बायको नुसती कावुन राहलीय. तु एक एक नविन खुळ काढत असतोस, आणि मग एकदा का ते डोक्यात भरल की मग बास तेच तुझ सुरु रहात. चहा प्यायचा नाही, पनीर खायचे नाही , चीज, मस्का नको मग खायचे तरी काय ?
मासांहार बंद करुन शुद्ध (????) शाकाहार सुरु करणे फारच सोपे होते, चिकन , मटण, मासे, अंडी खाणॆ बंद केले , झालात तुम्ही शाकाहारी. पण व्हिगन बनणे जरासे जड जात आहे.
स्थळ एक उपहारगृह, बहुतेक पदार्थात पनीर, मस्का, क्रिम, चीज बघुन मी नाकारलेले. शेवटी चना व तेलकट भतुरा वर ( जो मला तब्बेत्तीमुळे खायचाच नाही ) तडजोड केलेली. मग त्यात कहर म्हणाजे सर्व पदार्थ मागवुन झाल्या नंतर तो विचारता झाला "आप लोग जैन है क्या ?" म्हणजे थोडक्यात तुम्हाला कांदा लसण व्यर्ज तर नाही ना ? , त्याला बोललो "भाईसाब जैन नही व्हिगन है !" ह्या ह्या ह्या तो हसायला लागला, त्याला वाटले मी विनोद केला. त्यात त्याची काहीच चुक नाही. ( मग मी त्याला भले व्हिगन म्हणजे काय या वर भले मोठाले लेक्चर दिले व त्याला लेक्चर दिले म्हणुन मुलाने मला, हा भाग वेगळा) ही गलती भले भले करतात. मटा पण त्यातुन सुटले नसावे.
आजच म.टा. मधे बातमी आहे. "शाकाहारातून आथ्रायटिस टाळा , सांधेदुखीचे रुग्ण शाकाहाराचे सेवन करुन अर्धांगवायू किंवा हॄदयविकाराचा झटका येण्याची शक्यता टाळू शकतात असे या संशोधनातून निदर्शनास आले आहे "
पण हीच बातमी चारपास दिवसापुर्वी एका आंग्लभाषीय वर्तमानपत्रात ही आली आहे व त्यात त्यांनी व्हिगन आहारपद्धतीचा स्पष्ट्पणॆ उल्लेख केला आहे. व त्यात व्हिगन म्हणजे काय हे ही सुस्पष्टपणे लिहीले आहे. व या आहारपद्धतीमुळे वर दिलेले रोग टाळता येतात हे म्हटले आहे.
माझ्या मते म.टा. ने शाकाहारी व व्हिगन मधे गफलत केली आहे. पण त्यांचा मांसाहार बंद करा हा निष्कर्ष मात्र अगदी योग्य आहे.
3 comments:
तुम्ही व्हिगन व्हायचा प्रयत्नं करताय त्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
दुध नं टाकता चहा पिता येईल, पत्ती अगदी कमी टाकुन.
भतुरा तेलकट असला तरी पनीर, मस्का,क्रिम चीज खाण्यापेक्षा नक्कीच बरा.
भारतिय रेस्टॉरेंटमधे व्हिगन पदार्थ बनवणे काहीच कठीण नाही. जमल्यास रेस्टॉरेंटला आधीच फोन करून मी "दुधाचे पदार्थ खात नाही, तुम्ही माझ्यासाठी काय बनवु शकता?" असे विचारता येईल. असे केल्यानी त्यांनाही जरा रिएक्ट करायला वेळ मिळतो. इथे एलर्जी हा प्रकार सगळ्यांना माहित आहे. मी बरेचदा दुधाची एलर्जी आहे असे सांगते म्हणजे ते जरा जास्तं काळजीपूर्वक पदार्थ बनवतात.
व्हिगन पासपोर्ट नावाचे एक छोटेसे पुस्तक मिळते.त्यात सर्व प्रमुख भाषेत व्हिगन म्हणजे काय व त्या त्या प्रांतातले/देशातले कुठले पदार्थ चालतात, कुठले चालत नाहीत अशी उपयुक्त माहिती असते. रेस्टॉरेंट्समधे जाताना व्हिगन पासपोर्ट नेणे खूप सोयीचे पडते, जास्त बोलायची गरज पडत नाही.
सरळ त्या भाषेतले पान काढुन दाखवायचे.
आर्थराईटिसचा संबंध मांसापेक्षा दुग्धजन्यपदार्थांच्या सेवनाशी अधिक आहे असे बर्याचशा संशोधनात दिसुन आले आहे.
सुरवातीला प्रयोग करताना थोडा फार त्रास होतो. व्हिगन झाल्यावर तब्येतीत सुधारणा होते हा बहुतेकांचा अनुभव आहे.
कार्यालयात दिवसांतुन दहा वेळा चहा पिण्याची सवय झाली होती त्या मुळे मधेच चहाची तल्लफ जाणवते एवढ्च. पण आपण म्हटल्या प्रमाणॆ टी बॅग नी काळा चहा बनवुन पितो, अनायसे साखर खाणे ही कमी झाले. परत पीच टी, लेमन टी वगैरे पर्याय आहेतच. भारतात मी संकल्पना नवीनच आहे. मुंबईतही एक व्हिगन क्लब आहे त्याची माहीती TOI मधे आली होती, त्याची लिंक मी आपल्याला पाठवली होती, आपण तो लेख वाचलात का ?
तो लेख वाचला होता. छान होता.
Post a Comment