्यांना निवडुन देणार आहे ) (श्री. अरुण जेटलीजी आपल्या बद्दल आमच्या चांगल्या अपेक्षा खुप आह्रेत या चिखलफेकीत आपण गुंतुत राहु नका हो)
आता पाळी आहे ती दुसरे उमेदवार श्री. भैरोसिंग शेखावत यांच्या वर होणाऱ्या आरोपांची.
मग कालच्या म.टा. मधे लेख आहे. ते किती शिकले आहेत (जेमतेम आठवी पर्यंत म्हणे ) ते म्हणे स्वातंत्रपुर्व काळात पोलिस सबइन्स्पेक्टर होते, मग काहीतरी गडबड झाली म्हणे.
मग त्यांचा जावई त्यांची कामे.
पण या लेखात शेवटी काय लिहीले आहे ते महत्वाचे.
"राष्टपती होणाऱ्याला जग व भारत यापुढील अतिमहत्वाच्या प्रश्नांची जाण हवी. यासंबधात दोन्ही उमेदवारांबाबत आनंद आहे. "
राष्टपतीच्या निवडणुकीच्या नावान चांगभल. हे तर चाललय नेत्यांचे स्वप्नरंजन व जनतेचे मनोरंजन.

निर्णय

आयुष्यात कधीतरी ,केव्हातरी महत्वाचे निर्णय घेण्याची वेळ येते.
ही वेळ कधीही आपल्यावर येणार नाही याची ठाम खात्री असते, पण ती वेळ येते, सांगुन तर कधी अवचीत पणे, सावध असतांना किंवा बेसावध राहील्या मुळे, मग आपण कधी ते निर्णय तत्काळ घेतो, तर कधी ती वेळ टाळतो, लांबणीवर टाकतो, पण निर्णय घेयचेच असतात, मग आपण ते घेतोही, कधी विचारपुर्वक तर कधी भावनेच्या भरात.

जसे घाईने घेतलेल्याची किंमत चुकवावी लागते तसेच कधी बिलंबाची किंमत देणे भाग पडते. हे निर्णय आपण कधी धाडसाने तर कधी भयापोटी घेतलेले असतात. कधी आपल्या मनाने गेतलेले असतात तर कधी दुसऱ्याचा सल्ला ऐकुन. त्याचे तत्कालीन परिणाम , दुरगामी परिणाम कधी ज्ञात असतात तर कधी अज्ञात, पण त्याचे परिणाम शेवटी आपल्यालाच भोगायचे असतात, ते निर्णय चुकले तर.

बरोबर असतील तर बरच असते.

शेवटी काळच ठरवील निर्णय योग्य का अयोग्य ते. तो पर्यंत चिंता आणि फक्त कारणाशिवाय चिंता. कारण जे होयचे होते ते घडुन गेलेले असते, आता माघारी फिरणे नसते.

Wednesday, July 11, 2007

Berry Pulao

Nandan has mentioned about Berry Pulao in his post on मुंबईतील सात आश्चर्ये ( Photo from Nandan's blog)

http://anudinee.blogspot.com/ मुंबईतील सात आश्चर्ये हरेकृष्णाजींच्या या पोस्टवर प्रतिक्रिया म्हणून मुंबईतील सात आश्चर्यांची ही यादी-- 6. रात्री अडीचलाही चर्चगेटबाहेर मिळणारा भुर्जीपाव नि फ्रँकी आणि बेरीनो पुलाव,

I completely agree with Nandan, Berry Pulao is the main dish in a restaurant names "Britannia" at Ballard Pier, The most wonderful and delicious ,mouthwatering pulao.

from http://www.busybeeforever.com/


Britannia & Co: If it's berry pulao, it must be Britannia!.
The good news is that Britannia, the homely and friendly restaurant on Sprott Road, next to New Custom House, Ballard Estate, now serves dhanshak every afternoon of the week. And, if you want more good news - it also serves its famous berry pulao every day, Monday to Saturday. The daily service is in keeping with the policy of proprietor Boman Kohinoor (Irani) - if an item is popular, serve it every day, not on special days. Thank you, Mr. Kohinoor.
The dhanshak is among the best in town. If I were to rate it, I would put it among the four best: Ripon Club (Wednesdays), Yacht Club (Fridays), Melhi Mistry's house (Sundays, though it is many Sundays since he has invited us), and Mr. Kohinoor's Britannia (Monday to Saturday).
You get all three, mutton, chicken and vegetables. Rs.55 for the meat ones, Rs.45 for the vegetarian. Of course, there is nothing like a vegetarian dhanshak, just as there is nothing like a non-alcoholic beer or an eggless omelette. Still, there you are. And, while I am at it, I would like to add, the only bona fide dhanshak is with mutton, not chicken.
The mutton at Britannia is boneless. In fact, all the meats at Britannia, whether mutton or chicken, are boneless, and this applies to all the dishes. A footnote in the menu declares: "Chicken and mutton served boneless." Only the fish has a bone in it, and since it is pomfret, it is only the central bone.
It was Mr. Kohinoor's late wife, Bachan, who taught the Britannia cooks how to make the perfect dhanshak. The lady, sadly passed away earlier this year, but her art continues. Two dals are used, mung and tur, in proportions that only the cooks know. And the meat is cooked with the dal to give it its meaty texture and aroma. Pumpkin is used to thicken the dal. Muslims use dudhi in their dal gosh, which is a similar preparation and yet with a world of difference.
In the dal gosh, the dudhi is left more or less untouched, diners pick out large pieces of it and eat it. In the dhanshak dal, the pumpkin is thoroughly mashed. It is up to you what you prefer. I am for the dhanshak, so is Gerson da Cunha, whom I found last week, tucking away. Goans are the only people, besides Parsis, who eat dhanshak on a regular basis. And, in early days, when being a Parsi meant being Sir Cowasji Jehangir or Sir Jamshetjee Tata, gentlemen who could afford to maintain a fleet of servants, it was Goan cooks who cooked the dhanshak.
But let us return Britannia. And a word about the dhanshak rice, before we pass on. The rice is brown, the colour and taste achieved by carmelising it in a little ghee. Crisp fried onions are added on the top, and not only for decoration. Naturally, the rice tastes a little sweet, though the pepper and the tej patta sees to it that it is not too sweet, and the fried onions provide a taste of smokey bitterness.
With the rice, the restaurant serves you small round kababs, meat kababs, a little spicy, at least three, though often four. The dal comes in a separate bowl. And the meat is in the dal, not the rice. If it is put in the rice, it becomes pulao dal, which is far, far from the same thing. Equally popular is the restaurant's berry pulao, Rs.60 for mutton and chicken, Rs.45 for veg. They are the Barberry Berries, at least, I think so. They grow wild in the Middle East, on spindly shrubs, a red berry. In Iran, they are used with rice, in restaurants and in homes, and Britannia's berry pulao comes from Iran. The late Mrs. Kohinoor, though a Parsi, meaning not an Iranian, spent seven years in Teheran as legal assistant to Iran Airways, and brought back with her the berry pulao.
In Iran, the berries are known as zereshk, and the pulao as zereshk pulao. The berries are dry, like raisins, but sour and with a sweet aftertaste. Mr. Kohinoor compares them to dry pomegranate. I would not know, I have not seen a dry pomegranate.
In any case, the berries are cooked with the best quality of basmati rice, then the marinated and masalaed meat placed between layers of the rice. And there is a garnish of cashewnuts and fried onions. Plus, a few kababs. Note: This is the only place in India that you get berry pulao. Try it, it is like an aromatic biryani.A third item I recommend at the place is a fish patra (Rs.45), it is the standard Parsi wedding patra-ni-machi, but with some differences. First, it is not a filet of pomfret, it is a full pomfret, one pomfret per person. It may not be a big pomfret, but it is reasonably large, medium sized. Second, the green chutney, it is wet and smooth and most generously applied all over the pomfret. It has less chillis, more of kothmir and dhania and jeera and coconut and lime juice.
There is another interesting difference, the price varies. Sometimes the fish patra costs Rs.45, sometimes Rs.50, depending on the size of the fish and its availability. Mr. Kohinoor says: "Our customers understand, they don't mind. We tell them it will cost five rupees more than the marked price." The fish is, of course, steamed, wrapped in the plantain leaf. A drop of oil and vinegar is added to the water before steaming.
A few rules of the restaurant will be helpful. The place is open for lunch only, from 10.00 a.m. to 3.30 p.m. A few breakfast snacks are available before 12.30 p.m., but no tea, only Nescafe. Soft drinks are available, but no beer.
For dessert, there is Parsi Dairy's yoghurt and the restaurant's own caramel custard, excellent quality, burnt the right degree. But there is no ice-cream. And no beef. And the restaurant's philosophy, as written on the menu, is: "There's no greater love than the love of eating."
Such a restaurant has to have some history. It has. The present proprietor's father, Rashid Meherwan Kohinoor, opened it in 1923. The present proprietor joined it in 1933, coming there direct from Iran. Britannia was run on a grand scale then. Only officers were allowed, the assistant collector of customs, Port Trust manager, the collector of Bombay. Food was mainly Western, with some Indian dishes.
During the war, the British auctioned the place, to run a war office. It was returned to the proprietors at the end of the war, but by that time its glory days had ended. Mr. Kohinoor is actually the third generation. His grandfather came to Bombay in 1885 and opened Kohinoor Restaurant opposite the GPO. It still exists, in the same name, though not under the same proprietors.
Never mind, there's still Britannia. If you have not already done so, visit it, the earlier the better. Order a patra fish, a mutton dhanshak, and caramel custard. And say hello to Mr. Gerson da Cunha.

पुण्यातील सात आश्चर्याची यादी

आनंद यांनी बनवलेली - पुण्यातील सात आश्चर्याची यादी

Anand Sarolkar said...
Majhya mate punyatli saat ashcharya:


1. Dagdusheth Halwai Ganapati (Pahila maan devacha)

2. Punekarancha Punyabaddalcha "Jajvalya" abhimaan (he PuLanchya shabdat)
3. No. of colleges and Institutes(shevti Pune he vidyeche maherghar ahe)

4. Puneri patya (hyana sodun kasa chalel)
5. Rastyanvarche khadde (ki khadyanmadhle raste?)
6. Dar varshi vadhtach janarya two wheelers chi sankhya.
7. Pratyek Ravivari sandhyakali full asleli sagli hotels (ho ho taprya pan)
होना, आनंद, त्याच बरोबर या उपहारग्रुहात वापरला जाणारा "संपले" हा वाक्यप्रयोग हा सुद्धा पुण्याचे खास वैशिष्ट.
वाड्यातील सार्वजनीक शौचालयाबाहेर लावलेल्या पाटीवरील एक सुचना - "कितीही आणीबाणीची परिस्थीती उदभवली तरीही आपल्या आधी रांगेत उभ्या असलेल्यांना, आपला नंबर आधी लावण्यासाठी विनंती करु नये" .

मुंबईतील सात आश्चर्ये

Thanks Nandan for partipating.

from http://anudinee.blogspot.com/
मुंबईतील सात आश्चर्ये
हरेकृष्णाजींच्या या पोस्टवर प्रतिक्रिया म्हणून मुंबईतील सात आश्चर्यांची ही यादी--१. गर्दी (> ३०,००० माणसे/चौ.किमी)
2. डबेवाले
३. बेस्ट
४. बॉंबस्फोटाच्या दुसऱ्याच दिवशी भरून वाहणारी
5. धारावी
6. रात्री अडीचलाही चर्चगेटबाहेर मिळणारा भुर्जीपाव नि फ्रँकी आणि बेरीनो पुलाव, चायनीज डोसा, जैन चिकन, मिरची आईस्क्रीम असे भूतलावर इतर कुठेही न मिळणारे अचाट पदार्थ.

आणि शेवटचे पण नॉट द लीस्ट

7. महिला स्पेशल, ८:२२ विरार, ५:२७ टिटवाळा, "शिवा ताठे", चौथी सीट, गोरेगावला हमखास स्लो होणारी फास्ट गाडी, टिळक ब्रिजवर जायचा 'शॉर्टकट' आणि डबा कितीही गच्च भरलेला असला तरी प्लॅटफॉर्मवरच्या धावत्याला काडीचा आधार देऊन वर खेचून घेणारे मुंबैकर.

Monday, July 09, 2007

जी ललचाये रहा न जाये



बरसात का मौसम और गरमागरम मक्याचे कणीस







Right To Information Act

To know how to use the Right To Information, see www.karmayog.com/rti/righttoinformation.htm

मुंबई, पुण्यातील सात आश्चर्याची यादी


जगातील सात आश्चर्याच्या निवडीची धुळवड आता शमली असेल. मत देणाऱ्यांनी मते दिली, कमवणाऱ्यांनी कमवले. नाही कशाला म्हणु मी पण भुलुन मते दिली.
मग सहज मनात विचार आला, आपण ही अशी मुंबई, पुण्यातील सात आश्चर्याची यादी का बनवायला घेवु नये ? व त्यासाठी सर्वांची मते का बरे मागवु नये ? अर्थात हे सारे गंमतजंमत म्हणुन, फुकटमफाकटी . अगदी विनामुल्य.
तशी मी ही यादी बनवायला घेतली आहे. उदा. मुंबईतील लोकल ट्रेन, धारावी झोपडपट्टी, सुप्रसिद्ध मिठी नदी , रस्ता अडवुन बसलेले फेरीवाले, रस्तावरील खाद्यपदार्थ विक्रेते, पुण्यातील / मुंबईतील बेकायदेशीर बांधकामांनी गिळंकृत झालेली मैदाने, नद्या, तलाव, इत्यादी.
यातल्या काही गोष्टींचे आश्चर्य अश्यासाठी की या बाबतीत की या उभ्या राहीपर्यंत कधीच कोणाला कश्या दिसत नाहीत.
मग काय घेणार का भाग ?

Sunday, July 08, 2007

जगी हा वेड्याचा पसारा मांडला सारा

ही बातमी आता देवुन काय उपयोग ? कोण कुठली संस्था उठते व पैसे कमवते आणि आपण त्याला बळी पडतो. युनेस्कोने सर्व सपल्यावर ही फरकत घेतली. आता पर्यंत ७ वर्षे ते झोपले होते काय ?

सकाळ मधुन - ताज पे सरताज आणि मोबाईल कंपन्यांचं भाग्य फळफळ
लंनवी दिल्ली, ता.८- जगातील सात आश्‍चर्यांच्या यादीत "ताज" ची निवड झाल्यामुळे अनेकांची हृदये आभिमानाने फुलून असली तरी पण "व्होट फॉर ताज" या जगभरात चालवल्या गेलेल्या मोहिमेवर लोकांच्या भावनांचा आर्थिक लाभ मिळवण्यासाठी दुरूपयोग केल्याची मोठी टीका होत आहे. जागतिक आश्‍चर्यांची देखभाल करण्याचे अधिकृत कर्तव्य असलेल्या युनेस्कोने या मोहिमेपासून फारकत घेत असल्याचे मोठ्या खेदाने जाहीर केले आहे. सदर मोहिमेपासून जागतिक आश्‍चर्यांचे संवर्धन करण्यासाठी ठोस उपाययोजना होणार नसल्यामुळे आपण हा निर्णय घेत असल्याचे सांगितले आहे. ताजची सात आश्‍चर्यात निवड व्हावी म्हणून भारतात इंटरनेट आणि एसएमच्या माध्यमातून मत देण्यासाटी एकच चढाओढ सुरू होती. हिंदी चित्रपटसृष्टीतील तारकांनीही ताजला मत देण्याचे प्रसारमाध्यमातून आवाहन केले होते, या मोहिमेवर टीका करणाऱ्यांनी मात्र जागतिक आश्‍चर्यांची निवड होण्याची प्रक्रिया अधिकृत नसून याप्रयत्नात मोबाईल कंपन्या आणि स्विझर्लंडच्या संस्थेचे यात उखळ पांढरे झाले अशी भावना टीकाकारांनी व्यक्त केली.. या मोहिमेअंतर्गत एअरटेल वगळता सर्व मोबाईल कंपन्यांनी "ताजला मत द्या "असे एसएमएस पाठवण्यासाठी प्रति एसएमएस तीन रुपये दर आकारला होता. यातून जमा झालेल्या निधीतील काही भाग या स्पर्धेच्या आयोजकांबरोबर अथवा ताजचे संवर्धन करणाऱ्या संस्थाना दिला का यावर मोबाईल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कुठलाही तपशील देण्यास नकार दिला.

काचेचे दरवाजे


आपण काचेचे दरवाजे असलेल्या दारा मधून जाताना लोकांना पाहिले आहेत का ? त्यातले किती जण दाराची मूठ धरुन दार उघडतात ? फारच थोड़ी । बहुतेक सर्व जण सरळ बेलाशक पणे दारावर हाथ ठेवून दार उघडतात। आपल्या बोटाचे ठसे दारावर उमटतात याचे त्याना भान नसते।

परत दार जर आपोआप बंद होणारे असल तर आपल्या मागुंन कोण येत आहे का हे सुद्धा पाहांयाची तसदी फार थोड़े लोक घेतात । दार फाड़ंकन मागाच्याच्या तोडाबर बद होते ।

Friday, July 06, 2007

महर्षी कर्वे रस्ता



महर्षी कर्वे रस्ता हा दक्षिण मुंबईतुन बाहेर पडण्याचा मुख्य रस्ता. त्याची दुर्दशा दाखवण्याचा हा केवीलवाणा प्रयत्न. चर्चगेट ते मरीन लाईन्स रेल्वे स्थानका दरम्यानचा हा परीसर.


पदपाथ हे पादचाऱ्यांसाठी असतात हा भ्रम.

घाणीचे ढिगारे , काय म्हणाता? कोठे आहेत ? दिसत तर नाहीत ! चश्म्याचा नंबर बदलला आहे वाटते.

या गोव्याकडल्या जाणाऱ्या बसीस, अरे वा, काय बोलता राव ? यांना उभे रहायला जागा नको काय ? पुर्वी आतल्या रस्त्यावर उभ्या असायचा तिकडे त्यांना मनाई केलीत ना ! भोगा आता आपल्या कर्माची फळे.

वाहतुकीस अडथळा ? खरे की काय ? वाटत नाही बुवा. तुम्ही तर चालेले आहेत मजेत, भर सायंकाळी, गर्दीच्या टाईमाला.

आणि या पत्र्याच्या शेडी ? हा भला मोठा रोलर ? काय राव मस्करी करता काय ? रस्त्तांची कामे गेले कित्येक महीने चालली आहेत दिसत नाही का ? डोळे फुटले आहेत वाटते ?

आणि या गाड्‍या ? या रस्तावर उभ्या नाही करायच्या तर काय तुमच्या घरात करायच्या काय ? आणि ही होडी, असुद्या की पावसाळ्यात उपयोगी पडेल.

तुम्ही म्हणजे ना. कोण तुमच्या नादाला लागणार ? आहे ते काय वाईट आहे काय ? तुम्हाला लागलय वेड. त्या सकाळच्या पुणे प्रतिबिंबच्या नादाला लागुन, ते आपले पुणभर हिंडतात कॅमेरे हातात घेवुन , मग त्या मागोमाग तुम्ही येथे मुंबईत हे वेडे चाळे करू लागला आहात.

Thursday, July 05, 2007

राम नदी किनारे मेरो गाव सावरे आजय्यो, सावरे आजय्यो.

अहो फेकाडे भावोजी, ऐकले का ? आपल्या पुण्यात म्हणे राम नदी चक्क गिळकृत झाली, तिला म्हणे अनिर्बंध अतिक्रमणांची मगर "मिठी" बसली.

अग मीने, मीने , मीने, तु म्हणतेस तरी काय ? आता पर्यंत फक्त सरस्वती नदी लुप्त झाल्याचे वाचले होते, हा त्यातलाच प्रकार की काय ?

पण काय हो फेकाडे भावोजी, हे कसे काय झाले असावे हो ? काही कळत नाही.

अहो मीनावहीनी, गुप्तधनाची गंगा जमीनीखालुन वाहु लागली की कधी कधी होते असे. तिच्या प्रवाहात हा "नदीचा केलेला नाला" लोप पावतो, त्याचे स्वतंत्र अस्तीत्व नाहीसे होते, आता हे फारसे मनाला लावुन घेयचे नाही बर का. आता बघ, येथे माणसांनाच रहायला जागा नाही मग नदी, नाले, ओहोळ, आणि ओढे यांना जागा कुठुन मिळणार ? पावसाळ्यात होतो अधुन मधुन त्रास, मग जरासा आरडाओरडा होतो खरा, पण तो तेवढ्या पुरताच. सरस्वती लुप्त पावली तेव्हा कोणी काहीतरी बोंब मारल्याची आठवते काय ? आपण आपले वाचायचे व विसरुन जायचे.

मीने, तुला म्हणुन सांगतो, लोकांना बोंबाबोंब करायची सवयच लागली आहे. दर वर्षी काहीतरी नवे कारण लागते,. गेल्या वर्षी आठवते का ग तुला, "खड्डे रस्तात की खड्डात रस्ते" करत केवढे रान उठवले होते, आता यंदाला हा नवीन विषय "नदीत, ओढ्यावर, नाल्यावर अनधिकृत बांधकामे की बांधकामातुन पाण्याचे प्रवाह ? "

फेकाडे भावोजी खर आहे तुमचे बोलणे, बसा हं, तुमच्यासाठी गरमागरम कांद्याची खेकडा भजी करते, तो वर बोट येयीलच, तुम्हाला आमच्या सोसायटीतुन बाहेर सोडायला.

(पुर्वी आकाशवाणीवर एक श्रुतीका लागायची. टेकाडे भावजी, मीना वहीनी ही त्यातली प्रमुख पात्रे. इतर पात्रांची नावे कोणी मला सांगु शकेल का? )

सदर्भ -
सुनीत भावे - सकाळ वृत्तसेवा - रामनदी गिळंकृत!, अनिर्बंध अतिक्रमणांची मगर"मिठी'
पुणे, ता. ३ - गेल्या काही वर्षांत पाषाण, बावधन, औंध परिसरातील अनिर्बंध बांधकामांनी रामनदीचा ४४ टक्के भाग "गिळंकृत' केल्याची धक्कादायक माहिती आज समोर आली. .........
पुणे विद्यापीठाच्या भूशास्त्र विभागात "जिओ-अप्रेझल ऑफ रूरल- अर्बन इंटरफेस अलॉंग नॉर्थ-वेस्ट ऑफ पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ः स्टडी बेस्ड्‌ ऑन जिओग्राफिकल इन्फर्मेशन सिस्टिम' या विषयावर संशोधन सुरू आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) पुरस्कृत केलेल्या या संशोधनात, शहरात नव्याने समाविष्ट गावांमधील भू-पर्यावरणीय बदलांची नोंद घेण्यात येत आहे. त्यात रामनदीच्या ५१ चौरस किलोमीटर खोऱ्यातील विशेषतः शहराच्या हद्दीतील ४४ टक्के भाग अतिक्रमणांनी व्यापला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भुकूमजवळ वारपेवाडी येथे उगम पावणाऱ्या रामनदीची लांबी २० किलोमीटर आहे. समुद्रसपाटीपासून ५५० ते ८०० मीटर उंचीपर्यंत हे खोरे व्यापलेले असून, लहान-मोठे १८४ ओहोळ आणि सात ओढे नदीला येऊन मिळतात. मात्र, बेफाम शहरीकरणाच्या प्रक्रियेत या नदीच्या खोऱ्यामध्ये अनेक स्थित्यंतरे घडली. त्यात काही ओहोळांचे प्रवाह बंद करण्यात आले, तर काही उच्चभ्रू वस्तीच्या भागांत ओढ्यांची रुंदी घटली. या नदीची नोंद "नाला' म्हणून झाली असली, तरी सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रामनदीने पुन्हा अस्तित्व सिद्ध केलेच.

Wednesday, July 04, 2007

जी गोष्ट भारतात शक्य आहे पण चीन मधे नाही ?



विक्रमा अशी कोणती गोष्ट आहे की ज्यात भारताची बरोबरी चीन करु शकत नाही ? भारतात जे जमते ते चीनमधे जमत नाही ? जी गोष्ट भारतात शक्य आहे पण चीन मधे नाही ? वेताळाने गुगली टाकत प्रश्न विचारला. माझा प्रश्नाचे उत्तर दे नाहीतर .......

वेताळा ऐक तर, तु २३ जुनचा साप्ताहीक सकाळ ( चीनमधे हे कसे जमते ? ) वाचलेला दिसतोस. हा प्रश्न त्याचाच परिणाम आहे. असो. तुला ऐकुन ठावुक असेलच चीन ने तिबेटच्या पठारावर अत्यंत प्रतीकुल परीस्थीतीत रेल्वे मार्ग बांधला, त्यांच्या कडे ४३२ किलोमीटरच्या वेगाने धावणारी मॅग्लेव्ह ट्रेन आहे .

विक्रमा आता तु मला परत या रेल्वे वर लेक्चर देणार आहेस काय रे ? आपल्याकडे कोणत्या परिस्थितीत कोकण रेल्वे बांधली विसरलास काय रे ? आता बोरीवली-विरार मधला चौपदरी मार्ग ही बांधुन पुरा होतोय ना ? होणार आहे ना ?

अरे वेताळा मला रेल्वे लाईन नव्हे तर त्यावरील पादचारी पुलाबद्द्ल तुला काहीतरी सांगायचय. मुंबापुरीत, चरनी रोड नामक रेल्वेस्थानका बाहेरील पादचारी पुल बांधल्यानंतर हाताच्या बोटावर मोजता येतील येवढ्याच वर्षात मोडकळीस आला. आता तो का व कसा जीर्ण झाला हा विषय वेगळा. मग तो पाडुन त्या जागी नवीन पादचारी पुल बांधायला घेतला. नवा पुल "स्टेट ऑफ आर्ट्स " असणार होता. या पुलावरुन दररोज लाखो रेल्वे प्रवासी ये जा करीत असत, येथला रस्ताही दक्षिण मुंबईतुन बाहेर पडण्याचा मुख्य रस्ता. मग ते हजारो, लाखो, प्रवासी सरळ रस्तावर, रस्ता पार करण्यासाठी येवु लागले, वाहतुकीस अडथळा होवु लागला, अडथळे, अडचण सर्वांनाच.

अभिमानाची गोष्ट म्हणजे अत्यंत विक्रमी वेळात या पुलाचे बांधकाम पुर्ण झाले, त्याबद्दल लोकप्रतिनीधींनी स्वतःच स्वताला शाबासकी देत अभिमानाने व गर्वाने पाठ थोपाटुन घेतली,

विक्रमा माझ्या प्रश्नाचे हे उत्तर नव्हे.

वेताळा ऐक तर खरे, हा बांधकामाचा कालाविधी फक्‍त जवळ जवळ २१ महीने म्हणजे पावणे दोन वर्षे होता. थोडेसे कमी जास्त, इकडे तिकडे.

आता सांग, ही दिरंगाई, हा विलंब , हा जनतेचा सोशीकपणा, ही कॉंट्रक्टर व संबधीताची बेपर्वायी, केवळ भारतातच शक्य आहे, नाही का ? चीनला हे जमणे व परवडणे नाही असे तुला वाटत नाही काय रे ?

तु बोललास व मी चाललो, या पुलावरुन.

सौदर्यला बाधा

अरे कोण आहे रे तिकडे ! विद्युतदिव्याच्या खांबाच्या सौदर्याला या दोन प्राचीन दगडी स्तंभामुळे बाधा येत आहे. याची दखल घेवुन योग्य ती कारवाई करण्यात यावी. व तो पर्यंत आजुबाजुचा परीसर, जसा आहे तसाच जतन करण्यात यावा असा आदेश दिला जात आहे


आखिरतक पत्राच्या घरवजा झोपडीत रहाणे

ज्या शिल्पकारांनी हे विश्व निर्माण केले त्यांच्या नशीबी आखिरतक पत्राच्या घरवजा झोपडीत रहाणे असते.
आज येथे तर उद्या कोठे ? देव जाणे !

लेबर कॅप चा फोटो



डि एस के विश्व चा फोटो

BELABAHAR: राग देश#links

BELABAHAR: राग देश#links

Tuesday, July 03, 2007

अस्ति कश्चित वागविशेष: ?



कालिदास विरचित "मेघदूत" ची आठवण दरवर्षी पावसाचे आगमन झाले व आषाढ महिना आला की मला हटकुन व्हायची. "आषाढस्य प्रथमदिवसे" बस्स येवढीच याची ओळख. मग दर वर्षी आता आपण हे असाधारण काव्य वाचायचेच असे मनाशी ठरवले जायचे. पण हा येवढा मोठा असाधारण अविष्कार आपल्याला पेलवेल की नाही, त्यातुन त्याचे काव्यरुपांतर आपल्याला उमजेल का ? या भयापोटी कित्येक वर्षे नीघुन गेली.

शनिवारी तुफान, धुरंधर पावसात अवचीत " मेघदूत - भावानुभाव " हे मीरा वैद्य, पद्मा कुलकर्णी, अनुपमा कुलकर्णी, व, मॄदुला गडनीस या कर्जतला रहाणाऱ्या चौघीजणींनी लिहिलेले पुस्तक हाती लागले व त्यातुन मेघदूत उलगडत गेला, परीचीत होत गेला.

या चौघ्या लेखीकानी साध्यासरळ, सोप्या भाषेत लिहीलेल्या भावानुवादामुळे मेघदूताचा आस्वाद घेणे सोपे झाले. यातली सुक्ष्म , मर्मस्थळे यात फारच उत्तमरितीने दाखवुन दिली गेलेली आहेत.

हे पुस्तक वाचण्याआधी मी श्री. शैलेश खांडेकर यांनी http://vidagdha.wordpress.com त्यांच्या बॉगवर केलेल्या काव्यानुभावाचा http://vidagdha.wordpress.com/meghadoot_purna पण आस्वाद घेतला होता,

मग परत येकदा समोर दोन्ही काव्यानुभाव व भावानुभाव ठेवुन परत येकदा मी मेघदूत जाणुन घेण्याचा प्रयत्न केला.

( कालीदासाने मेघदूताबरोबर यक्षीणीचे ही मनोगत कळवणारे येखादे काव्य का बरे लिहीले नाही ? असे उगीचच मग वाटुन गेले. )