पण काहीही म्हणा. "हेडलेस चिकन ! " काय चपखल शब्दप्रयोग श्री. रोनेन सेन यांनी केला आहे. मी त्यांच्या वर बेहद्द खुश आहे. आता पर्यंत ज्यातुन काहीही निष्पन्न होणार नसलेले गुऱ्हाळ घालणाऱ्यांच्या बद्दल विचार करताना मला "आपल्याच शेपटीचा पाठलाग करणारा कुत्रा" आठवायचा. पण हेडलेस चिकन ! वा, क्या बात है. मजा आली.
मोगॅंबो खुश हुवा.
काय समर्पक शब्द आहेत. हेडलेस चिकन. निर्बुद्ध पण कमालीच्या उत्साहात व वेगात काम करणाऱ्यास "हेडलेस चिकन" म्हणतात. तसे बघायला गेले तर "हेडलेस चिकन" व हेड असुन सुद्धा त्याचा वापर न करणारे मनुष्यप्राणी, "हेडलेस मॅन " यात फारसा फरक नसावा.
(साभार लोकसत्ता) - द पेनिन्सुला (दोहा, कतार ) यातले भाष्य अत्यंत बोलके आहे. ते म्हणतात " सेन यांचा विरोध प्रामुख्याने या कराराशी संबधीत उथळ चर्चेला असावा. एखाद्या धोरणाची चर्चा करताना त्याला असणारी राजकीय परिणामे अधिक ठळकपणे पुढे येतात. त्या मुळे मूळ मुद्दा विसरला जातो. अणुकराराशी संबधित जी विधाने समोर येत आहेत, त्यात गांभीर्याचा अभाव आहे. सर्व पक्षाचे नेते फार वरवरचे मुद्दे मांडत आहेत. हा विषय गांभीर्याने हाताळायला हवा. "
मला वाटते हे " द पेनिन्सुला (दोहा, कतार )" आपली मस्करी वगैरे तर करत नसावेना ? म्हणे विषय गांभीर्याने हाताळायला हवा. काय राव तुम्ही लोकसभा , विधानसभेतील अधिवेशनाच्या काळातील द्रुश्ये पाहीली नाहीत काय ? काय आमची थट्टा करता काय ?
तर सांगायचे म्हणजे रायगडचे सेझ प्रकल्प व त्यावर आंदोलकांचे राजकारण याला "हेडलेस चिकन" या व्याख्येत बसवता येईल काय ? मग एनरॉन व दाभोळच्या वीज प्रकल्पाचे काय? काश्मीर प्रश्न, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, मुंबईतील गिरणी कामगारांचे आंदोलन, संप व देशोधडीस लागणे. नर्मदेवरील धरण प्रकल्प, ही यादी फार मोठी होवु शकते काय ? ज्या राज्यासाठी कौरव पांडवात महाभारत झाले, ते राज्य पांडवांना उपभोगायला तरी मिळाले का ? ज्या साम्राज्याच्या वाढीस सिकंदर जग जिंकायला निघाला त्याचा शेवट काय झाला ? एक ना अनेक अशी उदाहरणे या व्याख्येत आणता येतील काय ?
अरेच्या , मीच हे हेडलेस चिकन सारखे काय वागायला लागलो आहे ? कोणीकडॆ भरकटत चाललो आहे ? मुळ मुद्दा काय होता कोण जाणे?
सर्व विषयावर मी घोळ घातला पाहीजेच का ? .
3 comments:
Good one !!!
good one...!!!!
good one...........
Post a Comment