Monday, July 16, 2007

पाली, रवाळजे, भीरा, ताम्हीणी घाट























ताम्हीणी घाट, पावसाळी मधहोशी धुंद वातावरण, हिरवाईचा अपुर्व सोहळा, हिरवकंच जंगल, निसर्गाचे लोभीवणारे रंग-रुप, ढगाळलेले गगन, अनुभवण्यासाठी येथे जायलाच हवे. अगणित धबधबे, प्रपात, खाली रस्तावर आलेले ढग व त्यात आपण, जिकडे नजर जाइल तेथे फक्त हिरवा रंग, जणु तांबडा काठ असलेला धरतीने परीधान केलेला हिरवा शालु, हे सारे न्याहाळायचा असेल तर या परीसरात भ्रमंती जरुर करावी.

शनिवारी आम्ही पुण्याला जायला निघालो. नेहमी प्रमाणे एक़्स्प्रेस वे न जाता वेगळी वाट धरायची मनी योजले व निघालो. गेल्या बर्षी या पावसाळ्यात मी एकट्याने या मार्गे सफर केलेली होती, यंदाला बायको व मुलाला घेवुन निघालो. सर्वप्रथम विघ्हेश्वराचे , बलाळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी पालीला गेलो, दर्शन झाले. देवळाजवळचा हा रस्ता वरती रवाळजे या गावातुन पुढे "भीरा" ला जातो. हा रस्ता सुरेख आहे, पावसाळ्यात त्याचे सौदर्य आणखीन खुलते, दुतर्फा हिरवीगार भात शेती, दुरवर दिसणारा सुधागड, मस्त जंगल, अधुनमधुन लागणारे पाण्याचे ओढे, १९ कि.मी.अंतरावरील रवाळजे गावात आपण कधी पोहोचतो कळतच नाही. या गावात एक धरण व पॉवर हाउस आहे.

भीरा मधे महाराष्टातील सर्वात जास्त पाऊस पडतो, येथेही एक धरण व टाटाचे पॉवर हाउस आहे. वरुन मुळशी धरणाचे पाणी आणुन येथे विद्युत निर्मीती होते ( हे सारे पहाण्यासाठी परवानगी लागते ).

भीरा मधे एका कडे रहाण्याची व जेवणाची उत्तम सोय होते. त्यांच्या कडे आम्ही जेवलो, बाजुलाच एक सुंदर देवालय आहे तेथे क्षणभर विश्रांती घेतली, आता वेध लागले होते ताम्हीणी घाटाचे. वाटेत दोन मोरांचे दर्शन ही झाले,

भीरा वरुन हा रस्ता, विळे गावापाशी खालुन, मुंबई - गोवा हमरस्तावरील कोलाड गावातुन पुण्याला जाणाऱ्या रस्ताला मिळतो. या रस्ताचे वैशिष्ट म्हणजे येथील आजुबाजुच्या डोंगरमाथ्यावर अमाप धबधबे आहेत.

या रस्ताला लागलो, प्रथमच छानसे, छोटासे दोन धबधबे लागला, आजुबाजुला चिटपाखरुही नव्हते, हे जणु आमच्याच साठी होते, मस्त पैकी गाडी थांबवुन त्याची मजा लुटली, मधेच जरासास पाऊस सुरु झाला. मग तेथुन निघालो, हळुहळु घाटाची मजा लुटत जात असताना, घाटमाथावरचे द्रुश्य न्याहाळत असतना, अचानक नजर गेली ती उंच डोंगरमाथावरुन खाली रस्तावर झेपवण्याऱ्या दोन प्रपातांवर, गिरीचे मस्त्की गंगा, क्या बात है ! तत्काळ ब्रेक लागले, त्याचे रुप डोळ्यात भरुन घेण्यासाठी, त्या खालील झऱ्यात पाय सोडुन बसण्यासाठी, वनभोजन करण्यासाठी, थंडगार, रुचकर, नैसर्गीक पाणी पिण्याची आपल्याला सवय नाही हो, दिवसभर तसा पाऊस नव्हता, एक प्रकारे तसे वाईट, ढगात वावरणे होत नव्हते, पण एक प्रकारे ते बरेच झाले, निसर्ग मस्तपैकी न्हाहळताना आला, येथुन पाय निघत नव्हता, खालचे दरीतुन वर चढणारा नागमोडी, सर्पाकॄती रस्ता कसा मोहवीत होता. पाय उचलवितच नव्हते.

अजुन बराच पल्ला बाकी होता, मग निघालो, वाटेमधल्या सुप्रसिद्ध दऱ्या ढगात डुंबुन गेल्या होत्या, वाटेवर घनदाट धुके, ढग अजुन तरी लागले नव्हते, डोंगरवाडी पार केली, आणि पठारावरचे द्रुश्य अचानक बदलु लागले, वातावरण धुंदफुंद होत गेले, ढग रस्ता अडावु लागले, क्षणार्धात आजुवाजुचे काहीही दिसेनासे झाले, मग गाडी थाबंवणे व धुक्याची मजा लुटने भागच होते.

वाटेत विंझाई देवीचे दर्शन घेतले, निघालो. उजवी कडे मग सुरु झाले , जे पाहण्यासाठी मी वारंवार या परीसरात जातो ते मुळशी धरणातील पाण्याचे नयनरम्य दर्शन. सतत आपल्याला हा पाण्याचा अफाट साठा या प्रवासात सोबत देत असतो. मग परत थांबणे, डोळे भरुन पहाणे आलेच.

अंधारु लागले होते, आता मात्र अधेमधे कोठेही न थांबता तडक घर गाठले,

मुंबई वरुन निघालो सकाळी सहा वाजता, पुण्याला पोहोचलो रात्री सात वाजता. मजा आली.

पण हा प्रवास श्रावणात करणे उत्तम, अजुन भरपुर पाऊस झालेला नाही. पुण्याकडे ताम्हीणीत फार गर्दी असते, त्या मानाने खाली कोकणाच्या दिशेला तेवढी नसते. पायात उत्तम पादत्राणे असावीत, अन्यथाहा दारुडयांनी पाण्यात फोडलेल्या दारुच्या बाटलीच्या फुटक्या काचेचे प्रताप आपल्याला भोगावे लागतात. या मद्यपी लोकांना जहाजात बसवुन शिक्षा फर्मावण्यासाठी व भोगण्यासाठी सौदी अरेबियाला वगैरे देशात पाठवावे. पाठीवर चाबकाचे फटके. वर त्यावर मिठ चोळणे. मिरचीची धुरी उत्तम .

8 comments:

Priyabhashini said...

vaah photos are too good... lucky you! heva waatalaa.

evolvingtastes said...

Lovely! Your pictures and post brought forth many memories of hiking in the Sahyadris in the monsoons.

Anand Sarolkar said...

lovely pics...ekdum gharchi athvan jhali!

Yogesh said...

मस्त फोटो आहेत. पण माळशेजसारखा आता ताम्हिणी, वरंधा मध्येही बेवड्यांचा उपद्वव सुरु झाला आहे. :(((

कोहम said...

chaan. trip ekandarit masta zali mhanayachi..

Shielesh Damle said...

Very good description. Just after your cross Tamhini Ghat before Mulashi. There is temple called "Vinzai Devi". Have you seen this temple?

HAREKRISHNAJI said...

Priyabhashini / evolvingtastes / anand sarolkar / yogesh / koham and shielesh

Thanx. Unfortunately I made this trip very early this year , end august is the ideal month to visit sahyadris. The monsoon have just disappeared nowadays. May be this sunday we shall visit Kelve.

Dear Shielesh,

We did visit Vinzai Devi's temple.
Family deity of CKP's. The forth photo from top is of from the front side of the temple.

Anonymous said...

Devila maza namskaar

Arvind Pradhan
Montreal Canada