Tuesday, July 03, 2007

अस्ति कश्चित वागविशेष: ?



कालिदास विरचित "मेघदूत" ची आठवण दरवर्षी पावसाचे आगमन झाले व आषाढ महिना आला की मला हटकुन व्हायची. "आषाढस्य प्रथमदिवसे" बस्स येवढीच याची ओळख. मग दर वर्षी आता आपण हे असाधारण काव्य वाचायचेच असे मनाशी ठरवले जायचे. पण हा येवढा मोठा असाधारण अविष्कार आपल्याला पेलवेल की नाही, त्यातुन त्याचे काव्यरुपांतर आपल्याला उमजेल का ? या भयापोटी कित्येक वर्षे नीघुन गेली.

शनिवारी तुफान, धुरंधर पावसात अवचीत " मेघदूत - भावानुभाव " हे मीरा वैद्य, पद्मा कुलकर्णी, अनुपमा कुलकर्णी, व, मॄदुला गडनीस या कर्जतला रहाणाऱ्या चौघीजणींनी लिहिलेले पुस्तक हाती लागले व त्यातुन मेघदूत उलगडत गेला, परीचीत होत गेला.

या चौघ्या लेखीकानी साध्यासरळ, सोप्या भाषेत लिहीलेल्या भावानुवादामुळे मेघदूताचा आस्वाद घेणे सोपे झाले. यातली सुक्ष्म , मर्मस्थळे यात फारच उत्तमरितीने दाखवुन दिली गेलेली आहेत.

हे पुस्तक वाचण्याआधी मी श्री. शैलेश खांडेकर यांनी http://vidagdha.wordpress.com त्यांच्या बॉगवर केलेल्या काव्यानुभावाचा http://vidagdha.wordpress.com/meghadoot_purna पण आस्वाद घेतला होता,

मग परत येकदा समोर दोन्ही काव्यानुभाव व भावानुभाव ठेवुन परत येकदा मी मेघदूत जाणुन घेण्याचा प्रयत्न केला.

( कालीदासाने मेघदूताबरोबर यक्षीणीचे ही मनोगत कळवणारे येखादे काव्य का बरे लिहीले नाही ? असे उगीचच मग वाटुन गेले. )

No comments: