Sunday, March 02, 2008

आई

आई माझी, खुप क्रिटीकल अवस्थेत हॉस्पीट्ल मधे आहे. काल सकाळ पर्यंत जगण्याचे चान्सीस खुपच कमी होते, डॉक्टर म्हणायले आहेत जसजसा ती वेळ काढेल तसतसा आम्हाला उपचार करायला मिळेल व जगण्याची शक्यता वाढत जाईल. तिच्रे सफरींग बघवत नाहीत. एकातुन एक त्यातुन दुसरे असे नवे नवे कॉप्लीकेशन्स उदभवत चालले आहेत.

काल सकाळपर्यंत तिची मॄत्युची झुंझ हरणाऱ्या अवस्थेत होती. दळवी नामक एका हॉरीबल हॉस्पीटलात, आमचे डॉक्टर अटॅच असल्यामुळे उपचार सुरु होते, काल सकाळी तीला सैफीत हलवले, तिथे तिच्या वर उत्तम दर्ज्याचे उपचार लगेचच सुरु झाले आहेत. आधीच तिला सैफीत नेले असते तर ही परीस्थीती उदभवली नसती , पण आत या जर तर ला काहीच अर्थ उरला नाहीय. परवा दुपार पासुन ती अचानक सींक होत गेली.

निम्मीत्त झाले तीन वर्षापुर्वी दुबईला गेली असता ती बाथरुम मधे उभ्याउभ्या खाली बसली व हिप जॉईंट फ्रेक्चर झाले, तेथे उपचार परबडणे शक्य नसल्यामुळे तश्या अवस्थेत मुंबईला आणले, शस्त्रक्रीया व्यवस्थीत झाली. पण दैवाला ते मान्य नसावे, दोन वर्षापुर्वी त्याजागी शरीरात फॉरेन बॉडी असल्यामुळे इंन्फेशन झाले, परत मेजर ऑपरेशन करुन तो भाग काढुन टाकायला लागला. मग दोन तिन महीने वजन लावुने झोपुन काढले. ते ही दिवस तीने सहन केले.

दुर्दैवाने जानेवारीमधे तिला असह्य खोकला सुरु झाला होता, म्हणुन तपासायला परत दळवी हॉस्पीटल मधे दाखल केले, तिच्या नशीबी दुःखच होते, परत त्याच जागी इंन्फेक्शन झाल्याचे डॉक्टरांना आढळले, परत शस्त्रक्रीया, तीन आठवडॆ रुग्णालयात. मग हेवी ऍंटी बायोक्टीक्सचे डोसेस, इंजेशन्स, खुप त्रासुन गेली, तरी ती सर्व सहन करत होती.

गेल्या आठवडयात परत खोकला सुरु झाला, जेवण जाईना, ड्रेसींग करायला व ऑब्जरवेशन एक दिवस रुग्णालयात दाखल काय करतो आणी परीस्थीती वाईट वळण काय घेते.

त्यात परत भरीस भर म्हणुन मुलाची बारावीची परीक्षा सुरु आहे.

9 comments:

Tulip said...

हरेकृष्णजी खरंच किती तणावाच्या मनस्थितीतून जात आहात तुम्ही! तुमच्या आईंना जे सहन करायला लागतय त्याबद्दल खूप वाईट वाटतय पण त्या नक्की ह्या आजारपणातून बाहेर पडून पुन्हा निरोगी दीर्घायुष्य जगतील ह्यावर विश्वास ठेवा. योग्य वैद्यकीय मदत आणि देवावर हवाला इतकच करणं आपल्या हातात असतं आणि ते तुम्ही करत आहातच. तुमच्या आईंच्या स्पिडी रिकव्हरी साठी माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. त्यांची तब्येत सुधारली की जरुर लिहा त्याबद्दल इथे.

तुमच्या मुलाचे पेपर्स कसे गेलेत? सायन्स करतोय कां तो? नुकतीच सुरु झालीय परीक्षा आय थिन्क तेव्हा आत्तापर्यन्त फ़क्त लॆन्ग्वेजेसचेच झाले असतील नां? उरलेल्या पेपर्स साठी त्याला सुद्धा शुभेच्छा!

निनाद said...

आपण खरंच कठीण परिस्थितीतून् जात आहात, पण धीर व देवाची प्रार्थना या दोन आधारांवर आपली परिस्थिती बदलेल, आमच्या सदिच्छा आपल्या पाठीशी आहेतच...

HAREKRISHNAJI said...

टुलिप्स, निनाद.

धन्यवाद.

a Sane man said...

aaplya aainchya prakruti swasthyasaThi manapasun shubhechchha aaNi aaplya mulala 12 vi chya parikshesaThi shubhechchha.

A woman from India said...

फारच कठिण प्रसंगातुन जात आहात तुम्ही. तुमच्या आईंची प्रकृती लवकर बरी होईल ही सदिच्छा. तसेच तुमच्या मुलालाही या प्रसंगातुन सावरत परिक्षेत यशस्वी होण्यासाठी हार्दिक शुभकामना. घरात असं काही घडत असताना कर्त्या बाईवर फारच ताण पडतो, त्यामुळे आपल्या पत्नींला या प्रसंगातुन जाण्यासाठी बळ मिळेल अशी आशा.

संवादिनी said...

आपण काय म्हणता ते मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. माझ्या आजीच्या आजारपणाच्या वेळी. त्यामुळे कोणतेही दिलासादायक शब्द लिहिणार नाही. फक्त तुम्हाला आणि तुमच्या मुलाला ऑल द बेस्ट!

श्रद्धा कोतवाल said...

हरेकृष्णाजी,

आजच वाचलं हे पोस्ट. सध्या खूपच कठीण परिस्थितीतून जात आहात तुम्ही.
सगळं काही लौकर ठीक होऊ दे. सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत.

Sneha said...

aapan kathin prasangaatun jaat aahat ... pan mala vatat apan avadhach lakshat thevav...ki dev je kaahii aapalya samor vadhun thevato...tyalaa samore jayachi takad aapalyat aahe he tyala mahit asat aani mhanunach to te apalyala deto... tyalaa ana malaa mahit aahe yaa sagalyatun tumhi sukhrup baher padal aani lavakarat lavakar sagal chaan hoil.... majhya shubhechya aahet

नीरजा पटवर्धन said...

harekrishnaji,
3-4 mahinyanpurvi ya sagalyatun geley ani apala sagalyat javalacha manus haravun basaley. tyamule mahitiye ki ya thikani keval sahan karanyachi takadach garajechi asate. apali ani patient chi suddha.
tumhala sagalyatun nibhavun jayala dev purepur takad devo evadhach mhanu shakate.
ALL THE BEST!!