Monday, March 03, 2008

आय सी यु

आपण म्हणतो , परमेश्वर दयाळु असतो, पण त्याचा हा कनवाळुपणा जेव्हा हवा असतो तेव्हा तो तेव्हा तो आखडुन बसतो, जर त्याला एखादी गोष्ट करायचीच असली तर त्याने ती तत्काळ करावी, तडफड, तडफड करत करवुन घेवु नये, किती त्याने हाल करावेत काय मर्यादा आहे की नाही ?
हे सर्व असे मागे लागणॆ सुरु झाले आठ-दहा वर्षापुर्वी, ऍकुट पॅन्क्रियाटीस चा तिला जबरदस्त ऍटक आला होता, जवळ जवळ महीना भर आय सी यु त मग तेवढेच दिवस वॉडात, बरी येवुन घरी येते काय व आल्या आल्या बाथरुम मधे जाते काय व खाली पडते काय ? पाठीचे मणाके फॅक्चर, सहा महीने बिछान्यात आहे त्याच स्थितीत पडुन रहाणॆ. त्यातुन ही ती बरी झाली.
मग कांदीवली रेल्वे स्थानकात ती एका बाजुला उभी असता एकानी तिच्या हातातली पर्स खेचुन घेण्यासाठी तिला जोरात ढकलले व पळुन गेला. उजव्या बाजुचे फॅक्चर,, मग शस्त्रक्रीया, परत बिछाना,
मग दुबईत डाव्या बाजुला फॅक्चर, मध्यतंरी परत घरी पडली, उजव्या हाताची बोटे फॅक्चर. औस्टोपोरायसीस्चे हे प्रताप,
पाठी लागलेली साडॆसाती या वळणावर घेवुन आली आहे.

3 comments:

मन कस्तुरी रे.. said...

हरेक्रिश्नाजी,
आमच्या सर्वांच्या सदिच्छा तुमच्याबरोबर आहेत. संगीताने म्हटलं आहे तसं, तुमच्या पत्नीलाही मानसिक बळाची गरज आहे.
या अपरिहार्य आणि कठीण प्रसंगातून निभावून जाण्यासाठी आणि तुमच्या छोकर्‍याच्या परीक्षेसाठी आम्हा ब्लॉगमित्रांच्या सगळ्या सदिच्छा!

अश्विनी.

Raj said...

हरेकृष्णजी,

तुम्ही कुठल्या परिस्थितीत आहात हे मला माहित आहे कारण मीही याच परिस्थितीतून गेलो आहे. अशा वेळी कुठलेही शब्द पुरेसे नसतात. फक्त धीर सोडू नका इतकेच सांगावेसे वाटते.

Mints! said...

Harekrishnaji, amachya sadichchhaa tumachyaabarobar aahet. aainchi tabyet lavakar vyavastheet hovo heech devakade prarthana. tumhaa ubhayataanaa yaatun nibhavun jaanyache bal milo.

tumachya mulala manaseek taan asel parikshemadhe. tyaala asankhya shubhecchaa.