उस्ताद शमीम अहमद खान यांचे सतार वादन व तबला संगत पंडीत नयन घोष. दुग्ध शर्करा योग चुकवुन कसे चालेल ? पुण्याला जायला काल सकाळी निघालो होते. हा कार्यक्रम कळल्यावर जाणे रहीत केले. हा कार्यक्रम जास्त महत्वाचा. उस्ताद शमीम अहमद खान हे माझे आवडते सतारवादक. परत स्थळ माझ्या घराजवळच.
मग काय त्यांचे सतार वादन मनोसक्त ऐकले. माझा कॅमेरा आज मी म्यान केला. सतार ऐकताना मधेमधे त्याची लुडबुड नको. केवळ दोन -चार मिनीटांचे वादन स्म्रुतीसाठी कॅमेरात बंदिस्त केले.
साजन मिलाप या संस्थेने भारतीय विद्या भवन मधे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. साजन मिलाप नेहमीच दर्जेदार कार्यक्रम या गीता मंदिर हॉल मधे आयोजीत करत असतात. छोटेखानी हॉल मधे मोजक्याच लोकां समोर झालेले गायनवादन नेहमीच उत्तम रंगत असते.
लिहीणार - स्वर्गीय संगीतात आज डुंबुन गेलेला. ज्याला शास्त्रीय संगीत थोडेफार तरी कळायले हवे होते.
(Some problem with video upload. will try later on )
2 comments:
You are so lucky.
हो ना,पण बरेचसे कार्यक्रम माझ्या आळशीपणामुळे, विसराळुपणामुळे ऐकायचे राहुन जातात त्याचे काय?
(त्याचा दोष नेहमीच मी माझ्या स्वभावाप्रमाणॆ बायकोला देतो,तुझ्या मुळे मला जाता आले नाही असे तिला बिचारीला नेहमी ऐकावे लागते )
Post a Comment