Saturday, September 01, 2007

नाखोदा मोहल्ला.

मंगलदास मार्केट, हिंदमाता मार्केट व त्यानंतर मुसाफिरखाना. केवळ या तीन मंडया आम्हाला महिलांसाठी स्वस्तातही वर मस्तपैकी कपडे मिळण्याच्या जागा म्हणुन चांगल्याच आतुनबाहेरुन ठावुक होत्या. मंगलदास मार्केटमधुन गेल्याच आठवडयामधे आमच्या अर्धांगनींनी चौथाई वसुल केली होती. गौरीगणपतीसाठी चांगले ड्रेसच नाहीत म्हणे. होत अस कधी कधी.

काल रात्री आम्ही अकस्मात एका नविन जागेचा शोध लावला. घरासाठी पडदे घेण्याचे निमित्य. आता पर्यंत हजारो वेळा या रस्तावरुन आम्ही गेलो असु, पण हे असे काही येथे आहे , असु शकते हे कधी कळलेच नाही. वास्तविक पहाता आम्हा दोघांनाही तसे गल्ली कुचेंची भ्रमंती करायची आवड. या विभागात आत शिरायचे कसे काय राहुन गेले अल्ला जाने.

नाखोदा मोहल्ला कहां है? किधर है ? करत महंमद अली रस्तावर प्रवेश केला आणि हे काय ? हा तर मिनारा मस्जीद समोरच, वर्षोनुवर्षे आपण येथील सुलेमान उस्मान मिठाईवाल्या कडे रमदान च्या पवित्र महीन्यात रोजे सोडण्यासाठी येतो,और कंब्बत तुमने कभी नजर उठाके सामने देखाही नही! चलो अच्छाही हुवा. इतने साल, पैसा जो बच गया.

गल्लीत शिरलो आणि समोर एक पेक्षा एक सरस अश्या कपडयांचे भांडार खुलले गेले. आत आत अशी येथे खुप म्हणजे खुपच कपडयाची दुकाने आहेत, बघुन च्रक्रवायला होते. हा मोहल्ला मुस्लीम विभागात असल्यामुळे साहजीकच मुसलमान संस्कॄतीचा प्रभाव या सलवार खमीझ इ. साठी असलेल्या कपडयावर असणे स्वाभाविकच आहे.

बरेचसे सुप्रसिद्ध ड्रेस डिजायनर येथे कपडे खरेदी करण्यासाठी येतात. ( मग त्यातुन जे निर्माण होते ते परिधान करण्याची आपल्यापाशी धाडस, मानसीक तयारी व खरेदी करण्यासाठी आपला खिसा ही तयार असायला हवा )

रात्र तशी तरुणच होती, तरी देखील, खिसापाकीटाचा खय़ाल करत पुढच्या वेळी खरेदीस येथे नक्की येवु या वायदयावर काढता पाय घेतला.

नाखोदा मोहल्ला. किस्मत मे होगा तो फिर मिलेंगे. बचेंगे तो और खरीदेंगे.

1 comment:

Anonymous said...

जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे .
असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .
की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .
एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर