
वटपोर्णिमा. निसर्गाची पुजा आपण या दिवशी निसर्गाचाच विध्वंस करुन करत असतो याची जाणीव बऱ्याच जणींना नसते. या एका दिवसात केवळ श्रद्धेपोटी असंख्य वडाच्या झाडांची, फांद्यांची पुजा करण्यासाठी सर्वत्र मोठया प्रमाणात विनाश होत असतो. ज्या वडाची पुजा करुन सावित्रीने सत्यवानाच्या प्राणाचे रक्षण केले त्या वडाचे आपण संरक्षण व संवर्धन करायला हवे. वडाच्या फांद्या तोडण्याचे पाप न करता वटरोपणाचे पुण्य कमवुन पर्यावरणाचे संतुलन आपण राखायला हवे जेणे करुन या वसुंधेअरेचे, सृष्टीचे व चराचराचे आयुष्य वाढेल.
सौ व श्री. लौलेकर यानी हा विनाश कोठेतरी थांबायला हवा या संकल्पनेने वटपोर्णीमेच्या दिवशी एक अभिनव उपक्रम राबवला. त्यांनी मुंबई महानगरपलिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातुन नाममात्र रुपये एक या दराने वडाची रोपे आणली. या वडाच्या रोपाचे लक्ष्मीनारायण मंदीरात येवुन विभागातील असंख्य महिलांनी पुजन केले. आता या रोपाचे योग्य त्याजागी रोपण केले जाईल.
1 comment:
फारच छान उपक्रम आहे.सौ व श्री. लौलेकर यांचे अभिनंदन!
Post a Comment