Friday, July 20, 2007

दैवगती

तीस-पस्तीस वर्षाची नोकरी. स्वंयपाक करायची. परत रहाणेही त्याच घरी. जेवणखाण व पगारही चांगला. यजमानीण परमेश्वरसमान. घरात फक्‍त हेच एकमेव काम. बाई घरातल्याच एक सदस्य झालेल्या. संपुर्ण विश्वास संपादन केलेला. कोणे एके दिवशी मती फिरली. घरात चोरी. दागदागीने, पैसाअडका. शेवट पोलीस केस, कोर्ट कचेरी व तुरुंगवास भोगणे.

गोष्ट येथे संपत नाही.

तुरुंगवासाची मुदत संपली. दैवगती फार न्यारी असते. बाईंना नवी नोकरी मिळाली. स्वंयपाक करायचीच. आणि ती सुद्धा एका मल्टी-नॅशनल कंपनीच्या डायरेक्टरच्या घरी. नोकरी सुरळीत चालली होती.

अचानक.

अचानक वर्तमानपत्रात आलेली जाहिरात आयुष्य बदलून गेली. परदेशात असणाऱ्या एका तरुण जोडप्याला त्यांच्या घरी कामासाठी व स्वंयपाकासाठी बाई हवी होती.

मग परदेश गमन. त्यांच्याबरोबर जग फिरणे.

कधीतरी ही नोकरी संपली.

परत भारतात नोकरी एका प्रतिष्ठित कुटुंबा मधे. त्यांची सर्व मुले परदेशी. भारतात घरी म्हाताऱ्या आईवडिलांसाठी त्यांना कोणीतरी बाई हवी होती.

दिमातीला मोटारगाडी, ड्रायव्हर, आया. कालांतराने आईवडीलांवे, दोघांचेही वार्ध्रव्यामुळे निधन. मुलांनी बाईंना नोकरी सोडुन जाण्यास मनाई केली. त्यांना बंगला रहायला दिला. त्यांच्यासाठी मोटारगाडी, ड्रायव्हर, आयांना ठेवले.
शेवटी ही नोकरी सुटली, बाई परत रस्तावर आल्या.

No comments: