शेवटी चांगलं कोण वाईट कोण, सुष्ट कोण दृष्ट कोण हे तो इतिहासकारच ठरवणार ना? वाल्मिकीनं म्ह्टलं म्हणून राम राम ठरला आणि रावण रावण!
मीना प्रभुंचे "तुर्कनामा" या पुस्तकातील हे वाक्य किती खर आहे.
रावण काय किंवा दुर्योधन काय, आम्ही त्यांना कायमच खलनायक म्हणुनच स्विकारलय. ते आम्हाला कधी उमगलेच नाही, कळलेच नाही, कदाचीत आम्हीही आहे त्या पलीकडे जाणुन घेण्याचा प्रयत्न केलाच नाही. स्वतंत्रपणे पणे विचार करायला कधी कोणी सांगीतलेच नाही. वास्तवीक पहाता यांना रणांगणात आपले कर्म करतांनाच मॄत्यु आला, व त्यामुळे गीतेत सांगीतल्या प्रमाणे फक्त तेच मरणा नंतर स्वर्गात गेले असावेत.
उषा पाणंदीकर यांनी आपल्या "देखणी दक्षिण " या पुस्तकात रावणाचे फार सुरेख वर्णन केले आहे. त्या लिहितात.
रावणाची मातॄभक्ती या महाबळेश्वर मंदिराच्या रुपात पाहावी. रावण ही असामी नगण्य नव्हती. या दक्षिणेच्या सम्राटापुढे मोठेमोठे राजे बिचकुन असत. विंद्य पर्वताखालची द्रविड संकॄती ही या राक्षस राजाच्या पराक्रमाची खुण होती. हा चौदा चौकडीचा राजा नुसता रणांगणावरचा योद्धा नव्हता, तर कवी होता. संगीत, नृत्य जाणकार होता,. सामवेद पचवुन रिचवुन होता. पंचमवेद, कॄष्ण्यजुर्वेदाची रचना याच्या हातुन झाली. त्याच्या नावाची संकॄत हस्तलिखितेसुचित ग्रंथ, कुमार तंत्र, प्राकॄत कामधेनु, अर्कप्रकाश, इंद्रजाल ही अजुन आहेत.
तो राक्षस होता, पण त्यानी राक्षस विवाह केला नाही. त्याच्या अंतःपुरात ब्राम्हण, दैत्य, गंधर्व, राक्षस, नाग, यांच्या सुकन्या होत्या; पण त्या बलात्कारने आल्या नव्हत्या. त्यांच्या वर बळजबरी नव्हती. नल कुबेराची पत्नी त्याच्यावर आशिक होती, पण याने तिला उपदेश करुन परत पाठविली. मंदोदरीशिवाय त्याने दुसऱ्या स्त्रीशी विवाह केला नाही. ( पण मी दुसऱ्या एका पुस्तकात या पेक्षा जरा वेगळी माहीती वाचलेली आहे. ते पुस्तक एका संशोधकाने लिहीलेले आहे. नाव व संदर्भ आठवत नाही. वाचनालयातुन पुस्तक आणल्यावर सविस्तर लिहीन )
रामाप्रमाणे तो एकपत्नी होता. म्हणुनच आर्यांचे भाट वाल्मीकीसुद्धा रावणाचे कौतुक करताना भान विसरतात ...... " तो वैडुर्यमण्यासारखा निळसर पर्वतासारखा प्रचंड, .. ज्याच्या हाताचे व पायाचे तळवे सोनेरी होते, बगळ्याच्या पंक्तीतल्या सुशोभित असलेल्या वसंतातल्या मेघासारखा ..... "असा तो सुंदर भासला. तो आला की सुर्य शीतलता धारण करी, पवन संथ वाहत असे, नद्या वेग सोडुन देत असत, पर्वत कठोरता विसरत असत. "
1 comment:
donhi varNane aavadli. shaila belle yanni eka pustakat -- "Raam yaa aarya raajane dravidi RaavaNaavar aakramaN karun lanka aapalyaa rajyala joDli. Nantar etihas lihitana to jetyanchya bajune lihine gela." ase mat maanDale aahe -- tyachi yavarun aaThavaN zali.
Post a Comment