दोन-तीन दिवसासाठी ती लग्नाला अहमदाबादला काय जाते आणी दोन दिवसात फक्त दोन दिवसात घराचा उकिरडा होण्यापर्यंत परीस्थीती जात चालली आहे. दोन दिवस घरात केरकचरा नाही, धुणीभांडी नाही , परवाची भांडी घासायची तशीच पडली आहेत, चादरीचे गोळे तशेच पडले आहेत. बिछाने आवरलेले नाहीत, सकाळचे दहा वाजले तरी माझा नास्ताचा प्रबंध झालेला नाही , फ्रिझ मध्यल्या पाण्याच्या बाटल्या भरलेल्याच नाहीत, मुळात घरातील पाण्याच्या टाकीत पाणी आहे का माहितच नाही, दोन्ही दिवस पहाटे लौकर मी पाणी भरण्यासाठी उठलेलोच नाही, पिण्याचे पाणी उकळवायचे राहीलेले आहे, वर्तमानपत्रे अस्तावस्त पडल्यात, घरात येवढी धूळ येतो कोठुन ? तीला जाताना मारे आम्ही शुराचा चेहरा करुन बजावुन सांगीतले होते, आमचे आम्ही पाहुन घेवु पोरग्याला काल कसाबसा मस्कापाव खिलवला, आज पोरगा तसाच उपाशी कॉलेजला गेला आहे, खायेल काहीतरी कॅटीन मधे.
अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया । ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
Saturday, July 28, 2007
हाउस ऑन फायर
घरात तुला काय काम असते ? आयुष्यभर बायकोला हेटाळुन झाले. आज स्वताच्यात थोबाडीत मारुन घेतले, परत बोलणार नाही.
आज वॉशींगमशीन मधे कपडे धुतले नाही तर उद्याचे काही खरे नाही, पण वॉशींगमशीन लावायची कशी ? त्याचे शास्त्र काय आहे ? काय ठावुक? मला फक्त चहा कसा करायचा तेवढेच ठावुक. दोन दिवस दुधही तापवलेले नाही. जी काही गॅस पाशी लुडबुड केली त्याची परीणीती ओटा बरबटुन ठेवण्यात झाली आहे.
आज घराबाहेर पडायची पण पंचाईत. मुलगा क्लास , कॉलेज मधुन घरी केव्हा येतो नीटसे माहीत नाही, घराची दुसरी चावी त्याला घेवुन जायला सांगायला विसरलो.
मीच नाही का, रोज सकाळी मी नास्ताला उशीर झाला की तिच्या अंगावर ओरडायचो, किती उशीर करतेस म्हणुन. मला कार्यालयात जायचय, कळत नाही का ?
माणुस समोर असला की त्याची किंमत केली जात नाही, आणी ती कळतही नाही. घरात केवढी कामे असतात ते आता कळतय. माझी गुणाची बाय ग तु !!
जाण्यापुर्वी तीने शेंगदाण्याचे लाडु करुन ठेवले आहेत आता त्याचाच सहारा. कस व्हायच ?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment