Showing posts with label लेख. Show all posts
Showing posts with label लेख. Show all posts

Monday, September 03, 2007

हे केवळ भगवान कॄष्णच जाणे




गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्हा बाळा. काळ बदलला, आता हा गोविंदा तान्हा बाळांचा खेळ राहिलेला नाही. नटखट माखनचोर कान्ह्या च्या आठवणी केव्हाच पास इतिहास जमा झाल्या आहेत. आता राहीली आहे ती केवळ जीवघेणी स्पर्धा. निव्वळ राजकारण , एकामेकावर कुरघोडी करण्याची प्रवॄत्ती.

आयोजकांनी लाखो रुपयांचे आमिषे, बक्षीसे लावुन दहीहंडी उंचावर, आवाक्याबाहेर लावायची , मग ते हाशील करण्यासाठी व्यावसायीक गोविंदा पथकांनी भले मोठे उंचाले मानवी मनोरे रचायचे, त्या साठी प्रायोजक शोधायचे, मिळवायचे, उंचावरुन खाली पडुन जखमी व्हायचे, प्रसंगी प्राण ही गमवायचे.

अत्यंत वाईट व निंदनीय गोष्ट म्हणजे, सर्वात वरच्या थरात केला जाणारा लहान मुलांचा गैरवापर. का तर ते वजनाने कमी असतात. बऱ्याच वेळा हे मानवी थर रचतारचता, दहीहंडी फोडतांना खाली कोसळतात, सर्वात वरती असणारा दोरखंडाला लोंबकळत रहातो. मग त्याने खाली उडी मारायची व इतरांनी त्याला झेलायचे (?)

कायद्याचेच या जिवघेण्या उंची वर व लहान मुलांच्या उपयोग करण्यावर बंदी आणली का जावु नये ?
मला बऱ्याच वेळी वाटते की प्रस्तरारोहण करताना गिर्यारोहक वापरतात ती बिले पद्धत,दोरी ने वर चढणाऱ्याला सुरक्षीत करणे किंवा सर्वात वरच्या व्यक्तीने स्वतःला मुख्य दोरखंडास हारनेस ने अडकवुन घेणे इ. (belay —v. secure (a rope) by winding it round a peg etc. —n. act of belaying. , harness —n. 1 equipment of straps etc. by which a horse is fastened to a cart etc. and controlled. 2 similar arrangement for fastening a thing to a person's body. ) या वेळी वापरली का जावु नये ? किंवा खाली सर्कसीत असते त्या प्रमाणे जाळी का लावली जावु नये ?
यंदाला किती जण पडुन जखमी होतील , प्राण गमवतील हे केवळ भगवान कॄष्णच जाणे.

Friday, August 17, 2007

गोव्यात आमदारांच्या आटापाट्या

"बारा गावच्या बारा जनी, बारामतीत यांचे धनी".

डॉ. मीना नेरुरकर यांचा "सुंदरा मनामधे भरली" या कार्यक्रम नुकताच भारतात सुरु झाला होतो. महाराष्ट्रात युतीचे राज्य होते. अनेक अपक्ष आमदारांच्या पाठबळावर शिवसेना-भाजपाचे सरकार सत्तेवर आले होते. प्रमुख पाहुणे म्हणुन या सरकार मधे महत्वाच्या खात्याचे मंत्री असलेले एक अपक्ष आमदार आले होते. त्यांच्या वर लगेचच सुत्रधाराने टिपण्णी केली.

"हे अपक्ष आमदार म्हणजे कसे, तर बारा गावच्या बारा जनी, बारामतीत यांचे धनी".

सभागृहात, हे सारे संदर्भ माहीत असल्यामुळे हास्याचा धबधबा सुरु झाला.

सध्या गोव्यात आमदारांचा जो खेळखंडोबा चालला आहे, तो बघीतला आणि हा प्रसंग आठवला. या आटापाट्या खेळणाऱ्या आमदारांचे धनी कोण बरे असावे ?

Thursday, August 16, 2007

कसं काय: बदलत्या भाषा

कसं काय: बदलत्या भाषा http://kasakaay.blogspot.com/

कॉग्रेट्स. ऐम टी. (म.टा) फ़ॉर मराटी भाशेत न्यु वड्‌र्स ऍड केल्या साटी. आपण मराठी भाषेच्या शब्दसंग्रहात वैल्युअबल (मोलाची) भर टाकली आहेत. ठेवा इट var. (keep it up )

बट. होल्ड ऑन. लोकसत्ता यु टु ?

वन डाइंग सेकन्ड क्राइंग. सेकन्ड डाइंग थर्ड क्राइंग ( एक मरे त्याचा दुजा शोक वाहे ).

आजच्या मुंबई वॄतांत मधील बातमी " आकाशवाणीच्या प्राईम टाईममधून स्फूतीगीते हद्द्पार ". " रेडीयो टाइमवर घड्याळ अडजेस्ट करायच्या त्या काळात " "या स्फूतीगीतांना आऊट्डेटेट ठरविण्यात श्रोतेच जबाबदार "

Sunday, August 12, 2007

दिवली अमावस्या

उतु नका मातु नका, घेतला वसा टाकु नका, या कथा आता विस्मॄतीत्त गेल्या आहेत.

आज दिवली अमावस्या. दिव्याची पुजा. मग मधरात्री नंतर सारे दिवे माळरानावर जमणार, चर्चा करणार, आज कोणाकडे काय खाल्ले , काय नेवेद्य होता याची . ( आमच्या कडे नारळाच्या करंज्या खाल्यात )

आता वेध श्रावणी सोमवारचे व त्या निमित्ते होणाऱ्या खाद्य महोत्सवाचे. उद्याचा बेत मुगाचे बिर्डे. व बहुतेक आप्पे.


लिहीणारा - खाण्यासाठी जगणारा
- काही खर नाही.

दिवली अमावस्या




आज दिवली अमावस्या ,गटारी. मग उद्या पासुन श्रावण मास सुरु.
श्रावणात मांसाहार करायचा नाही हे शास्त्रवचन. साऱ्या महिन्याचा कोटा आज कंप्लीट करायचा.
मग महिनाभर मास, मटण, मच्छी खायला मिळणार नाही. माटूंग्याचे गोपी टॅंक बाजार आज ओसांडुन, भरभरुन , वाहत होता, त्यात परत आज रविवार, सुट्टीचा दिवस. मग या गटारीचा स्वाद द्विगुणीत झाला.
लिहीणार - शुद्ध शाकाहारी.
- ज्याने कधीतरी केव्हातरी कोलंबी, पापलेट व काप्री सरंगा चापले होते.

Saturday, August 11, 2007

बॉलीवूडची अनधीकॄत " पार्टनरशिप " धोक्यात आली की हो

हे काय भलतेच. असे कधी झालय का ? बॉलीवूडची अनधीकॄत " पार्टनरशिप " धोक्यात आली की हो .

"हिच" चित्रपटावरुन प्रेरणा घेतल्या बद्द्ल पार्टनर चित्रपटाच्या निर्मात्यांना कोर्टात खेचण्याची तयारी विल स्मिथ व सोनी पिक्च्रर्सने चालवली आहे असे ऐकले ते खरे आहे का हो ? बहुतेक हे खरे नसावे ना, नाही ना, खर सांगा, गरीबांची अशी थट्टा नका हो करुत. ही उचलेगिरी खरच नाही हो, हा असलाच तर निव्वळ योगायोग आहे की हो.

नका हो नका असे काही तरी भलतेसलते करु. सायबांनु, हा दावा मान्य झाला तर आमच्या सर्व बॉलीवूड मधल्या गरीब बिच्चाऱ्या प्रतिभाशाली. प्रतिभावंतांच्या पोटावर पाय येयील ना हो, त्यांनी याचा पुढे कोण्याच्या तोडाकडे आपल्या रोजीरोटि साठी पाहावे ? नका हो नका त्यांच्या पोटावर असे मारु नका हो.

दादा, केवळ पडदयावरील चित्रे तीन तास सतत हलत रहावी येवढाच प्रामाणिक व शुद्ध हेतु पार्टनरच्या निर्मात्यांचा आहे हो. पैसे कमावायचा हेतु खरच नाही. अगदी गळ्याची शप्पथ.

दादानों, असा नका हो अनिष्ट पायंडा पाडुत हो, मग जगातुन किती आणि कोण कोण उठेल व अश्याच कॉर्टात केसीस करत बसेल. आता या वयात देव आनंदवर ग्रेगरी पेक नी माझी नक्क्ल का केलीस म्हणुन केस केलीत तर कॉटाची पायरी चढायची वेळ येईल की हो. आणि चित्रपटसंगीताचे काय होईल त्याचा पण जरा सहानभुतीने विचार करा ना, गाण्याशिवाय सिनेमे, आईग्ग, विच्चार सुद्धा करवत नाही हो.

ओ, राव ऐका की जरा. लोक म्हणतील पार्टनर ऐवढा भिक्कार तर मुळचा हिच किती वाईट असेल. पहा बरे तुमच्याच धंदयावर वाईट परीणाम होईल. परत विचार करा. तुम्ही तर आमच बॉलीवुडच बंद करायला निघालात. एवढ दाताच्या कण्या करुन सांगतो तर कळत नाही का ?

ऐ, आमचच ओरीजीनल हाय लक्षात ठेवा, तुमीच लबाडी करुन चित्रपट आधी प्रकाशीत केलात. जा काय करायच ते करा. कल्पना काय तुम्हालाच सुचतात ? आम्हाला नाही काय ?

Tuesday, August 07, 2007

Flower Surprise

हि परी खरी आहे का हा केवळ पुतळा आहे ?


ओळखा बघु यात माणुस कुठे आहे ?

दुबई मधील बर्जुमान या मॉल मधे समर फेस्टीवल मधले Flower Surprise.

तुम्हाराही बराबर, और तुम्हाराभी बराबर

मटण कैसा किलो ? मटण कैसा किलो ? हाताची दाही बोटे मटणवाल्यापुढे सतत नाचवत भाउंनी विचारले. दाही बोटात चांगल्या सोन्याच्या घसघसीत अंगठया होत्या. या वैभवाच्या अती प्रदर्शनाने दुकानदार चांगलाच वैतागला.

मटण सौ रुपय्या किलो, सौ रुपय्या किलो, आपली संपुर्ण बत्तीसी विस्कारुन, दुकानदाराने भाव सांगितला. त्याचे बत्तीस ही दात सोन्याचे होते. झाले दोघांची लग्गालग्गी, गुद्दादुद्दी सुरु झाली. भांडण सरपंच बाई पर्यंत पोहोचले. दोघांचे म्हणणे ऐकल्या नंतर बाईंनी आपला फैसला सुनावला.

मान उजवीकडे वळवुन भाऊरावांकडे बघुन त्या म्हणाल्या तुम्हारा ही बराबर. मग हळुवारपणे मान डावी कडे वळवुन मटणवाल्याला म्हणल्या तुम्हाराभी बराबर.

सरपंचबाईच्या कानात भल्यामोठाल्या हिऱ्याच्या कुडी होत्या.

सध्या महाराष्टात दोन राजकीय पक्षातील युती तोडण्या / रहाण्या वरुन होण्याऱ्या कुरबुरीवरुन ,युक्तीवादाबद्द्ल ही असेच म्हणावेसे वाटते. तुम्हाराही बराबर, और तुम्हाराभी बराबर

Sunday, August 05, 2007

विनामुल्य कार्यक्रम व निमंत्रणपत्रिका

बरेचसे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम विनामुल्य असतात. बऱ्याचदा चांगल्या कार्यक्रमाची एक पुर्वाअट असते. विनामुल्य निमंत्रणपत्रिके विना (फ्री पासाशिवाय) प्रवेश नाही. त्याचे फ्री पासेस चे वितरण काही दिवस आधी सभागॄहात केले जाते. अर्धेअधिक पासेस संयोजकानी स्वःता वाटण्यासाठी ठेवलेले असतात.
विनामुल्य पासेस म्हटल्यावर बऱ्याच व्यक्ती अनेक पासेस घेवुन जातात. जास्तीचे असलेले बरे. ऐन वेळी कोणी मागितले तर? या शुद्ध (?) हेतुने. तसेच अनेक वेळा संयोजकांकडेही ते पासेस तसेच पडुन रहातात.

फुकटचे पासेस घेवुन गेलेली माणसे कार्यक्रमाला येतातच असे नाही. परीणामी कैक वेळी सभागॄह अर्धेअधीक रिकामे असते, सर्व पासेस संपलेले असुन सुद्धा. दुसरी बाब म्हणजे या पासेसचे वितरण ज्या वेळेत केले आते तेव्हा आपण कार्यालयात असतो. पासेस आणायला जाणे जमत नाही.

ह्या पेक्षा सभागॄहात कार्यक्रमाच्या वेळेस रसिकांना रांगेने, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वानुसार शिस्तीने प्रवेश करु द्यावा. पासेस छापणे, वाटणे व ते आणणे याचे श्रम व पैसा दोन्ही वाचतील.
किंवा निमंत्रणपत्रिकेचे नाममात्र शुल्क आकारावे, जेणे करुन फुकट्यांना आळा बसेल.

Saturday, August 04, 2007

आपण जगा व दुसऱ्याला जगु द्या.

दि.३ ऑगस्टच्या म.टा.मधे एका वाचकाने लिहीलेल्या पत्रात, भटक्या कुत्रांविषयी आपले मत प्रदर्शित केले आहे. यात त्यांनी मुबई महानगरपालिकेचे आयुक्तांच्या "भटक्या कुत्रांना मारलेच पाहिजे " या मताची भलावण केली आहे. खरे म्हणजे एक महत्वाच्या सरकारी अधिकारी व्यक्तीनेच असे विधान करणे हिच मुळात दुर्देवाची गोष्ट आहे. हे वाचक पुढे लिहीतात " एक वेळ अशी येयील की, माणसे कमी व कुत्रांची संख्या जास्त असेल. आणि हा हा म्हणता मुंबई शहर हे कुत्रांचे शहर म्हणुन गिनीज बुकात नोंद होईल."
माणसाने अतिशयोक्ती करावी ती तरी किती? केवळ आपले म्हणणे मांडण्यासाठी? दुसऱ्या प्राण्याला, जीवाला कोणत्याही कारणाशिवाय मारुन टाका हा अनाहुत सल्ला देण्याआधी मानवाने, मानवाचीच संख्या नियंत्रीत ठेवली तरी पुरेसे आहे.

या वसुंधरेवर जगण्याचा मक्ता फक्त आपणच घेतला आहे हा गोड गैरसमज मानवाने करुन घेतला आहे. आपणच या पॄथ्वीलोकावरच्या किती जाती प्रजाती, प्राणी, पक्षी, किटक , एक जीवनचक्र नष्ट करतो आहोत याचे त्यांनी कधी भान ठेवले आहे का ? कधी खाण्यासाठी, कधी शिकारी साठी, कधी आपल्या शौक खातीर, मजे खातीर, छंदाखातीर, खोट्या समजुतीपायी.

केवळ आपल्या स्वार्थासाठीच त्याने जंगलेच्या जंगले नष्ट केली, निसर्गाचा तोल बिघडवला आणि आता पुरातन काळापासुनचा मानवाचा सोबती असलेला कुत्रा त्याला नकोसा झाला आहे ? का ? तर हे भटके कुत्रे म्हणे रस्तावरुन जाणाऱ्या येणाऱ्या माणसांना चावत असतात म्हणुन ? असे किती कुत्रे किती जणाना चावले असतील बरे? आपण हे विसरतो की त्या पेक्षा जास्त, माणसेच इतर माणसांवा चावत असतील, त्रास देत असतील , आपले रोजचेचे जीवन बऱ्याच वेळा दुसऱ्या माणासांनी असह्य करुन ठेवेलेले असते. आणि हो, या पेक्षा जास्त संहार मानवानेच, मानवाचा युद्ध्यात केला आहे, धर्माच्या नावाखाली केलेल्या दंगलीत केला आहे, चोरी, डाका, दरोडेखोरी, लुटमार, करताना केला आहे.

या भटक्या कुत्रांना माया द्यावी,त्यांना लळा लावावा असे आपल्याला कधी वाटतच नाही का? खर बघायला गेले तर ते कुत्रे प्रामाणीकपणे, रात्री बेरात्री आपल्या सोसायटीत, गल्लीत, रस्त्यावर न सांगता कोणत्याही मोबदल्याशिवाय पहारा करत असतात. त्यांची आपल्याला हॊ मोलाची मदत होत असते. बाहेरील माणसांवर त्यांचे बरोबर लक्ष असते.

मधे तर एका गॄहस्थाने चक्क महात्मा गांधीजीची साक्ष काढली होती, गांधीजीचे ही भटक्या कुत्रांना मारले पाहीजे असे मत असल्याचे पत्र लिहीले होते. बहुदा या सदग्रुहस्थांना पिसाळलेला कुत्रा व भटका कुत्रा यातला फरक जाणवला नसेल.

आपण जगा व दुसऱ्याला जगु द्या.

Saturday, July 28, 2007

रावण

शेवटी चांगलं कोण वाईट कोण, सुष्ट कोण दृष्ट कोण हे तो इतिहासकारच ठरवणार ना? वाल्मिकीनं म्ह्टलं म्हणून राम राम ठरला आणि रावण रावण!

मीना प्रभुंचे "तुर्कनामा" या पुस्तकातील हे वाक्य किती खर आहे.

रावण काय किंवा दुर्योधन काय, आम्ही त्यांना कायमच खलनायक म्हणुनच स्विकारलय. ते आम्हाला कधी उमगलेच नाही, कळलेच नाही, कदाचीत आम्हीही आहे त्या पलीकडे जाणुन घेण्याचा प्रयत्न केलाच नाही. स्वतंत्रपणे पणे विचार करायला कधी कोणी सांगीतलेच नाही. वास्तवीक पहाता यांना रणांगणात आपले कर्म करतांनाच मॄत्यु आला, व त्यामुळे गीतेत सांगीतल्या प्रमाणे फक्त तेच मरणा नंतर स्वर्गात गेले असावेत.

उषा पाणंदीकर यांनी आपल्या "देखणी दक्षिण " या पुस्तकात रावणाचे फार सुरेख वर्णन केले आहे. त्या लिहितात.

रावणाची मातॄभक्ती या महाबळेश्वर मंदिराच्या रुपात पाहावी. रावण ही असामी नगण्य नव्हती. या दक्षिणेच्या सम्राटापुढे मोठेमोठे राजे बिचकुन असत. विंद्य पर्वताखालची द्रविड संकॄती ही या राक्षस राजाच्या पराक्रमाची खुण होती. हा चौदा चौकडीचा राजा नुसता रणांगणावरचा योद्धा नव्हता, तर कवी होता. संगीत, नृत्य जाणकार होता,. सामवेद पचवुन रिचवुन होता. पंचमवेद, कॄष्ण्यजुर्वेदाची रचना याच्या हातुन झाली. त्याच्या नावाची संकॄत हस्तलिखितेसुचित ग्रंथ, कुमार तंत्र, प्राकॄत कामधेनु, अर्कप्रकाश, इंद्रजाल ही अजुन आहेत.

तो राक्षस होता, पण त्यानी राक्षस विवाह केला नाही. त्याच्या अंतःपुरात ब्राम्हण, दैत्य, गंधर्व, राक्षस, नाग, यांच्या सुकन्या होत्या; पण त्या बलात्कारने आल्या नव्हत्या. त्यांच्या वर बळजबरी नव्हती. नल कुबेराची पत्नी त्याच्यावर आशिक होती, पण याने तिला उपदेश करुन परत पाठविली. मंदोदरीशिवाय त्याने दुसऱ्या स्त्रीशी विवाह केला नाही. ( पण मी दुसऱ्या एका पुस्तकात या पेक्षा जरा वेगळी माहीती वाचलेली आहे. ते पुस्तक एका संशोधकाने लिहीलेले आहे. नाव व संदर्भ आठवत नाही. वाचनालयातुन पुस्तक आणल्यावर सविस्तर लिहीन )

रामाप्रमाणे तो एकपत्नी होता. म्हणुनच आर्यांचे भाट वाल्मीकीसुद्धा रावणाचे कौतुक करताना भान विसरतात ...... " तो वैडुर्यमण्यासारखा निळसर पर्वतासारखा प्रचंड, .. ज्याच्या हाताचे व पायाचे तळवे सोनेरी होते, बगळ्याच्या पंक्तीतल्या सुशोभित असलेल्या वसंतातल्या मेघासारखा ..... "असा तो सुंदर भासला. तो आला की सुर्य शीतलता धारण करी, पवन संथ वाहत असे, नद्या वेग सोडुन देत असत, पर्वत कठोरता विसरत असत. "

हाउस ऑन फायर

घरात तुला काय काम असते ? आयुष्यभर बायकोला हेटाळुन झाले. आज स्वताच्यात थोबाडीत मारुन घेतले, परत बोलणार नाही.

दोन-तीन दिवसासाठी ती लग्नाला अहमदाबादला काय जाते आणी दोन दिवसात फक्त दोन दिवसात घराचा उकिरडा होण्यापर्यंत परीस्थीती जात चालली आहे. दोन दिवस घरात केरकचरा नाही, धुणीभांडी नाही , परवाची भांडी घासायची तशीच पडली आहेत, चादरीचे गोळे तशेच पडले आहेत. बिछाने आवरलेले नाहीत, सकाळचे दहा वाजले तरी माझा नास्ताचा प्रबंध झालेला नाही , फ्रिझ मध्यल्या पाण्याच्या बाटल्या भरलेल्याच नाहीत, मुळात घरातील पाण्याच्या टाकीत पाणी आहे का माहितच नाही, दोन्ही दिवस पहाटे लौकर मी पाणी भरण्यासाठी उठलेलोच नाही, पिण्याचे पाणी उकळवायचे राहीलेले आहे, वर्तमानपत्रे अस्तावस्त पडल्यात, घरात येवढी धूळ येतो कोठुन ? तीला जाताना मारे आम्ही शुराचा चेहरा करुन बजावुन सांगीतले होते, आमचे आम्ही पाहुन घेवु पोरग्याला काल कसाबसा मस्कापाव खिलवला, आज पोरगा तसाच उपाशी कॉलेजला गेला आहे, खायेल काहीतरी कॅटीन मधे.

आज वॉशींगमशीन मधे कपडे धुतले नाही तर उद्याचे काही खरे नाही, पण वॉशींगमशीन लावायची कशी ? त्याचे शास्त्र काय आहे ? काय ठावुक? मला फक्त चहा कसा करायचा तेवढेच ठावुक. दोन दिवस दुधही तापवलेले नाही. जी काही गॅस पाशी लुडबुड केली त्याची परीणीती ओटा बरबटुन ठेवण्यात झाली आहे.
आज घराबाहेर पडायची पण पंचाईत. मुलगा क्लास , कॉलेज मधुन घरी केव्हा येतो नीटसे माहीत नाही, घराची दुसरी चावी त्याला घेवुन जायला सांगायला विसरलो.
मीच नाही का, रोज सकाळी मी नास्ताला उशीर झाला की तिच्या अंगावर ओरडायचो, किती उशीर करतेस म्हणुन. मला कार्यालयात जायचय, कळत नाही का ?
माणुस समोर असला की त्याची किंमत केली जात नाही, आणी ती कळतही नाही. घरात केवढी कामे असतात ते आता कळतय. माझी गुणाची बाय ग तु !!
जाण्यापुर्वी तीने शेंगदाण्याचे लाडु करुन ठेवले आहेत आता त्याचाच सहारा. कस व्हायच ?

Thursday, July 26, 2007

फास्टर फेणे

अरे गडया आपला फा.फे. बरा. आपला फुरसुंगीचा बन्या हो. फास्टर फेणे आठवतो काय ? भा.रा. भागवतांचा फा.फे.

टॉक फेम.

सध्या हरी पाटकरांचा ऐवढा उदो उदो चालला त्या झगमगाटा पुढे कोण कुठला काय फा.फे. माझा मुलाला, नव्या पिढीला तो माहीती असण्याचे कारणच नाही. चुकी माझीच. मीच त्याला पंचतंत्र. ईसापनीती, फास्टर फेणे यांची ओळख सुद्धा करुन दिली नाही.

आता त्यानी माझ्या कडे हॅरी पॉटर चे पुस्तक विकत घ्यायला व चित्रपट पहायला हजार रुपये मागीतले तर ते मी देयलाच हवे.

महाराष्ट्र टाईम्सची गंभीर चुक.

सीता अशोक फोटो


अशोक वॄक्षाच्या औषधी गुणधर्माची खुप चांगली उपयुक्त माहीती सांगणारा एक उत्तम लेख आजच्या म.टा. मधे "आयुर्वेद तुमच्यासाठी या सदरात डॉ. उदय कुलकर्णी यांनी लिहीला आहे.
पण हा लेख सीता अशोक या वॄक्षावर आहे आणि म.टा. ने मात्र लेखात वॄक्षाचा फोटो सर्वसामान्यपणे रस्त्यावर आढळणाऱ्या अशोका चा टाकला आहे. जो सर्वांच्याच परीचयाचा आहे. ही दोन्ही झाडे वेगळी आहेत. लोकांची यामुळे मोठी फसगत होण्याची शक्यता आहे. बहुतेकांना सीता अशोक माहीती नाही, ते या लेखाप्रमाणे फोटोतील अशोकाच औषधासाठी वापर करण्याची शक्यता आहे.

म.टा.ने आपली ही गंभीर चुक तात्काळ खुलासा करुन सुधारावी ही इच्छा.
ता.क. - मी म.टा. शी बोललो. सीता अशोक वृक्षाच्या जागी अशोकाचा फोटो छापणे हि चुक आहे असे त्यांना वाटत नाही. त्यांची मर्जी. उद्याला अशोकाची पाने , बिया, साल, लोकांनी औषध म्हणुन वापरु नये म्हणजे झाले.

Tuesday, July 24, 2007

विनोदी कवी अशोक नायगावकर

विनोदी कवी अशोक नायगावकर यांचे नाव अशोक नायगराकर असे का बदलू नये ? हा प्रश्न मला आज अचानक पडला.

दोन तीन वर्षापुर्वी ए.सो.टी.सी. नी त्यांच्या संभाव्य ग्राहकांसाठी एक मराठी वाद्यवॄंदाचा कार्यक्रम आयोजीला होता. आम्ही सुद्धा आमंत्रीत पाहुणे होतो. त्यांच्या बरोवर युरोप टुर ला गेलो नाही हा भाग वेगळा. पण त्यांनी आयोजल्या कार्यक्रमाला जरुर गेलो, विनामुल्य होता ना. मधेच अशोक नायगावकर यांचा विनोदी कविता वाचनाचा कार्यक्रम सुरु झाला. आधीच कविता म्हटली की माझ्या पोटात गोळा उठतो, त्यात परत विनोदी मग बघायलाच नको. आल्या प्रसंगाला तोंड देयलाच हवे होते. फुकटच्या कार्यक्रमाला जायचे आहे ना. राजाभाऊ, भोगा मग आपल्या कर्माची फळे.

आपल्या भरघोस मिश्यातल्या मिश्यात मिश्किल पणे अशोक नायगावकर यांनी बोलायला सुरवात केली, त्यांनी बोलायला आणि आम्ही अगदी पहिल्या क्षणापासुन, वाक्यापासुन पोट धरुन , खळखळुन हसायला, हसुन हसुन गडबडा लोळायला. ते विनोदी कविता वाचनाच्या मधे कि आधी, दरम्यान, जे काही बोलतात , आणि ज्या पद्धतीने, प्रकारे बोलतात, बस्स, आपला जीव आपल्या ताब्यात रहात नाही, हसा. हसा आणि लोळा, हसा आणि हसता हसता डोळ्यात पाणी आणुन रडा.
मग बोलणे संपल्यानंतर, आता विनोदी कवी म्हटल्यावर विनोदी कविता वाचणे आलेच, पण ती कविता, त्यांच्या बोलण्यापुढे अगदीच मुळमुळीत जणुकाय शेपुची भाजी, आपली जराशीच तोंडी लावायला बरी.

संबध आयुष्यात कोण एवढे हसले नसेल, व हसणार ही नाही, जेवढे अशोक नायगावकरांचे बोलणे ऐकताना हसायला लागते.

आता सांगा, हास्याचा धबाबा, धबाबा, नायगारा बहावणाऱ्या अशोक नायगावकर यांचे नाव अशोक नायगराकर असे का बदलू नये ?

Sunday, July 22, 2007

आम्हनी प्रतिभाताई राष्ट्रपती व्हयनी. अभिनंदन.

अखेर समस्त मराठी माणसाचे स्वप्न पुरे झाले . रायसीना हिलच्या तख्तावर प्रतिभा पाटील यांनी अखेर महाराष्ट्राचा दिग्विजयी झेंडा रोवला.
चला या निमीत्ते तरी आपल्या खेकडा वॄत्तीचा त्याग करुन महाराष्ट्रातील मंडळी एक झाली, गेली कित्येक वर्षे सातत्याने आम्ही हीच भुमिका मांडत होतो. यशवंतरावांच्या वेळी, शरदरावांच्या वेळीच जर सगळे एकत्र झाले असते, तर आज चित्र काही वेगळेच दिसले असते. पण अजुनही वेळ गेलेली नाही. राष्ट्रपती निवडणुकीच्या निमीत्ताने एकत्र आलेले सर्व जण, असचे लोकसभेच्या निवडणुकीमधे एकदिलने, एकमताने राहीले तर पंतप्रधानपदी ही मराठी माणुस बिराजमान झालेला दिसुन येईल. आता एकच लक्ष , दिल्लीचे तख्त, ज्यानी मराठयांना फार हुलकावण्या दिल्या आहेत. मराठा तितुका मिळवावा , अवघा महाराष्ट्र धर्म वाढववा. (अस संपादकीय लेख असायला हरकत नाही )

पण दादा, सदविवेकबुद्धी म्हणजे काय भानगड असते रे ?

अरे बाबा कुठे वाचलस रे हे ? आपल्याला त्याचाशी काय देणघेण आहे काय रे ?

आता याच निवडणुकीत नाही का भाजपाने आवाहन केले होते ?

ऐक तर, आता बघ नेहमी आपण वर्तमानपत्रात वाचतो , एक जण दुसऱ्याला आवाहन करीत असतो की आपण आपल्या सदविवेकबुद्धीला स्मरुन, व पटेल तेच योग्य करा !

अश्या वेळी आवाहन करण्याला अभिप्रित असते तर ते त्या दुसऱ्या माणसाने आवाहन करणाऱ्याचेच ऐकावे, त्याच्याच मतान व मनाप्रमाणे करावे. त्या विरुद्ध कॄती केलीच तर मग ती सदविवेकबुद्धी च्या विरुद्ध असणार असते. विरुद्ध पक्षाच्या लोकांनी, दुसऱ्याच्या उमेदवाराला मत दिले तर ते आपल्या सदविवेकबुद्धीला स्मरुन असते, (त्यात द्रोह, प्रतरणा नसते).

लोच्याच म्हणायचा की. सदविवेकबुद्धी पेक्षा आपला आदेश बरा, जास्त विचार करायला नको.

Friday, July 20, 2007

दैवगती

तीस-पस्तीस वर्षाची नोकरी. स्वंयपाक करायची. परत रहाणेही त्याच घरी. जेवणखाण व पगारही चांगला. यजमानीण परमेश्वरसमान. घरात फक्‍त हेच एकमेव काम. बाई घरातल्याच एक सदस्य झालेल्या. संपुर्ण विश्वास संपादन केलेला. कोणे एके दिवशी मती फिरली. घरात चोरी. दागदागीने, पैसाअडका. शेवट पोलीस केस, कोर्ट कचेरी व तुरुंगवास भोगणे.

गोष्ट येथे संपत नाही.

तुरुंगवासाची मुदत संपली. दैवगती फार न्यारी असते. बाईंना नवी नोकरी मिळाली. स्वंयपाक करायचीच. आणि ती सुद्धा एका मल्टी-नॅशनल कंपनीच्या डायरेक्टरच्या घरी. नोकरी सुरळीत चालली होती.

अचानक.

अचानक वर्तमानपत्रात आलेली जाहिरात आयुष्य बदलून गेली. परदेशात असणाऱ्या एका तरुण जोडप्याला त्यांच्या घरी कामासाठी व स्वंयपाकासाठी बाई हवी होती.

मग परदेश गमन. त्यांच्याबरोबर जग फिरणे.

कधीतरी ही नोकरी संपली.

परत भारतात नोकरी एका प्रतिष्ठित कुटुंबा मधे. त्यांची सर्व मुले परदेशी. भारतात घरी म्हाताऱ्या आईवडिलांसाठी त्यांना कोणीतरी बाई हवी होती.

दिमातीला मोटारगाडी, ड्रायव्हर, आया. कालांतराने आईवडीलांवे, दोघांचेही वार्ध्रव्यामुळे निधन. मुलांनी बाईंना नोकरी सोडुन जाण्यास मनाई केली. त्यांना बंगला रहायला दिला. त्यांच्यासाठी मोटारगाडी, ड्रायव्हर, आयांना ठेवले.
शेवटी ही नोकरी सुटली, बाई परत रस्तावर आल्या.

जोर का झटका लगे धिरेसे

Oh my god. आधीच दुष्काळ त्यात तेरावा महिना । गेल्या महिन्यात या ब्लॉगच्या व्यसनामुळै फ़ोन चे बिल रुपये १८००.०० आले होते , या महिन्यात्त तर कहार झाला । रुपये २३००.०० बिल आले.
कस व्हायच ?

सवय फार वाईट असते.