Showing posts with label FOOO. Show all posts
Showing posts with label FOOO. Show all posts

Wednesday, December 15, 2021

विनय हेल्थ होम

 माणसाने कधी ही खोटे बोलु नये.

माणसाने कधीही कोणी फेसबुकवर मिसळ बद्द्ल लिहिले तर ती लगेचच खायला जावुन नये.

बरं मिसळ खायला गेलाच आहे तर मिसळ खावुन मुकाट्‍याने बाहेर पडावे.

राजाभाऊ भल्यापहाटे मिसळ खायला "विनय" मधे गेले खरे पण चुकुन उसळपाव खावुन बाहेर पडले.

मग  उदार होत घरी दुरध्वनी केला. "सकाळी आत खायला काही करु नकोस, "विनय" मधुन काय आणु ? " 

"आम्हाला मिसळ आण, तुला काय पाहिजे ते आण, तु काही खाल्लेस का "

राजाभाऊ  "नाही " म्हणुन गेले.

मग काय, घरी गेल्यावर भरल्या पोटी परत मिसळ.