Saturday, September 08, 2007

मुंबईत हुमुस व पिट्टा ब्रेड व फलाफल

पश्चाताप. घोर पश्चाताप, हाक्का नुडल्स मागवल्याबद्द्ल. मग त्या बदमाश बाईने मी मागवलेल्या हुमुस व पिट्टा ब्रेड वर डल्ला मारला.

नेहरु सेंटर मधे भरलेल्या फर्नीचर च्या प्रदर्शनास सालाबाद प्रमाणे आम्ही हजेरी लावली, नुसतेच नयनसुख, थोडक्यात समाधान, विकत घेण्याची ताकद नाही, मग आपले असे मन रमवायचे. कडकडुन भुक लागली होती, तेथे सॅडविच मागवले. रु.१५. दोन पातळ पावात, एक टॉमेटो व एक काकडीची स्लाइस. अग्नीत तुप, भुक जास्तच प्रज्वलीत झाली. त्वरीत पर्याय म्हणजे जवळचे अटारीया मॉल. फुड कोर्ट मधल्या "नुडल्स बार मधे चल ना, नुडल्स खावु", फर्माइश चॅनल सुरु झाले.

तिच्यासाठी नुड्ल्स घेवुन आलो आणि अचानक नजर लकलकायला लागली, फलकावर फलाफल, शॉरमा (माझ्यासाठी नव्हे), आणि हुमुस व पिट्टा ब्रेड, मग काय राजाभाऊ त्वरीत घ्यायला धावले. दुबईत या पदार्थांची चव चाखली होती. आवडल्यामुळे परत खाण्यासाठी जीव नुसता तडफडत होता. आज अचानक ते समोर आले. हुमुस व पिट्टा ब्रेडची चव तर अप्रतिम होती, उंगकीया चाटत चाटत राहीलो ना मी, पण माझ्या वाट्याला फक्त पहीले तिन घास व शेवटचे दोनच आले, मधले "मी उगाचच नुडल्स मागवले" करत, त्या बदमाश बाईने सर्वच फस्त केले.

गंमत म्हणजे डॉ.भडकमकर मार्गावर, मिनर्वा चित्रपटगॄहाजवळ " फलाफल - व्हेज. हुमुस हाउस " हे चांगल्या दर्जाचे दुकान आले आहे, पण येथे बसुन खाण्यासाठी सोय नाही, ते पदार्थ घरपोच करतात. दुरभाश - २३०१ ८००० - सकाळी ११ ते रात्री ११.
पण काहीना काही कारणाने मागवायचे राहुनच जायचे. आता मागवीन,
दुबईस हे खाण्यासाठी जाण्याची गरज उरलेली नाही.
हे पदार्थ जरुर खा व खाल्या नंतर मला कळावा. आता प्रर्यंत आपण चायनीज, मेक्सीकन, अमेरीकन, आदी , अनेक खाद्यपदार्थांना आश्रय दिला, आता पाळी आहे ते लेबर्नन च्या खाद्यपदार्थांची.
FALAFEL ‘S VEG HUMMUS HOUSE at Grant Road and Kemps Corner.

MENU –

ORIGINAL FALAFEL, PITA WITH HUMMUS, HUMMUS WITH TEHINA, HUMMUS WITH HOT CHICKPEAS, CHICKPEAS SALAD, VEG.SALAD, PITA, ZARAR PITA, SESAME PITA BAIGEL, MALABI, BAVARYA

No comments: