Monday, September 10, 2007

प्रिय बब्बनसिंग यासी


प्रिय बब्बनसिंग यासी,

पामराचा सप्रेम नमस्कार स्विकारावा ,

आपण "आग" चा प्रीमियर बघताबघता अचानक मधेच अस्वस्थ होवुन उठून गेल्यास कळले. आपलीच भुमीका म्हणे आपल्यालाच रुचली नाही,आवडली नाही, पसंत पडली नाही,आपण रंगवलेला हा खलनायक म्हणे आपल्यालाच भावला नाही, पटला नाही, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बघवला नाही. काही नतद्रश्त आता म्हणतील की आपण काय चित्रपटाचे काम चालु असतांना झोपलो होतात की का ? तेव्हाच ते काम सोडुन का नाही दिलेत ? लोक काय दोन्ही तोडांने बोलतात .

.टा. मधे हे आपले असे निघुन जाणे वाचुन फार वाईट वाटले. आपणच जर का अश्या रीतीने चित्रपटाकडॆ पाठ फिरवलीत तर आम्ही पामरांनी करायचे तरी काय ? आम्ही बघा कधी तरी आपल्या भुमिंकाकडे पाठ फिरवली आहे का? पडद्यावर आपण "यंग अंग्री मॅन " च्या भुमिकातुन बाहेर पडल्यावर इतर जे काही खेळ दाखवत होतात, ते आम्ही मुकाट्याने सहन केले ना ? समजुन घेतले ना ? आवडुन घेतले ना ? पाहिले ना ? कधी तरी चुकुन सुद्दा काही बोललो का की नका हो नका असे काय करुत ! एकदा तरी तक्रार केली का ? आवडो न आवडो तिन तास चित्रपटगृहात बसुन आपले चित्रपट पाहीले ना ? मग झाले तर !

या वर्तमानपत्रांचे आपण काय ऐकतात ? दुर्लक्ष करा. आम्ही आपल्याच बरोबर आहोत. आपण पडद्यावर असेच नित्यनेमाने आम्हाला दर्शन देत जावे ही विनंती.

कळावे लोभ असावा,

आपला नम्र,

राजाभाऊ.

No comments: