Thursday, August 09, 2007

इंद्रायणीकाठी

इंद्रायणीकाठी चोरांची आळंदी, जाहली समाधी बंगल्यांची हो बंगल्याची । इंद्रायणीकाठी ।

ग्राहकराजा, हो, कार्ल्याला बुडतो पाण्यात, नाचती सरकारी नोटीसी मागे पुढे ॥

मागे पुढे दाटे भरावांचा अडथळा, अंगणात पाणी पुराचे हो ।

केडिया आणि दलाल, बिल्डरा, मायबापा ॥

पुरात राहीले गॄहप्रकल्पांत फसुन, मारोती, राजन, मेघाबाई॥

(क्षमा असावी चुकभुल दयावी घ्यावी)

संदर्भ- सकाळ- इंद्रायणीच्या पाण्यात बुडाली अतिक्रमणे
पुणे, ता. ८ - ज्या गृहप्रकल्पांनी कार्ला (ता. मावळ) येथे इंद्रायणी नदीच्या पात्रात अतिक्रमणे केली, ते दोनही प्रकल्प आता इंद्रायणीच्या पाण्याखाली पूर्णपणे गेले आहेत. एवढेच नव्हे तर यामुळे कार्ला परिसरातही पाण्याची पातळी वाढली असून, त्यामुळे पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, या प्रकल्पांच्या कामाला मनाई करण्याची मागणी करणाऱ्या दाव्याचा आज (गुरुवार) निकाल आहे. ........कार्ला येथे बांधकाम व्यावसायिकांनी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात भराव टाकला आहे. केडिया आणि दलाल या दोन बांधकाम व्यावसायिकांनी थेट नदीपात्रातच बांधकाम केले आहे. त्यामुळेही नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाला आहे. ही बांधकामे पूररेषेच्या आत आहेत. त्यामुळे साहजिकच ही बांधकामे पुरात बुडाली. मात्र याचा धोका परिसराला होत असून, पुराचे पाणी जास्त भागात यंदा पोचले. त्यामुळे ही अतिक्रमणे हटविण्याची मागणी होत आहे.

No comments: