आजचाच प्रसंग. बस मधुन माझ्या पुढुन कॉलेज मधली एक मुलगा व मुलगी खाली उतरली, त्यांच्या आधी उतरलेला माणुस व ते यांच्या दरम्यान किंचीतसा बिलंब झालेला. झाले. बस चालकास या बेजबाबदारपणावर तोंडसुख घ्यायला कारण मिळाले. ते दोघे बिचारे काही ही न बोलता निघुन गेले.
बसचालकाला आपल्या मागे काय झाले याच्याशी सोयरसुतक नव्हते. एक म्हातारी बाई काहीही कारण नसताना वाट अडवुन उभी होती. परत बस तशी रिकामी होती, तिला बसायला जागा होती. मुलांना वाटले हिला सुद्धा उतरायचे असेल. मग आपल्या चालीनी, हळुवारपणे बाई बाजुला झाल्यावर शांतपणे ती मुले, जरादेखील धक्काबुक्की न करता खाली उतरली.
आयुष्यात बऱ्याच वेळा असे होते, आपल्या अपरोक्ष काय परीस्थिती असते किंवा काय प्रसंगातुन इतर माणसे गेलेली असतात हे ठावुक नसताना, न जाणुन घेता उगीचच प्रखर प्रतिक्रिया दिल्या जातात.
त्यात तरुण पिढी बेजबाबदार हे एक चुकीचे गॄहीतक.
लिहीणार - बसचालकास चांगलेच झाडणारा
No comments:
Post a Comment