Saturday, March 15, 2008

मदत

काल रात्री ९.३० वाजता सैफीच्या बाहेर टॅक्सीतुन उतरलो. बाहेर एक कुटुंब उभे होते. नवरा, बायको व मुलगा. दोघे जण पंचविस-तीस मधले वाटत होते, मुलगाही ५-६ वर्षाचा दिसत होता. चांगले डिसेंट कुटंब. त्याने सफारी परीधान केला होता. उतरता उतरता माझ्या काना जवळ तो काही तरी पुटपुटल, पुढे हात पसरवत.

मी माझ्याच विवंचनेत होतो, लक्ष न देता पुढे निघुन गेलो, पण एका झटक्यात मनाला कुठे तरी काहीतरी जाणवले ,म्हटले असु शकतात ते संकटात. गेट जवळ उभ्या असलेल्या वॉचमन ला सांगीतले, बाबारे हे काय प्रकरण आहे बघ, माणसे तर भली चांगली दिसताहेत, मग अशी रस्तात हात का बर पसरुन उभी आहेत ?

त्यांना जवळ बोलावले, यवतमाळ वरुन मुंबईला नोकरीच्या शोधात आम्ही आलो आहोत, पाहुणे काही भेटले नाही, जवळचे पैसे सारे संपले, परत जायला पैसे नाहीत, काम कुठे मिळात नाही. दुसरा काहीच मार्ग नाही. त्याच्या बोलण्यातील खरे पणा कुठे तरी जाणवला, शंभर रुपये काढुन त्यांच्या हातात दिले.

मागे एकदा असेच मी एका कुटुंबानी मंत्रालयाजवळ माझ्या कडे पैसे मागीतले होते, तेव्हा ही मी दिले होते.

माझ्या एका पोलीसातील मित्राला हा प्रसंग सांगीतला तेव्हा त्यानी मला वेडयात काढले, फसलास तु.

असेना का फसलो, कदाचीत ते खरच अडचणीत असतील तर ? खर काय नी खोटे काय ? आणि जावुन जावुन कितीसे पैसे गेले ?

आणि ते जर खरोखरीच अडचणीत असतील तर मात्र या पेक्षा जास्त मदत मी त्यांना न करु शकत असल्याची माझी अगतीकता मला जास्तच छळत राहिलीय.

7 comments:

Raj said...

आपली उदारता उल्लेखनीय आहे. बरेच लोक इतका विचार करत नाहीत.

HAREKRISHNAJI said...

राज,
बऱ्याच वेळा मला गॉड्फादर कादंबरीतले एक वाक्य आठवते, गॉडफादर म्हणतात,”जर का मी खरच ऐवढा शक्तीमान असतो तर परमेश्वरापेक्षा दयाळु झालो असतो ’

Kamini Phadnis Kembhavi said...

कदाचीत ते खरच अडचणीत असतील तर ? खर काय नी खोटे काय ? आणि जावुन जावुन कितीसे पैसे गेले ?
आणि ते जर खरोखरीच अडचणीत असतील तर मात्र या पेक्षा जास्त मदत मी त्यांना न करु शकत असल्याची माझी अगतीकता मला जास्तच छळत राहिलीय.>>>असा विचार किती लोक करतात आजकाल.

एकदा अशीच वेळ माझ्यावरही आली होती डोंबिवलीहून भायखळ्याला जाताना बॅगमधली पर्सच उड्वली वरच्यावर. पैसे, क्रेडीट कार्ड,तिकीट :( सगळच गेलं. सुदैवानी तेवढ्यात नवरापण पोचला तिथे म्हणून या संकटातून सूटका झाली.

तर तेंव्हापासून असं कोणी भेटलं तर मीपण त्या वेळेला जी मदत करण मला शक्य असतं ते करतेच. लोक वेड्यात काढतात. असो.

HAREKRISHNAJI said...

श्यामली.

पण एकदा भायकाळ्याला एकाला मी खुप मदत केली , त्याला रस्तात आकडी आली, रस्तात तो धाडकन पडलाम तोंडात फेस आला, शुद्धीवर आल्यावर त्याने केस पेपर वगैरे दाखवुन पैसे मागीतले, मी दिले पण, पण त्याला राहुन राहुन सांगत होतो, जवळच्या पोलीस स्टेशन वर चल, मी तेथुन तुला माझ्या ओळखीने नायर मधे दाखल करतो, पण तो नकार देत राहीला.

त्यांचा का नक्कीच बनाब होता असे नंतर राहुन राहुन वाटत राहीलय.

HAREKRISHNAJI said...

श्यामली.

आपला बॉग फक्त आमंत्रीतांसाठीच आहे का ?

Vaishali Hinge said...

माझ्यावर अशि परिस्थीती आली होती माझ्या कमिशनर ओफ़्फ़िसचे ट्रेनिंग आटोपुन मी संगम्नेर ला बस्श्तंड वर नगरला जाण्यासाठी थांबले होते. मी magazine घेतले तेवहा माझी पर्स मारली गेली. बस मध्ये चढले तेव्हा लक्षात आले. मग बस कंडकट्ररला आयकार्ड दाखव्ले. त्याने उदार मनाने तिकिट काढुन दिले .

Kamini Phadnis Kembhavi said...

आपला बॉग फक्त आमंत्रीतांसाठीच आहे का ?>>>
नाही काही दिवस बंदच होता.