बरेचसे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम विनामुल्य असतात. बऱ्याचदा चांगल्या कार्यक्रमाची एक पुर्वाअट असते. विनामुल्य निमंत्रणपत्रिके विना (फ्री पासाशिवाय) प्रवेश नाही. त्याचे फ्री पासेस चे वितरण काही दिवस आधी सभागॄहात केले जाते. अर्धेअधिक पासेस संयोजकानी स्वःता वाटण्यासाठी ठेवलेले असतात.
विनामुल्य पासेस म्हटल्यावर बऱ्याच व्यक्ती अनेक पासेस घेवुन जातात. जास्तीचे असलेले बरे. ऐन वेळी कोणी मागितले तर? या शुद्ध (?) हेतुने. तसेच अनेक वेळा संयोजकांकडेही ते पासेस तसेच पडुन रहातात.
फुकटचे पासेस घेवुन गेलेली माणसे कार्यक्रमाला येतातच असे नाही. परीणामी कैक वेळी सभागॄह अर्धेअधीक रिकामे असते, सर्व पासेस संपलेले असुन सुद्धा. दुसरी बाब म्हणजे या पासेसचे वितरण ज्या वेळेत केले आते तेव्हा आपण कार्यालयात असतो. पासेस आणायला जाणे जमत नाही.
ह्या पेक्षा सभागॄहात कार्यक्रमाच्या वेळेस रसिकांना रांगेने, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वानुसार शिस्तीने प्रवेश करु द्यावा. पासेस छापणे, वाटणे व ते आणणे याचे श्रम व पैसा दोन्ही वाचतील.
किंवा निमंत्रणपत्रिकेचे नाममात्र शुल्क आकारावे, जेणे करुन फुकट्यांना आळा बसेल.
No comments:
Post a Comment