Wednesday, August 15, 2007

समोवर बचावो आर्टीस्ट को हटावो , समोवर बचावो आर्टीस्ट को हटावो


कलाकार मंडळींनो, हवे आहे कशाला आपल्याला आर्ट गॅलरी ? कलेचे प्रदर्शन मांडायला? प्रदर्शन मांडुन करणार काय ? कोणा लेकाला असते या कलेत स्वारस्थ ? कोण येते का कला बघायला ? समोवर मधे बघा, जरा बघा, जेव्हा बघावे, तेव्हा गर्दी असते. (*)

मी तर म्हणीन, हटाव, हटाव, जहांगीर आर्ट गॅलरीच हटाव . या संपुर्ण आर्ट गॅलरीचे रुपांतर एका उत्तम जागतीक दर्ज्याच्या उपहारगॄहात करण्यात यावे असा ठराव मी आज मांडु इच्छीतो. या उपहारगॄहात फक्त उच्चभ्रु लोकांनाच प्रवेश देण्यात यावा, सामान्य जनांनी याच्या जवळपास फिरकण्याचे ही धाडस जरी केले तर त्यांना दरवाना कडुन हाकलले जाण्यात यावे. (*)


मुढजनांना, कल्पनेत रमणाऱ्यांना काय ठावुक समोवर काय चीज आहे ? काय चीज आहे ? समोवर म्हणजे समोवर म्हणजे ..... अ.. समोवर म्हणजे अ,, मला असे म्हणायचे आहे की समोवर म्हणजे एक चळवळ आहे, फार्फार मोठी कलेच्या क्ष्रेत्रातील क्रांती आहे . थोरालीमोठाली माणसे येथे येवुन तासंन्तास महत्वाची वैश्वीक चर्चा करत बसतात (?). विश्वाच्या चिंते पुढे कुणा लेकाला खाद्यपदार्थांच्या महागडया दराची, सुमार दर्ज्याची चिंता व काळजी ? ती करावी फडतुस माणसांनी. ज्यांना परवडत नाही त्यांनी. या अल्पसंतुष्टांनी खुशाल आजुबाजुच्या टपरीवर वडापाव व कटींग चहा पिवुन गुजराण करावी. (*)


येथे समोवर मधे बिग बी, जया बी बरोबर म्हणे खायला व खाताखाता पुढील सहजीवनाचे स्वप्न रंगवण्यासाठी आले होते. येथे स्मॉल हरे (म्हणजे मीच ) आपल्या झालेल्या बायकोस भापवायला घेवुन आले होते . बिग बीं ना खाणे आवडले होते का ठायुक नाही पण आम्ही मात्र खाताना आता याच्या पुढे सामोवर मधे पावुल टाकायचे नाही यावी केलेली प्रतीज्ञा अजुनही कसोसीने पाळली आहे,


मुंबई मधील जहांगीर आर्ट गॅलरी मधे समोवर नावाचे एक उपहारगृह आहे. सध्या संपुर्ण जहांगीर आर्ट गॅलरी फक्त कला प्रदर्शनासाठीच राखुन ठेवावी, उपहारगृह बंद करुन या जागेचे रुपांतर शिल्पकलेच्या प्रदर्शनासाठी एका कलादालनात करण्यात यावे या साठी चित्रकार व शिल्पकारांनी आंदोलन सुरु केलेले आहे. नुकतेच ११९ वर्षीय बॉम्बे आर्ट सोसायटीने चित्र प्रदर्शनासाठी ही जागा मोकळी करा या साठी चळवळ उभारली आहे.


जहांगीर आर्ट गॅलरीत दरवर्षी देशातुन दोन हजाराच्या वर आपली कला मांडण्या साठी, लोकांपुढे आणण्यासाठी कलाकारांकडुन अर्ज येतात. परंतु जागे अभावी फार कमी जणांचे नंबर लागतात. या भावना लक्षात घेता, नुकतेच पहिल्या मजल्यावर असलेल्या केकु गांधी ( केमोक्ल्ड गॅलरी ) व चेतन आर्य ( टेरेस आर्ट गॅलरी ) यांनी आपल्या जागा सोडल्या.


(*) मी हे उपरोधिकपणे लिहिलेले आहे. शब्दशा खरे मानु नये.


लिहीणार - चित्रकार व शिल्पकारांचेच म्हणणे योग्य आहे हे जाणणारा. त्यांना आपली स्वताची हक्काची जागा ही हवीच.

No comments: