आज पुण्याहुन परततांना राजाभाऊंनी ठरवलं, लोणावळ्याची मॅड रश टाळण्यासाठी लवकर निघायचे व चुकुन सुद्धा खाली लोणावळ्याला उतरायचे नाही. सुसाट सुटायचे व कुठेही न थांबता सरळ बेलापुरला जेवायला थांबायचे.
"दाने दाने पर लिखा है खानेवाले का नाम", कुणाच्या नशिबी कोणते व कुठले खाणे असेल हे सांगता येणे कठीण आहे.
निघायला उशीर झाला. जेवणाच्या वेळीस ते लोणावळ्यात पोचले. नाईलाजाने त्यांनी खाली उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांना वाटले नांगरगावला कोण कशाला कडमडायला ये ईल ? पण त्यांची समजुत चुकीची ठरली, नांगरगावला पण वहातुककोंडी होतीच. पण जरासीच.
मग ते "माणेकलाल सॅनिटोरीयम" मधे जेवायला गेले. त्यांच्या आवडीचे हे एक ठिकाण. येथे गुजराती जेवण उत्कृष्ट, चविष्ट असते. रविवारी बुफे लागतो.
No comments:
Post a Comment