Thursday, March 20, 2008

सारे तुझ्यात आहे.




आभास चांदण्याचा या लाजण्यात आहे ।
जे जे मला हवेसे सारे तुझ्यात आहे ॥
बॉग व मायबोलीवर कविता लिहीणाऱ्या, सदैव हसतमुख सौ. जयश्री कुलकर्णी अंबासकर यांनी लिहीलेल्या अप्रतीम प्रणयगीतांच्या सी.डी. प्रकाशनाचा एक देखणा सोहाळा आज मुंबईत पार पडला.

ग्रेट, जयश्री, हार्दिक अभिनंदन, ही तर केवळ सुरवात आहे. भविष्य उज्जल आहे.

http://maajhime.blogspot.com/
ही सुमधुर गीते गायली आहेत देवकी पंडीत, वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांनी व स्वरबद्ध केली आहेत अभिजीत राणॆ या अतिशय गुणी तरुण संगीतकाराने.

4 comments:

Kamini Phadnis Kembhavi said...

तत्काल फोटोंबद्दल धन्यवाद हरेकृष्णाजी :)
हजर न राहू शकल्याचा सल कमि झाला जरासा

HAREKRISHNAJI said...

मायबोलीवर याचे सविस्तर वॄतांत दुसऱ्या कोणीतरी टाकले आहे. दॄष्ट लागावा असा हा सोहळा झाला. माझी व जयश्रीची ओळख केवळ बॉगवरचीच. एका बॉगरच्या आनंदात सामील व्हायला मला खुप आवडले.

जयश्री said...

हरेकृष्णजी........ तुमचे आभार कसे मानावेत हेच कळत नाहीये. तुम्ही अगदी आवर्जून कार्यक्रमाला आलात....खूप छान वाटलं. त्या दिवशी गडबडीत फ़ारसं बोलताही आलं नाही.

तुमच्या ब्लॉगवर फ़ोटॊ टाकलेत....इतकं मनापासून कौतुक केलंत.... तहे दिल से शुक्रिया!

माझ्या आनंदात इतके मनापासून सहभागी झालात.... एका अतिशय निर्मळ मनाच्या मनाच्या व्यक्तीला भेटल्याचं समाधान मिळालं. पुन्हा एकदा आभार. सीडी ऐकल्यावर त्याबद्दल पण जरुर कळवा.

HAREKRISHNAJI said...

जयश्री ,

खुप मजा आली सोहळ्यात.