Monday, September 03, 2007

हे केवळ भगवान कॄष्णच जाणे




गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्हा बाळा. काळ बदलला, आता हा गोविंदा तान्हा बाळांचा खेळ राहिलेला नाही. नटखट माखनचोर कान्ह्या च्या आठवणी केव्हाच पास इतिहास जमा झाल्या आहेत. आता राहीली आहे ती केवळ जीवघेणी स्पर्धा. निव्वळ राजकारण , एकामेकावर कुरघोडी करण्याची प्रवॄत्ती.

आयोजकांनी लाखो रुपयांचे आमिषे, बक्षीसे लावुन दहीहंडी उंचावर, आवाक्याबाहेर लावायची , मग ते हाशील करण्यासाठी व्यावसायीक गोविंदा पथकांनी भले मोठे उंचाले मानवी मनोरे रचायचे, त्या साठी प्रायोजक शोधायचे, मिळवायचे, उंचावरुन खाली पडुन जखमी व्हायचे, प्रसंगी प्राण ही गमवायचे.

अत्यंत वाईट व निंदनीय गोष्ट म्हणजे, सर्वात वरच्या थरात केला जाणारा लहान मुलांचा गैरवापर. का तर ते वजनाने कमी असतात. बऱ्याच वेळा हे मानवी थर रचतारचता, दहीहंडी फोडतांना खाली कोसळतात, सर्वात वरती असणारा दोरखंडाला लोंबकळत रहातो. मग त्याने खाली उडी मारायची व इतरांनी त्याला झेलायचे (?)

कायद्याचेच या जिवघेण्या उंची वर व लहान मुलांच्या उपयोग करण्यावर बंदी आणली का जावु नये ?
मला बऱ्याच वेळी वाटते की प्रस्तरारोहण करताना गिर्यारोहक वापरतात ती बिले पद्धत,दोरी ने वर चढणाऱ्याला सुरक्षीत करणे किंवा सर्वात वरच्या व्यक्तीने स्वतःला मुख्य दोरखंडास हारनेस ने अडकवुन घेणे इ. (belay —v. secure (a rope) by winding it round a peg etc. —n. act of belaying. , harness —n. 1 equipment of straps etc. by which a horse is fastened to a cart etc. and controlled. 2 similar arrangement for fastening a thing to a person's body. ) या वेळी वापरली का जावु नये ? किंवा खाली सर्कसीत असते त्या प्रमाणे जाळी का लावली जावु नये ?
यंदाला किती जण पडुन जखमी होतील , प्राण गमवतील हे केवळ भगवान कॄष्णच जाणे.

No comments: