Wednesday, September 05, 2007

सिल्कच्या खास उत्पादनाचे, साडयांचे, ड्रेस मटेरीयलचे,सर्वोत्तम प्रदर्शन

राजाभाऊ, तुमचे काही खरे नाही. गडवाल, पोचमपल्ली, मुंगा सिल्क, टसर, कांथा, आदिवासी कलाकुसर, कोसा सिल्क, गाठझोरा, पटोला, पानेतर, चिंतामणी, कसुरी वर्क, चंदेरी , महेश्वरी, पैठणी, बोमकाई, संबळपुरी, बंधेज, कांजीव्रम, तनछोई, जामदानी, जामावार, बालुचारी, तांगाईल, काय काय म्हणुन घ्याल ? पुढे काही बोलुच नका. तुम्हाला कुठुन दुर्बुद्धी सुचली आणि आपल्या बायकोला या प्रदर्शना बद्द्ल सांगितलेत ? भोगा आता आपल्या कर्माची फळे. जीवाला घोर आणि खिश्याला चाट. तुम्ही आणि तुमचे मोठले तोंड. आवरा कधी तरी आवरा.
त्यात परत घरातच लग्नकार्य, एक तरी चांगली साडी नको काय ? लोक काय म्हणतील ?

प्रदर्शनात पहिली फेरी मारुन झालेली आहे, सर्व काही न्याहाळुन , मनाशी आराखडे, खुणगाठ बाळगुन झालेले आहे, काय काय व किती पर्यंत खरेदी करायचे ते सर्व काही जवळजवळ ठरलेच आहे.

सिल्कच्या खास उत्पादनाचे, साडयांचे, ड्रेस मटेरीयलचे, "सिल्क फॅब " हे सर्वोत्तम प्रदर्शन जागतीक व्यापार केंद्र, कफ परेड, मुंबईत सद्या भरले आहे. याचे प्रायोजक आहेत विकास आयुक्त , हातमाग, व राष्ट्रीय हातमाग विकास महामंडळ, भारत सरकार.
सबंध देशातुन येथे कारागीर आपली कला समर्पण करण्यासाठी आलेले आहेत, तेव्हा देर किस बात की ? शुभच्छ शिघ्रम.
पैसा खतम होने के बाद मे जो होना है देखा जायेगा. गॄहस्वामीनी खुश तर घर खुश.

No comments: