"अहाहा" हे उद्दगार आहेत "वैशाली"त मसाला डोसाचा सकाळी पहिला घास घेतल्या नंतर. एक वेळ जगबुडी होईल पण पुण्याला गेल्या नंतर वैशालीत न जाणे ? ह्या, त्रिवार शक्य नाही.
मग बाहेर पडल्यावर समोर आली ती मनभावन, लुभावणारी, फुलांनी बहरलेली, सजधजके तयार असलेली ऑटो रिक्श्या. रस्तातुन जातांना आधी लोक तिच्या कडे कौतुकाने , विस्मयाने बघत, मग आत बसलेल्या आम्हा उभयांताकडे. जणु काय आज परत आमच्या लग्नाचीच वरात निघाली होती. राजाभाऊ की बारात.

"अहाहा" हे उद्दगार आहेत रात्री माटुंगा मधील इडली हाउस मधे " कांचीपुरम इडलीचा, मुधो इडलीचा, काकडी इडलीचा पहीला घास घेतल्या नंतर.
अश्या रीतीने आजचा चांगला दिवस संपला. परत उद्या पासुन रहाट गाडगे चालु.
2 comments:
kharach he sagale khane mahanje to divas sukhacha mhatala pahije
vaidehi,
yes. It was after very very long time , we husband and wife spent whole day together, no son, no parents, only two of us
Post a Comment