Saturday, September 08, 2007

आनंद मना, आज आनंद मना ।

आनंद मना, आज आनंद मना । आमची लाडली, My Little Princess, पुतणी, संपदा, मंगळवारी रात्री दुबईतील वास्तव्य संपुन घरी परतणार. धा क धा नी धीन. वेध तर काल पासुनच लागले आहेत, केव्हा एकदा "काका" हे जादुई शब्द कानी पडताहेत असे झाले आहे. हे वाट पहाणे फार जीवघेणे असते नाही का !


काकी, शेंगुची भाजी , वरण भात बनवुन ठेव, लेकीची फर्माईश आत्ताच दुरभाष वरुन झाली.

"पण काकी मला आत्ता म्हणजे आत्ताच्या आत्ता पाहीजे.
हो हो धीर आहे का नाही ? व्हायला पाहीजे का नको ? - काकी.
पण तु मला का प्रॉमिस केलस, मला आता माहीत नाही, मला आत्ता म्हणजे आत्ता वरण भात हवे."
एकदा पहाटे तीन वाजता ती घरी आली, पहाटे काकीच्या शेंडेफळाने वरणभात करायला लावले मग ते खावुन ती झोपली. काकीनी नुसते लाडावुन ठेवले आहे.

संपु ग कधी येणार तु ?

आनंद मना, आज आनंद मना । मोरा जो पिया घर आया ॥
चहु दिस सब चमकत । रतियां खिल गयो बगिया ॥
छब तेरी छ्ब तेरी, ऑंखन मे ऑंखन मे । तरसायो मन निसदिन निसदिन ॥
इतै उतै तू री तू री , भर जो गयी दसौं दिस । तरसायो मन निसदिन निसदिन ॥
- राग मालकौंस - कुमार गंधर्व.

No comments: